Login

पळी पापड्या Recipe In Marathi

उन्हाळा स्पेशल वाळवणाचे पदार्थ अचूक प्रमाणासहित
पळी पापड्या


साहित्य - अर्धा किलो साबुदाणा, बटाटे दोन, जिरे दोन चमचे, चीली फ्लेक्स किंवा सुक्या मिरच्या जाडसर बारीक करून घेतलेल्या, मीठ चवीनुसार.


कृती -
१) साबुदाणा रात्री भिजत घालणे.

२) सकाळी साबुदाणा छान फुलून आल्यावर तो मोकळा करून घेणे.

३) साबुदाणा घेतला त्याच्या दुपट्ट पाणी गरम करायला ठेवणे.

४) पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ, मिरची, जिरे घालणे.

५) आता त्यात साबुदाणा घालून सतत चमच्याने हलवत राहणे.

६) आता बटाटा बारीक किसून घेणे आणि स्वच्छ धुवून घेणे.

७) साबुदाणा थोडा वेळ म्हणजे पाच दहा मिनिटे शिजून झाल्यावर त्यात किसलेला बटाटा घालणे. आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता.

८) आता सगळे मिश्रण पुन्हा पाच मिनिटे शिजवून घेणे म्हणजे बटाटा शिजला की नाही ते बघणे.

९) आता एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पेपर वरती तयार मिश्रणाच्या पळीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पापड्या घालणे.

१०) दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून झाल्यावर पापड्या डब्यात भरून ठेवणे.

तुम्हाला जर ह्या पापड्या साध्या बनवायच्या असतील तर फक्त मीठ आणि जिरे घालून शिजवणे, त्यात मिरची घालायची नाही.


🎭 Series Post

View all