सकाळचे सहा वाजले होते आणि मुलींना साडेसात वाजता शाळेसाठी निघायचं होतं.
"अगं आरोही उठ सकाळचे सहा वाजले स्पोर्ट्स ला जायचं आहे ना !"
"हो आई" म्हणून आरोही परत झोपली.
प्रचिती सकाळी उठून शाळेसाठी डबा बनवत होती आणि तिने छोट्या छकुलीला पण आंघोळ घालून गणवेश घातला.
सकाळचे साडेसहा वाजले आणि आरोहीला परत एकदा आवाज दिला.... उठ म्हणून. पण अजून ती उठली नव्हती.
बघता बघता 6:45 झालेत, तेव्हा आरोही उठली.
"अगं आरोही तू सकाळी लवकर उठत नाही. आपलीच मुलगी म्हणून जाऊ दे, झोपू दे असे वाटते. पण आता रोज तसच झालं तर चालणार नाही." म्हणून प्रचीती रागाला आली.
जसा आरोही ला शाळेला जायला उशीर होत होता, तसा सचिन प्रचिती वर राग राग करत होता.
"का तू आरोही ला लवकर उठवत नाही, रात्री तू लवकर झोपायला का सांगत नाहीस तिला?"
"अहो मी सारखा आरोहीला उठवत आहे, पण ती उठतच नाही आणि मला डबा पण बनवायचा असतो ना, मी किती वेळा सांगू तिला?"
आरोही ला खूप राग येत होता आपल्या आईचा , ती शांतपणे ऐकत होती आणि बोलली "आई आवरत आहे ना !"
थोड्यावेळाने सगळं आवरून आरोही आणि छकुली शाळेला जाण्यासाठी तयार झालेत.
सचिन दोन्ही मुलींना शाळेत सोडून आला आणि मग प्रचितीला प्रेमाने बोलत होता.
"अगं मी आरोही ला पण ओरडलो शाळेत सोडताना."
प्रचीती रागात होती, तिने सचिनच काहीच ऐकून घेतले नाही. थोड्यावेळाने सचिन सुद्धा आवरून ऑफिसला निघाला.
प्रचीती विचार करत होती की ..." मुलांना घडवणं फक्त आईची जबाबदारी असते का? मुलांना काही प्रॉब्लेम झाला , आईने लक्ष दिले नाही आणि मुले चांगले वागले नाही किंवा मुलांना बरं नाही तरी आईची चूक असते .
तेव्हा नवऱ्याची काही जबाबदारी नसते का? सचिन त्यावेळेस फक्त बोलून मोकळा होतो. पण मुली जर अभ्यासात किंवा कुठे चांगलं नाव काढलं तर सचिन एकदम खुश होऊन बोलतो की ती माझीच मुलगी आहे म्हणून, तेव्हा आई आठवत नाही !"
तेव्हा नवऱ्याची काही जबाबदारी नसते का? सचिन त्यावेळेस फक्त बोलून मोकळा होतो. पण मुली जर अभ्यासात किंवा कुठे चांगलं नाव काढलं तर सचिन एकदम खुश होऊन बोलतो की ती माझीच मुलगी आहे म्हणून, तेव्हा आई आठवत नाही !"
आता बघूया पुढे प्रचिती सचिनला समजावू शकेल का?
क्रमश:
लेखन - रसिका
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा