Login

पालक भात

पालक भात रेसिपीज इन मराठी
रेसिपी इन मराठी
पालक भात
साहित्य -
एक पाव पालक, एक वाट्या बासमती तांदूळ, खडा मसाला, 100 ग्रॅम काजू, दोन मध्यम आकाराचे कांदे,एक बटाटा ,दोन-तीन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, किंचित साखर, कोथिंबीर.
कृती -
प्रथम भात मोकळा शिजवून घ्या. पालक निवडून स्वच्छ धुऊन घ्या. एका गंजात पाणी उकळत ठेवून त्यात ही पालक टाका. थोड्यावेळाने ही पालक भाजी पाण्यातून काढून मिक्सरवरून त्याची प्युरी तयार करा. कढईत थोडे तेल टाकून काजू तळून घ्या. चिरलेला कांदा व बटाटा तळून घ्या व हे सर्व बाजूला एका भांड्यात काढून ठेवा. आता कढईत तेल टाकून खडा मसाला तळून घ्या. त्यात पालक प्युरी टाका व चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात मोकळा शिजवलेला भात, चवीनुसार मीठ, किंचित साखर घालून परतून घ्या व एक वाफ येऊ द्या. हा भात एका बाऊलमध्ये काढून सजावटीसाठी तळलेले काजू, तळलेला कांदा,बटाटा कोथिंबीर घालून खायला घ्या. अत्यंत पौष्टिक असा हा पालक भात लहान मुलांनाही खूप आवडेल.

चला तर मग करा रेसिपीला सुरुवात
मस्त खा. स्वस्थ रहा. व्यस्त रहा.
सौ. रेखा देशमुख