मानसी च्या हातातली ब्रँडेड परफ्यूम ची बाटली खाली पडून फुटली होती. त्यातला सेंट खाली जमीनीवर पसरला होता.
" तुला समोर बघून चालता येत नाही का ? "
" सई धावत यायला काय झालं होतं ? "
समीर ने तिला जरा जोरात ओरडून विचारलं. सुरभी ने सईला छातीशी कवटाळून घेतल होत.
" भाऊजी काय झालं ? इतक्या छोट्या मुलीला का मारलं ? "
" वहिनी हिन माझी टायटन ची परफ्यूमची बाटली फोडली. ही बघा " खाली पडलेल्या फुटलेल्या काचांकडे इशारा करत ती म्हणली.
" बाटली फोडली ?" सुरभी ने विचारले.
" वहिनी सई धावत पळत येत होती. ती मानसी ला धडकली. नी तिची परफ्यूमची बाटली फोडली."समीर तावातावाने म्हणाला.
" तुम्हाला माहीत आहे का काय किंमत आहे या बाटलीची ? "
" वहिनी हा इम्पोर्टेड परफ्यूम आहे. हि इतकीशी बाटली नुसती सात हजार रुपयांची आहे."
मानसीला शांत करत तो म्हणाला. त्याचा चेहेरा लाल झालेला दिसत होता. त्याने मानसीला रूम मधे नेलं. त्यांना अस जातांना बघून सुरभी च डोकं काम करणं बंद झालं होत.
समोर घडलेला प्रसंग बघून सुरभी मनातून तुटली होती. तिला समजत नव्हत काय बोलाव ? कसं वागावं ?
" आता आपल्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी आपण घ्यायला नको का ? "
" घरातली कामं करता म्हणजे काय उपकार नाही करत ?"
" आपला नवरा नाही कमवत या घराचा भार तोलण्या इतका तर बायकोच कर्तव्य असत घरची चार काम करून हात भार लावावा."
" पण इथ तर सगळं उलट आहे. काम कमी. आणि नुकसान जास्त करतात. एका छोट्या मुलीला नाही सांभाळत येत. बघितलं नाही दुर्लक्ष केलं तर किती मोठं नुकसान केलं हिन. कार्टी नुसती नुकसान करत असते."
हे सगळं बेडरूमच्या दिशेने जाणारे मानसी आणि समीर ऐकत होते. सुरभी अपमानाचे कडवट घोट मुक अश्रू ढाळत गिळत होती. कसं बसं तिने सई ला आवरलं. तिला घेऊन किचन मधे गेली. तिला फ्रीज मधलं चॉकलेट दिलं. तिचं रड थांबवलं.
तिने मनात नसताना देखिल घरातील स्वयंपाक केला. तिने सईला किचन मध्ये काही खेळ आणून दिला तिला खेळायला रमवल. नंतर तत्या फुटलेल्या काचा अवरल्या. चेहेरा धुवून आली. तिला हे सगळं सहन करणं गरजेचं होतं.
तिच्या माहेरची परिस्थिती काही मानसी इतकी श्रीमंत नव्हती. ती काही नोकरी करत नव्हती. ना इतकी शिकली होती की इतके पैसै कमवू शकेल. त्यात निरंजन पण समीर भाऊजी इतके शिकलेले नव्हते. निरंजन साठी त्याची आई महत्त्वाची होती. तिचं वाक्य प्रमाण होत.
सकाळीं नाष्टा करायला सगळे जमले होते. निरंजन बाजारातून भाजी घेऊन आला होता. समीर आणि मानसी पण ऐन वेळी नाष्टा करायला आले होते. सुरभी सगळ्यांना वाढत होती. नाष्टा झाल्यावर निरंजन ने विषय काढला. तोच बाटली फोडली. या आरोपाचा.
" आई सई लहान आहे. तिच्या वर हात का उचलला ? ती काही जाणून बुजून नाही धडकली ?"
" दादा चुक तर तिची होती ना ? नुकसान तर माझं झालं ना ?" मानसी म्हणली.
" पण तू तिच्या वर हात का उचलला ? "
" तिने बाटली फोडली होती."
" तिला समजत नाही. पण तुला तर समजत ना ? "
" आई तुला काय वाटतं ?"
" आता मी काय बोलणार ? सई ला सांभाळण्याची जबाबदारी सुरभी ची होती ना ? तिने नाही नीट सांभाळ तर असं होणारच ना ? "
" आई सई लहान आहे. सुरभी दिवस भर घरातली काम करत असते. तर तितका वेळ सईला सांभाळण्याची जबाबदारी आपली होती ना ? "
" मुलं सांभाळण्याची जबाबदारी आईची असते."
" निरंजन समीर बरोबर बोलत आहे. सई तिची मुलगी आहे. घरकाम करत मुलीला सांभाळायला काय झालं तिला ? "
आई अस म्हणली आणि निरंजनला धक्का बसला. मग आज कधी नव्हे तो जरा मोठ्या आवाजात बोलाला. विषय वाढत गेला होता.
" आई या घरात जसे दर महिन्याला तु घर खर्चाचे पैसे दोघांन कडून घेते तसचं काम पण वाटून दे."
" तुला माहीत तरी आहे का घर खर्च किती आहे तो ? तू जे पैसे देतो त्यातून या घराचा ईएमआय तरी भरता येईल का ? त्यात अजुन घर सामान, इतर खर्च, औषध आहेत. इतर सगळे खर्च तर समीर बघतो. त्यामुळें तर तुला इथ राहता येत आहे. आरामात जगता येत आहे. नाहीतर काय कमावतो तू ? " आज पहिल्यांदा रोहिणी बाई त्याला म्हणाल्या.
" आज सकाळीं जे घडल त्यात चुक सुरभीची जास्त होती. तिला सईला वळण नाही लावता येत. मगाशी सुधा ती रडायला लागली तर सुरभी ने फ्रीज मधलं चॉकलेट दिलं. इम्पोर्टेड चॉकलेट होत. तु या गावाची वेस स्वतः च्या जीवावर नाही ओलांडू शकत. आणि गप्पा करतो. आईला जाब विचारतो ? "
" मानसी नोकरी करते. समीर आणि मानसी कमवत आहेत म्हणुन तुला या मोठ्या घरात राहता येत आहे. उगाच चिड चिड करू नको. शांत बस. रविवार आहे. समीरला एकच दिवस सुट्टी असते. त्यात तुमचं हे असल वागणं ? छे ss. " आई ने बडबड केली.
निरंजन सुन्न होऊन बसला होता. ऐक एक करत सगळे आपल्या रुम मध्ये आराम करायला निघून गेले. सुरभी किचन मधलं काम करण्यात व्यस्त झाली. सईची अंघोळ झाली होती. तर ती झोपली होती. आई तिच्या रुम मध्ये बसली होती.
आज सकाळी घडलेला प्रसंग निरंजन ने स्वतः च्या डोळ्यांनी बघितला होता. आईचं वागणं देखील त्याने बघितलं होत. त्याला कोणी सांगितल असत तरी त्याचा विश्वास बसला नसता. पण आज स्वतः च्या डोळ्यांनी बघितल म्हणून त्याला समजलं. विश्वास ठेवण भाग पडलं.
त्याच्या वडिलांचं निधन झाल्यावर आईने बऱ्या पैकी पैसे हे घर खरेदी करण्यात गुंतवले आहेत. घर ताब्यात मिळायला अजून दोन अडीच वर्ष लागणार आहेत.तो पर्यंत आम्ही सगळे इथ एकत्र रहात आहोत.त्या घराची एकूण किंमत पैकी एक तृतीयांश भाग निरंजन ने पेलला होता. तर बाकीचा भार समीर आणि मानसी ने. पण घर खर्च करताना आई दोघां भावांच्या कडून समान प्रमाण मधे पैसे घेते. मग सुरभीला का सतत ऐकवत असते ?
आता घर खरेदी करायचं आहे तर लोन काढावं लागणार आहे. माझा पगार इतका नाही की माझ्या एकट्याच्या नावावर लोन मिळू शकेल ? म्हणून समीर ने त्याच्या नावावर लोन घेतल आहे. मानसी नोकरी करते. तर तिला कामातून सूट. मी कमवत नाही म्हणुन सुरभीला कामाचा बोजा ?
हे असच चालु राहिल तर ?
" नाही नको नको " तो मनाशी जोरात ओरडला. आज तो दिवस भर बघत होता. सुरभी घरातील कोणकोणती काम करत असते.
संध्याकाळी तो सुरभी आणि सईला घेऊन बाहेर फिरायला गेला होता. आता नुकतच ते तिघ घरी आले.त्यांच्या पाठोपाठ मानसी आणि समीर पण आले. सुरभी सई च आवरत होती. बागेत खेळून आल्यामुळे कपडे खराब झाले होते. निरंजनच्या मित्राचा फोन आला होता तर तो त्याच्याशी बोलतं होता.
" सुरभी, अग ताट पानाची तयारी झाली का ? भूक लागली आहे." रोहिणी बाईंनी तिला हाक मारली.
सासू बाईंची हाक ऐकून ती लगबगीने बाहेर आली. त्या सोबतच समीर पण आला. तो नुकतच घरात पाऊल ठेवत होता. मानसी सोफ्यावर बसली होती. तिच्या हातात काही बॅग्स होत्या.
" सुरभी अग जेवायच काय ? स्वयंपाक झाला का ? " तिला अलेल बघून रोहिणी बाईंनी आवज चढवून विचारलं.
" हो वहिनी, पटकन जेवायला वाढ. भूक लागली आहे." समीर म्हणाला.
" वहिनी प्लिज पाणी देता का ? "मानसी म्हणाली.
" आई अहो, आज मानसी बनवणार होती.संध्याकाळचा स्वयंपाक " सुरभी म्हणली.
" ती का बनवेल ? स्वयंपाक करायची जबाबदारी तुझी आहे. जा सगळ्यांच्या साठी जेवण बनव. मी डाळ भाताचा कुकर लावला आहे." रोहिणी बाईंनी दरडावून सांगितलं.
" वहिनी आज कोशिंबीर पण करा."
" वहिनी भाकरी आणि भाजी बनव. मला पोळी नको." अस म्हणत त्या तिघांनी त्यांची फरमाईश सांगितली. तिला काहीही बोलण्याचा वेळ दिलाच नाही.
इतक्यात फोन वरच बोलण संपवून निरंजन पण बाहेर आला. तर समोर आई सुरभीला काम करायला सांगत होती तर दुसरीकडे मानसीला कामाला हात पण लावायला सांगत नव्हती. त्याला आईला काय बोलावं तेच समजत नव्हत.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा