इंदू सासरी आली. सासरचं घर चांगलं भलंमोठं होतं. सुबत्ता होती. चार मजली माडी होती घराला. घरात नोकर चाकर होते. अगदी देवपूजा करायला रोज गुरुजी येत. स्वयंपाकाला सोवळ्यातली बाई होती. सगळं चांगलं होतं. इंदू माहेरहून सासरी आली इतकंच. आईची मात्र आठवण पदोपदी यायची तिला पण सासूबाई मायाळू होत्या. इंदूचं कौतुक वाटे त्यांना. ती लहान होती त्यामुळे घरातल्या कामांची तशी जबाबदारी सासूबाईंनी तिच्यावर अजून सोपवली नव्हती. रात्री सासूबाईंच्या शेजारीचं अंथरूण घालून इंदू झोपत असे. कधी रात्री दचकून जाग आली तर सासूबाई आईच्या मायेनं तिला निजवीत. त्यामुळे सासूबाईंबद्दल सुरुवातीला वाटणारी भीती आता जरा कमी झाली होती.
दिवस सरत होते. बघता बघता तिला सासरी येऊन पंधरवडा झाला. काहीतरी काम आपल्या अंगावर घ्यायला हवे असे मनाशी वाटून संध्यकाळी देवघरात देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लाऊन, माडीवरच्या सगळ्या खोल्यात कंदील लावण्याचं काम इंदूने स्वीकारलं. इंदू आवडीनं हे काम करायची. त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी ती कंदील घेऊन माडीवर गेली. दोन खोल्यात कंदील अडकवले आणि मागच्या खोलीत गेली. आपल्याचं नादात असल्यामुळे तिचं इकडे तिकडे मुळींच लक्ष नव्हतं. खोलीत कंदील अडकवून मागे फिरली आणि तेवढ्यात पाठीमागून तिच्या कंबरेभोवती कोणी घट्ट मिठी घातली. भीतीने घाबरून ती ओरडणार तेवढ्यात तिच्या पाठीमागून पुढे येऊन त्याने तिच्या तोंडावर हात दाबून ठेवला. आपले मोठे डोळे अजून मोठे करत त्याने तिला दरडावले.
"गप! आवाज नको अजिबात. ओरडू नकोस. मी काही खाणार नाहीये तुला!" इंदूने आवाज ओळखला. डोळे भीतीने घट्ट बंद करून घेतले. एखाद्या रान पशूने कोवळ्या कोकराचे लचके तोडावे तसे तिच्या नवऱ्याने तिचे सर्वस्व ओरबाडून घेतले. दुखऱ्या, हुळहुळणाऱ्या शरीराला सांभाळत, गालावरचे नं थांबणारे अश्रू पुसत बऱ्याचं उशिराने मग इंदू झोकांड्या घेत जिन्यानं खाली आली. सासूबाईंना जाऊन बिलगली. सासूबाईंनाही वाईट वाटलं तिचं. त्यांनी समजूत काढून तिला आपल्या सोबत नेली. न्हाणीघरात नेऊन न्हाऊ घातली. ऊन ऊन भात, भाकर खायला घालून झोपवली. इंदूला मग जरा शांत वाटलं.

दुसऱ्या दिवशी मग माडीवर दिवा लावलायला ती गेलीचं नाही. चार दिवस उलटले आणि त्याने तिला परसाकडे विहिरीजवळ अडवलं.
"आज रात्री वरच्या घरात आली नाहीस तर कातडी सोलून काढीन बघ! लग्नाची बायको आहेस तू आणि एक सांगतो नीट ऐक, माझ्या घरी राहायचं असेल तर नसते लाड चालायचे नाहीत!" ती भीतीने थरथर कापत होती. डोळ्यातलं पाणीसुद्धा थिजून गेलं होतं. इंदू आपल्या मनाचं दुःख कोणाशी तरी मोकळं करावं म्हणून सोबत शोधत होती पण तिथे तिचं दुःख ऐकायला कोणी मोकळं नव्हतं. मग ती परसाकडून सुरु होणाऱ्या भाताच्या शेतीत कशाची आणि कोणाची पर्वा नं करता सैरावैरा पळत सुटली. शरीर थकल्यावर उभी राहिली. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. एकदा मनमोकळं रडून घेतलं इंदूने. मग मोठ्यादा किंचाळून मनातला द्वेष बाहेर काढला. आता ती शांत झाली. आपल्या नशिबात हेंच आहे हे समजून ती परत घराकडे आली.

निमूटपणे माडीवर जात राहिली. कसबसं वर्ष उलटलं असेल आणि तिला दिवस गेले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिने मुलाला जन्माला घातलं. स्वतःच्या लहानपणातचं ती "आई" झाली. मातृत्व म्हणजे काय? नवऱ्यासोबत असणारं दाम्पत्य जीवन म्हणजे काय? ह्याची माहिती होण्याआधीचं ती आई झाली. मग पुन्हा पुढच्या वर्षभरात परत तेंच! ह्यावेळी तिच्या नाजूक शरीराला ते गर्भारपणाचं ओझं पेललं नाही आणि मग गर्भपात झाला. नंतरही असं कित्येकवेळा झालं. अनेक गर्भपात सोसले तिने. शरीराची चाळणी झाली तिच्या जणू!
नं राहून इंदूच्या सासूबाई लेकाला म्हणाल्या,"बापू जरा सांभाळून घे! लहान आहे ती. पहिली सुनबाई गेली तशी हिची गत करू नकोस रे. मायाळू आहे पोर. हा नसता प्रकार थांबव जरा!"
आई इंदूची कड घेते म्हणल्यावर त्याला राग आला. राग डोक्यात घेऊन त्याने तिरमिरीत इंदूला मारायला सुरुवात केली.
"माझी चुगली करतेस काय? थांब बघतोचं तुझ्याकडे!" म्हणत त्याने इंदूच्या कानशिलात मारली. धक्क्यानं इंदू कोलमडत जाऊन मांडणीवर पडली. सगळी भांडी इतरत्र पसरली आणि तिला मारही लागला. कोमेजून गेली बिचारी. नक्की काय झालं आहे हे माहितीसुद्धा नसलेली इंदू बळंच भरडली जात होती. सगळं पाहून नं राहून परत सासूबाई मध्ये पडल्या.
"पाया पडते बाबा पण राग आवर! पुन्हा मी तुला काही शब्दाने बोलणार नाही." म्हणाल्या. मनासारखं झाल्यामुळे तो शांत झाला पण इंदूचा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. तिला त्यात परत दिवस गेले आणि यावेळी मुलगी झाली. आपल्या लेकीवर इंदूची मात्र जास्तचं माया होती. एव्हाना त्यांच्या लग्नाला एक तप उलटलं होतं. संसार सुरु झाला होता. तो पण आता शेतीच्या कामांत रमला होता.

©️®️सायली पराड कुलकर्णी.
क्रमशः
वरील कथा काल्पनिक असून वास्तवाशी काही संबंध नाही, आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. साहित्यचोरी हा गुन्हा असून असे केल्याचे आढळ्यास कारवाई करण्यात येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा