मागच्या भागात आपण पाहिलं की प्रचिती सचिनला समजावून सांगणार होती आता बघूया पुढे काय होते ते.
प्रचीती आणि सचिन चे लग्न होऊन 14 वर्षे झाले होते. दोघेही ऑफिसला जात , पण कोरोना नंतर प्रचीती घरातून काम करत होती. ऑफिस आणि घरातली कामे करून, मुलांना सांभाळत तिची तारांबळ उडायची पण त्यातून तिला आनंद व्हायचा की मुली तिच्यासोबत घरीच असतात म्हणून.
सचिन ऑफिसला गेल्यावर प्रचीती घरातले सगळं आवरून ऑफिसचे काम करत होती , पण सकाळचा प्रसंग सारखा तिला आठवत होता.
आरोही आता टीनेजर होती आणि तिला आता सारखं ओरडलेल कळत होतं . असं तिने दोनदा तीनदा प्रचीतीला बोलूनही दाखवले होते.
प्रचीतीने सचिनला फोन केला आणि म्हणाली, "तू आत्ता मुलांना सोडून आल्यावर माझ्यासोबत एकदम प्रेमळ बोलू नकोस प्लीज. आता एवढच प्रेमळ पण आरोहीला अपेक्षित आहे आपल्याकडून. वन मोर थिंग ती आता टीनेजर आहे, तिला आता जाणवत आहे की आपण तिला ओरडतो म्हणून . मला तिने दोनदा तीनदा बोलून पण दाखवले पण ओरडण्याऐवजी आपण दोघेही तिचे चांगले मित्र बनायला पाहिजे, हे दोघांचेही कर्तव्य आहे.
छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर आपण ओरडलो तर ती पुढे जाऊन काही मोठ शेअर करायचा असेल तर ती घाबरेल , सांगणार नाही . पण आपण चांगले मित्र बनून राहिलो तर तिला सांगण्यात अवघड वाटणार नाही."
"आज रात्री आपण दोघेही मिळून समजावून सांगु की आतापासून पुढे ओरडणार नाही . पण शी नीट टू अंडरस्टँड बेटर अँड नीड टू वर्कऑन इट. अँड वन मोर थिंग तिच्यापुढे सांगू नको की मी पण वेळेत काम करत नाही वगैरे ."
"तिला जर घडवायचं असेल तर माझ्या चुका वरती बघण्यापेक्षा तिला घडवण्यात लक्ष घालूया. मी माझं सुधारायचं बघतच आहे . त्यासाठी तू मला वेगळं सांगायची गरज नाही. जर आज रात्री नाही सांगितलं तरी चालेल पण नेक्स्ट टाईम पासून असं वागूयात आपण."
"आणि लास्ट थिंग जेव्हा आपण मुलांचा काही प्रॉब्लेम असतो आणि वेळ नसतो तेव्हा तू माझ्यावर मुलांपुढे ओरडू नकोस, मला हातातले काम होणार नाही आणि तू मुलांना सोडून आल्यावर ओरड ना चालेल . पण त्यांच्यापुढे तू सारखं भांडण करतोस ते त्यांच्या मनावरती दीर्घ परिणाम होत आहे . जे मला करायचं नाही आहे."
सचिन म्हणाला,"तू अगदी बरोबर बोलत आहेस, मला तुझं बोलणं पटलं. उलट तू बोलत होतीस आरोहीला बोल म्हणून, मला कळतं म्हणून मी त्यांना ओरडण्यापेक्षा तुलाच ओरडत होतो. ठीक आहे मी आता ते नसतानाच तुझ्यासोबत भांडण करेन, त्यांच्यापुढे मी कधीच भांडण करणार नाही."
पण सचिनला अजूनही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली नाही आणि याच्या आधी पण प्रचितीने खूप वेळा त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण त्याने कधीही ऐकून घेतले नाही.
प्रचीतीला एक चांगलं वाटत होतं की आज जे प्रसंग घडला , त्यावर आपण कसे मात घालू शकतो हे ती सचिनला समजावून सांगू शकली आणि त्यातच ती समाधान मानत होती.
Note: एकदा मुलं टिनेजरच्या वयात आल्यानंतर आई वडिलांना मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागते जेणेकरून ते पुढे चांगल्या वळणावर जातील.
Note: एकदा मुलं टिनेजरच्या वयात आल्यानंतर आई वडिलांना मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागते जेणेकरून ते पुढे चांगल्या वळणावर जातील.
समाप्त.
लेखन - रसिका
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा