" सुरभी अग ए सुरभी, कुठं आहेस ग ? "
" सुरभी अग जरा ग्लास भर पाणी घेउन ये."
" काय ग बाई हि गर्दी. नुसत ट्रॅफिक. वैताग आला बघ." त्या स्वतः शी बोलतं होत्या.
रोहिणी बाई नुकत्याच बाहेर जाऊन आल्या होत्या. खर तर फक्त सोसायटी मधील मंदिरात गेल्या होत्या. त्यांचा नित्य क्रमच होता.संध्याकाळी चहा नाष्टा झाला कि त्या खाली सिनियर सिटिझन पार्क मध्ये जायच्या. तिथं त्यांनी त्यांचा त्यांच्या समवयस्क लोकांचा ग्रुप बनवला होता. गप्पा मारत त्यांनतर जवळच्या दत्ताच्या मंदिरात जाऊन त्या त्यांचा वेळ घालवत.
आज त्या त्यांच्या मैत्रिणी सोबत गावातल्या मंदिरात गेल्या होत्या. आज तिथं कीर्तनाचा कार्यक्रम होता. तर त्या त्यांच्या मैत्रिणी सोबत गेल्या होत्या. नुकत्याच त्या घरी आल्या होत्या. तर येताना त्यांना वाटेत बरच ट्रॅफिक लागलं होतं. त्यामुळें साहजिकच चिडचिड झाली होती. त्यात भर पडली ते दाराला लावलेलं कुलूप बघून. स्वतः जवळची किल्ली घेउन त्यांनी दरवाजा उघडला. तर घरात कोणीच दिसत नव्हत.
आजकाल घराला लॅच लावलेलं असत. त्यामुळें कळतच नाही घरात कोण आहे का नाही ? त्यामुळेच त्यांनी घरात आल्या आल्या सुरभिला हाका मारत होत्या.
पण ना त्यांना तिचा पैरव जाणवला. ना तिचा आवज ऐकू आला. इतकचं काय त्यांचा आवाज ऐकू येऊन देखील कोणीच बाहेर आलं नव्हत.
त्यांनी पंखा चालू केला. बाल्कनीचा दरवाजा उघडला. हॉल मधला मोठा लाईट लावला. इतकं सगळं करून त्या सोफ्यावर बसल्या होत्या. सुरभीला हाका मारत होत्या.
इतक्या वेळा मोठ्यांना हाका मारून देखील कोणीच कस बाहेर आलं नाही ?
त्यांना आश्र्चर्य वाटतं. मग त्या स्वतः च उठल्या. आत किचन मध्ये गेल्या. तर किचन मध्ये कोणीच नव्हत.
किचन तसचं पडलं होतं. धुतलेली भांडी अजुनही भांड्याच्या जाळीत तशीच रचलेली होती. देवा जवळचा दिवा पण लावलेला नव्हता. ओट्यावर स्वयंपाक पण केलेला नव्हता.
त्यामुळें तर त्याचं आधी डोकं सटकल. रागा रागाने त्यांनी सुरभीला हाक मारली. त्या बाजूच्या रुम मध्ये पण गेल्या. पण त्यांना घरात कोणीच दिसत नव्हत. त्यांनी आधी देवासमोर दिवा लावला.
मनात सुरभीच्या नावाने शंख करण्याचं काम चालूच होत.
" कुठं गेली हि बाई ! इथ सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली तरी अजुन स्वयंपाक तयार नाही झाला. काहीचं तयारी दिसत नाही. हे सगळं काय चालू आहे ? "
त्यांनी मोबाईल फोन घेऊन सुरभीला फोन लावला. तर फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया आहे हेच सांगत होता. त्यांनी निरंजनला पण फोन लावला तर तेच ऐकायला येत होत.
' कुठं गेली ही लोकं ? '
मनाशी बडबड करत त्यांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. स्वतः साठी भाकरी बनवली. कुकर लावला. बाकीचा स्वयंपाक सुरभी आल्यावर करेल.
रोहिणी बाई त्यांच्या दोन मुलांच्या सोबत पुण्याला राहतात. दोन्ही मुलं शिक्षण पुर्ण करण्यासाठी पुण्याला आली ती इथचं रमली. समीर इंजिनियर होता. तर निरंजन एका छोट्या कंपनीत नोकरीला होता. रोहिणी चे पती गेल्या वर्षी अनंतात विलीन झाले होते.
त्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या सोबत एका थ्री बी एच के फ्लॅट मध्ये राहत होत्या. एका टाऊनशिप मध्ये छान फ्लॅट होता. समीर ची कंपनी इथून जवळच असल्याने त्यांनी हा फ्लॅट रेंट ने घेतला होता.
निरंजन समीरच्या तुलनेनं कमी कमवत होता. पाच महिन्या पूर्वीच तर समीर ने त्याच्या मैत्रिणी सोबत लग्न केलं होत. दोघं हि एकाच कॉलेज मधे शिकत होते. नोकरी करत होते. तर सुरभी एक गृहिणी होती. तिला केक कुकीज पेस्ट्री बनविण्याचा छंद होता. ती खूप कुशल तेने घर सांभाळत होती.
रोहिणी बाईंनी संध्याकाळची सांज वात केली. दिवा लावला. तरी या मुलांचा काहीच पत्ता नव्हता. घरी आल्यावर त्यांना स्वतः काम करायला लागलं. हे त्यांना आवडलं नव्हत. त्या रागाने बडबड करत होत्या.
" सुरभीला काय समजत नाही का ? घरातली काम करून जायला काय झालं होत. निदान जाण्यापूर्वी संध्याकाळचा स्वयंपाक तरी करून जायला हवा होता. घरातला पसारा पण तसाच आहे."
छोटया सईची बाहुली सोफ्यावर पडली होती. तर कोपऱ्यातल्या कपाटा जवळ तिने तिचा भातुकलीचा खेळ मांडलेला होता. खिडकीचा कट्टा म्हणजे तिचा ओटा होता. त्यावर भांडी कुंडी मांडून ठेवली होती.
त्याकडे त्यांनी नापसंतीचा कटाक्ष टाकला. खरं तर सई ने तिचा भांडी कुंडी चा खेळ गॅलरी मांडला होता. पण दरवाजा उघडा असल्याने समोर दिसत होता.
" सुरभीला कसं समजत नाही आपल्या मुलीने केलेला पसारा आवरून जायला हवं ?
जायचं होत तर आधी सांगून नाही जाता येत ?
गेले तर गेले आहेत पण निदान वेळेवर परत तरी यायला नको का ?
ते दोघं यायची वेळ झाली ? अजुन स्वयंपाकाचा पत्ता नाही ?
त्या मनापासून त्यांच्या मोठ्या सुनेला सुरभीला कोसत होत्या. आज मानसी तिच्या आई वडीलांना सरप्राइज देण्यासाठी माहेरी गेली आहे. नव्याचे दिवस आहेत. मूलं आता मज्जा करुन घेत आहेत.
हेचं वय असत ना एकमेकांच्या सोबत हिंडण्या फिरण्याचे ! एकच दिवस तर मिळतो दोघांना. त्यातून समीरची नोकरी नविन आहे या कंपनीतली.
इतके दिवस ते दोघं एकाच कंपनीत नोकरीला होते. नुकतच समीरने जॉब स्विच केला होता. आधीच्या कंपनी पेक्षा जास्त चांगला पगार आहे.
सुरभी घरीच तर असते. सई पण लहानच आहे. या वर्षी पासुन शाळेत जाईल. निरंजनचा पगार पण कमी आहे समीर च्या तुलनेने तर सुरभीला काय धाड पडली आहे. घरातील चार काम जास्त केली तर ?
मनाला येईल ते त्या बडबड करत होत्या. घरात ऐकणार कोणीच नव्हंत. त्यामुळे तर राग आणखीन वाढत चालला होता. इतक्यात कुकरची शिट्टी वाजली. त्या भानावर आल्या. चरफडत जाऊन त्यांनी कुकर खालचा गॅस बंद केला.
या गडबडीत त्या आज घरी घडलेला प्रसंग पूर्णपणे विसरून गेलेल्या.त्यांच्या लेखी आज घडलेलं काही नविन नव्हत. नेहमीचच तर आहे. इतकचं काय याचा परिणाम समीर आणि मानसी वर पण झाला नव्हता.
आज रविवार होता. सुरभी साठी सुट्टी नव्हती. आज घरी मिसळ पाव बनविण्याचा बेत होता. तर ती किचन मध्ये काम करत होती. निरंजन आज सुट्टी होती. तर आठवड्याची भाजी आणायला भाजी मंडई मधे गेले होते. छोटी सई गॅलरी मध्ये खेळत होती. सासू बाई सोफ्यावर बसुन पेपर वाचत होत्या.
आज रविवार होता. सुरभी साठी सुट्टी नव्हती. आज घरी मिसळ पाव बनविण्याचा बेत होता. तर ती किचन मध्ये काम करत होती. निरंजन आज सुट्टी होती. तर आठवड्याची भाजी आणायला भाजी मंडई मधे गेले होते. छोटी सई गॅलरी मध्ये खेळत होती. सासू बाई सोफ्यावर बसुन पेपर वाचत होत्या.
सई काहितरी हवं होत म्हणून किचनच्या दिशेने धावत जात होती. समोरून मानसी येत होती. तिच्या हातात एक काचेची बाटली होती. ती त्यावरचं नक्षी काम बघत चालतं येतं होती. आणि
" धड्डाम् "
" खळ्ळ.."
" आ ss "
" आई ss"
काहितरी काच फुटण्याचा आवज ऐकू आला. सईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुरभी धावत पळत आली. तर सई रडत होती. मानसी ने सईच्या कानाखाली मारली होती. तर ती घाबरून थरथरत होती. रडत होती.
काय घडलं असावं आज ?
क्रमशः
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा २०२५ साठी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा