Login

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण

भाषण क्रमांक १
व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे आदरणीय शिक्षकवृंद त्यांचंबरोबर माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याय अशी मी आशा करतो.

आज आपण इथे जमलो आहोत ते म्हणजे बाल दिन साजरा करण्यासाठी पण आपण दरवर्षी 14 नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा करतो? तर आज 14 नोव्हेंबर म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके चाचा नेहरू यांची जयंती आणि तीच आपण बालदिन म्हणून साजरी करतो. कारण चाचा नेहरूंना आपल्यासारखी लहान मुले फार आवडायची आणि म्हणून त्यांचा जन्म दिवस आपण बाल दिन म्हणून साजरा करतो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी ब्रिटिश भारतातील अलाहाबाद इथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूपा राणी नेहरू असे होते. त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन भावंडांमध्ये सगळ्यात मोठे अपत्य होते आणि त्यांना दोन लहान बहिणी होत्या. म्हणजे ते त्यांच्या घरातील एकुलता एक मुलगा होते.

त्याकाळी चाचा नेहरूंना शाळेत न पाठवता त्यांचे बालपणीचे शिक्षण घरात खाजगी पद्धतीने झाले. त्यांना शिक्षण देणारे शिक्षक फर्डीनांड ब्रूक्स हे होते.त्यांना विज्ञान आणि सिद्धांतात रस होता.ऑक्टोंबर 1907मध्ये म्हणजे वयांच्या अवघ्या 15 वर्षी ट्रिनिंग कॉलेज, केंब्रिज येथे उच्च शिक्षणासाठी गेले.आणि त्यांनी नैसर्गिक विज्ञानामध्ये पदवी संपादन केली.यावेळी त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आणि साहित्याचा ही अभ्यास केला.पदवी पूर्ण केल्यावर ते 1910 साली कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.1912 मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांना वकील म्हणून नामांकन मिळाले.त्यानंतर त्यांनी सरळ भारतीय राजकारण आणि स्वतंत्र संग्रामत उडी घेतली. 1013मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नागरि हक्क अभियानासाठी त्यांनी निधी उभा केला.

त्यांना जुलमी इंग्रजी सत्ता बाबत चीड होती. त्यांना भारताला स्वातंत्र्य झालेलं पहायचं होतं. त्यांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय काँग्रेसच्या अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. होमरुल चळवळ,असहरकर चळवळ याचे त्यांनी गांधींजींच्या खांद्याला खांदा लावून नेतृत्व केलं. 1921 मध्ये सरकारविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना अटक झाली आणि काही महिने करावासा भोगल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

1916 मध्ये त्यांचे लग्न कमला कौशिकशी झाले.त्यांना इंदिरा नावाची एक मुलगी झाली. पुढे जाऊन हीच मुलगी भारताची पहिली महिला पंतप्रधान बनली आणि ती मुलगी म्हणजे इंदिरा गांधी होत. 1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. 1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. फेब्रुवारी-मार्च 1936 मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै 1938 मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.

31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला. 8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांना तुरुंगवास घडला. जानेवारी 1945 मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

त्यांना शांतिदुत म्हणून ही ओळखले जाते. तसेच त्यांना लहान मुले खूप आवडत असत. लहान मुलांमध्ये ते चाचा नेहरू नावाने ओळखले जायचे. म्हणूनच 14 नोव्हेंबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.
नेहरूंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस एक सर्वव्यापी पक्ष म्हणून उदयास आला, ज्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात वर्चस्व गाजवले आणि १९५१, १९५७ आणि १९६२ मध्ये निवडणुका जिंकल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू हे भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले. २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे १६ वर्षे, २८६ दिवसांचा - जो आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा पंतप्रधानकाळ होता- तो संपला. त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंच्या वारशावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी जोरदार चर्चा केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांमध्ये, नेहरूंना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणून गौरवण्यात आले, ज्यांनी भारतात लोकशाही सुरक्षित केली आणि जातीय गृहयुद्ध रोखले.

भाषण क्रमांक २

सुर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग, परीक्षक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार! आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती

एक प्रख्यात वकील आणि भारतीय राष्ट्रवादी असलेल्या मोतीलाल नेहरू यांचे जवाहरलाल हे पुत्र होते.त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889मध्ये अलाहाबाद इथे झाला. त्याच्या आईचे नाव स्वरूपाचे राणी होते. त्यांचे सुरवातीच्या काळात शिक्षण घरीच खाजगी पद्धतीने झाले.जवाहरलाल नेहरू हे 15 व्या वर्षी 1907 साली शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये- हॅरो स्कूल आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे झालेत्यानंतर 1910 साली त्यांनी इन्नर टेम्पल येथे त्यांनी कायद्याचे प्रशिक्षण घेतले. बॅरिस्टर झाल्यावर ते भारतात परतले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी नावनोंदणी केली. हळूहळू राष्ट्रीय राजकारणात नेहरुंनी रस घेण्यास सुरुवात केली आणि कालांतराने यात पूर्णवेळ सहभागी झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि १९२० च्या दशकात पुरोगामी गटाचे आणि अखेरीस काँग्रेसचे नेते बनले. त्यांना पुढे महात्मा गांधींचे समर्थन प्राप्त झाले. पुढे गांधींनी नेहरूंना त्यांचा राजकीय वारस म्हणून नियुक्त केले.

त्यांना जुलमी इंग्रजी सत्ता बाबत चीड होती. त्यांना भारताला स्वातंत्र्य झालेलं पहायचं होतं. त्यांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय काँग्रेसच्या अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. होमरुल चळवळ,असहरकर चळवळ याचे त्यांनी गांधींजींच्या खांद्याला खांदा लावून नेतृत्व केलं. 1921 मध्ये सरकारविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना अटक झाली आणि काही महिने करावासा भोगल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

त्यांना शांतिदुत म्हणून ही ओळखले जाते. तसेच त्यांना लहान मुले खूप आवडत असत. लहान मुलांमध्ये ते चाचा नेहरू नावाने ओळखले जायचे. म्हणूनच 14 नोव्हेंबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.
नेहरूंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस एक सर्वव्यापी पक्ष म्हणून उदयास आला, ज्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात वर्चस्व गाजवले आणि १९५१, १९५७ आणि १९६२ मध्ये निवडणुका जिंकल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू हे भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले. २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे १६ वर्षे, २८६ दिवसांचा - जो आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा पंतप्रधानकाळ होता- तो संपला. त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंच्या वारशावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी जोरदार चर्चा केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांमध्ये, नेहरूंना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणून गौरवण्यात आले, ज्यांनी भारतात लोकशाही सुरक्षित केली आणि जातीय गृहयुद्ध रोखले. अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी नमन!