असं म्हणतात ना दिवा विझायच्या क्षणी जास्तंच तेजाळतो तसंच काहीसं इंदु मावशीचं आज झालं होतं. तिच्या मनातल्या भावना सचेतन झाल्या होत्या. आसपास घडणारं सगळं तसं तिला जाणवत होतं पण मन मात्र भूतकाळात धावत होतं. थोड्या वेळानं इंदू मावशीची धाकटी मुलगी स्नेहा आईजवळ येऊन बसली. आपल्या आईवर तिचं खरं प्रेम होतं इंदू मावशीचं पण ह्या लेकीवर प्रेम जरा जास्तचं होतं. मनातलं काहीबाही स्नेहाजवळचं तिने मोकळं केलं होतं. आता ह्या शेवटच्या घटका मोजतानाही इतकी वर्ष जे सहन केलं, मनात ठेवलं ते सगळं स्नेहाला सांगावंसं इंदू मावशीला वाटत होतं.
किती वर्ष गेली पण इंदू मावशीच्या मनातून ती गोष्ट जाता जात नव्हती. तिला आठवत होतं, आपल्या सासूबाई वारल्या त्यानंतर संसाराची सगळी जबाबदारी हिने उचलली. हातात पैसे नसायचे! नावाला घराची मालकीण पण अवस्था बिकट होती. नवऱ्याची तैनात सांभाळून संसार रेटत होती. एखाद्या वेळी त्याने चहा मागितला, पाणी मागितलं आणि मिनिटभर हिला द्यायला वेळ झाला तरी पाठीत दणका बसायचा. कितीतरी वेळा दुखरी ढोपरं हुळहुळत असायची तिची पण कोणाला शब्द बोलायची बिशाद नव्हती.
त्या दिवशी तर सगळ्याचा उचांक झाला होता. संध्याकाळची वेळ होती. मुलं मांडीवर एका खोलीत कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत होती. इंदू मावशी स्वयंपाकात गुंतली होती. चुलीवरचं कालवण रटरटून उकळत होतं. एकीकडे इंदू मावशी परातीत भाकरी बडवत होती. बाहेर दरवाज्यापाशी नवऱ्याची चाहूल लागली म्हणून पदराला हात पुसत ती लगबगीनं बाहेर आली. बघते तर त्याला स्वतःचा तोल सावरता येत नव्हता. दारू पिऊन आला होता.
"आता कमी करा हे पिणं! मुलं आहेत घरात! काय म्हणतील ती?" कधी नव्हे ते इंदू मावशी बोलून गेली. झालं! आधीचं काय म्हणावं तसं त्यात हे बायकोकडून ऐकून घेणं म्हणजे त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली होती. तिरमिरीत त्याने पायातली कोल्हापुरी चप्पल काढली आणि तिच्या गालावर सटकन मारली. तिने गालावर हात धरुन धीर करून म्हणलं,

"कसला हा तिरसट स्वभाव! वयाचं काळाचं तरी भान आहे का तुम्हाला? घरात मुलं आहेत, आता तरी राग आवरा जरा." इंदू मावशीचा संताप झाला होता नुसता.
"मला तोंड वर करून बोलतेस? कुठून आणलीस इतकी हिंमत? आपली पायरी ओळखून राहायचं माणसानी. कोणाच्या जीवावर बोलतेस माझ्याशी? त्या शेजारच्या तुकारामाच्या घरी जातेस नाहीका माझी पाठ फिरल्या फिरल्या! थांब आज पाहतोच कशी घरातून निघतेस बाहेर ते!" त्याचा राग अनावर झाला होता. पहिल्यापासून मी म्हणेन तिचं पूर्व दिशा अश्या परिस्थितून मोठं झालेल्या त्याला आज तिने बोललेला शब्द अन शब्द ठार करत होता. त्याचं रागाच्या भरात त्याने न्हाणी घर गाठलं.
इकडे पदराला अश्रू पुसत आपल्या नशिबाला दोष देत इंदू मावशी चुलीजवळ येऊन बसली. मगाशी तव्यावर ठेवलेली भाकरी एव्हाना जळून खाक झाली होती. शेजारच्या तुकाराम भावजींच्या घरी जाण्याचा ह्यांना इतका त्रास होत असेल असं तिला वाटलंही नव्हतं. तुकाराम भावजी सज्जन गृहस्थ होते. सीमा वहिनी तर जाऊबाई असून बहिणीची माया तिला देत होत्या. सासूबाई गेल्यावर मनातले उमाळे मोकळे करायला तिचं तिची हक्काची दोन माणसं होती पण आज ह्यांनी त्यावरही भाष्य केलं होतं.
मगाशी रागात न्हाणीघरात गेलेला इंदू मावशीचा नवरा अचानक शिव्यांची लाखोली वाहत स्वयंपाकघरात शिरला. ही पाठमोरी होती. जळून कोळ झालेल्या भाकरीकडे शून्य नजरेनं पाहत होती. हा मागून आला आणि तिला केस गच्च पकडून तिथून उठवलं. उठवलं कसलं! खेचून बाहेर आणलं. ती गयावया करत होती. केविलवाणं रडत होती. नं केलेल्या चुकीची माफी मागत होती पण त्याचं काळीज दगडाचं होतं जणू. त्याने लाकडं फोडण्याच्या कोयत्याने एका क्षणात तिच्या लांबसडक केसांवर घाला घातला. तिची कंबरेपर्येंत लांब वेणी एका क्षणात विलग झाली. मस्तकात एकंच भयानक कळ उठली. ती जागींच बेशुद्ध झाली.

दोन तीन दिवस असेंच गेले. सावकाशीने तिला शुद्ध आली. तुकाराम भावजी मुलांचा अभ्यास घेत होते. सीमा वहिनी इंदू मावशीजवळ बसून होती. घडलेला प्रकार आठवून इंदू मावशी सीमा वहिनीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली आणि त्याचा तिटकारा घेऊनचं पुन्हा उभी राहिली. सहा आठ महिने तिने स्वतःला माडीवर कोंडून घेतलं. कोणाच्यात येणंजाणं बंद होतं. कोणी भेटायला आलं तरी ती सामोरी गेली नाही. अश्या भुंड्या डोक्यानं समाजात कशी वावरली असती ती?
दिवस सरत होते आणि त्याला त्याच्या अघोरी कृत्याची लाज वाटू लागली. त्या दिवशी तो पहिल्यांदाचं इंदू मावशीच्या खोलीत जाऊन मनमोकळं रडला. तिने क्षमा करावी म्हणून अजीजी करू लागला पण आता इंदू मावशीच्या मनातून तो पार उतरला होता. ती निर्विकार झाली होती. ती ऐकत नाही हे पाहून तो घरातून निघूनही गेला. तिनेसुद्धा शब्दाने त्याला कुठे चाललात विचारलं नाही कि थांबवायचा प्रयत्न केला नाही.
वर्षभरानं तो परतला. जसा गेला तसा आला असंच इंदू मावशीला वाटलं. त्याने एका गुरूंची दीक्षा घेतली होती. घरात आल्या आल्या त्याने घरात बैठकीच्या खोलीत सगळीकडे गुरूंचे फोटो लावले. अंगारे धुपारे वरचेवर होऊ लागले. ती मात्र अलिप्तपणे सगळं फक्त बघत होती. दिवस लोटले. लोकं त्याला सज्जन साधू मानत होती इंदू मावशी मात्र त्याच्या वाऱ्यालासुद्धा उभी राहायची नाही. तिने संसार केला पण सगळं अलिप्तपणे. रस नसल्यासारखं. करायचं म्हणून सगळं करत गेली.
आज देवाघरी जायचं बोलावणं आलं होतं तरी ती अलिप्तचं होती. कोणत्या व्यक्तीत गुंतावे असं कोणीचं कधीचं नव्हतं आणि आता तर ह्या क्षणी अगदींच कोणी नव्हतं. तरीसुद्धा प्राण जात नव्हता. आत्मा तिथल्या तिथंच घुटमटत होता. तिचं तिलाही कळत नव्हतं कि नेमकं कशाकरता वाट पाहतोय आपण?
इतक्यात जमलेल्या लोकांमध्ये गडबड सुरु झाली. कोणीतरी म्हणालं,
"अरे बाजूला व्हा सगळे. तुकाराम काका आलेत. कशाला आलात काका? किती थकला आहात तुम्ही. नसता व्याप कशाला करता!"
मृत्यूशैयेवर पडलेल्या इंदू मावशीचे कान जागे झाले. तुकाराम भावजी आले! तिच्या अंतर्मनापर्येंत बातमी पोहचली. चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य पसरलं तिच्या. नकळत तोंडातून एक अस्फुटसा हुंकार बाहेर पडला. इंदु मावशी ज्यावेळी सासरी आली त्यावेळी हा पंधरा सोळा वर्षांचा मुलगा तिला म्हणाला होता,
"इंदू बाई, तू माझीचं बायको होणार होतीस पण आपल्या पत्रिका जुळल्या नाहीत." सगळं आठवून इंदू मावशी भाबडेपणानं आत्ताही मनातल्या मनात हसत होती. तिला सगळं आठवत होतं. त्या दोघांचं ते बालपण! एकत्र खेळणं! मग तुकाराम भावजींचं लग्न! तिची सीमा वहिनी! सगळं लक्ख आठवत होतं. इंदू मावशी त्या गोष्टीत रमली होती. तुकाराम काका काठी टेकत इंदू मावशीच्या पलंगाजवळ आले. तिच्या कानापाशी वाकून म्हणाले,
"इंदू, कशाला थकल्या शरीराला त्रास देतेस. सीमा बघ कधीपासून वाट पाहतेय तुझी वर देवाघरी! तू पुढे हो मी पण आलोच तुझ्या मागून! बघ हे पवित्र गंगाजल घे आणि शांत झोप पाहू!" असं म्हणून तुकाराम काकांनी स्वतःच्या हाताने गंगेचं पाणी इंदू मावशीच्या मुखात घातलं. इंदू मावशीचा थकलेला आत्मा थंड झाला. तिचा जीव शांत झाला.
इंदू मावशीचा मुलगा म्हणाला,"काका बहुतेक तुमच्या भेटीसाठी जीव अडकला होता आईचा. तुम्ही आलात आणि सुटली!"
संपूर्ण.
©️®️सायली पराड कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा