परत फिरा रे
भाग -२
(भाग-१ वरुन पुढे.विवेक खाटेला खिळला वरुन पुढे..)

विवेक रिटायर्ड झाला.पेंशन होतीच.वीणाचे बुटीक म्हणजे बीजाचा वटवृक्ष झालेला.तिने चार लोकांना रोजगार देवून त्यांच्या संसाराला हातभार लावलेला.ओढाताण व्हायची पण सगळेच बंद केले तर घरी करमणार नाही म्हणून तिने स्वतः काम करणे अगदी कमी केले पण बुटीक सुरु ठेवले.विवेक बाहेरची सगळी कामे करायचा आणि बुटीकमधे येवून बसायचा.
छान समाधानी जीवन होते.त्यांना खूप अभिमान होता मुलं शिकली.एवढ्या उच्च पदावर पोहचली याचा.त्यांचं कौतुक करतांना थकत नव्हते ते.
पण एक दिवस अचानक विवेकला थरथरी सुटली,हातपाय ताठ झाले.तोंडातून फेस यायला लागला.तातडीने दवाखान्यात भरती केले.पॅरॅलिसिसचे निदान झाले.औषधोपचार झाले.फिजिओथेरपी झाली.पण कायमचं अपंगत्व आलं.त्याचं बोलणं समजत नव्हतं.वाॅकर घेऊन घरातल्या घरात चालायचा.
त्यावेळी वीणाने मुलांना फोन करून परिस्थितीची गंभीरता सांगितली.पण सुटीचे कारण देत दोघेही आले नाही. आता बरे आहे नं नंतर बघु म्हणत दोघांनीही वेळ निभावली.सगळा पैसा दोघा मुलांनीच लावला. एक दिवसाचा आणि एक रात्रीचा केअरटेकर होता त्यांचं सगळं करायला.पैशाला कमी नव्हती.सगळ्या कामांना,स्वयंपाकाला बाई.
तरी मन अशांत होतं.पैशाची सगळं विकत घेता येईल समाधान नाही घेता येत.ते आतून खूप दुखी होते.विवेक सारखा विशू आणि प्रशु करायचा .बोलता येत नव्हते तरी ओठांच्या हालचालीने हातवार्याने सांगायचा.
विवेकला मुलांची आठवण यायची. त्यांना भेटावेसे वाटत होते.तो सारखा वीणाला म्हणायचा फोन कर फोन कर.बोलाव त्यांना.वीणा धीर द्यायची येणार आहेत.
पण आज सकाळीच हात जोडून तो खुणेनेच काही सांगत होता.वीणा विचारत होती," मुलांना बोलवायचे का?"
तर होकारार्थी मान हलवली.
तिलाही परिस्थिती दिसत होती.आता तो खूप क्षीण झाला होता.खाणे नाहीच्या बरोबर. फक्त पेयपदार्थ.
वीणाने विचार केला नंतर रुखरुख राहिल.आता कमीत की डोळ्यानी एकमेकांना पहातील तरी.
त्यांना समाधान वाटेल.म्हणून तिने विशुला फोन केला नंतर प्रशुला पण करणार होती.विशु फोनवर तुटक तर बोललाच आणि त्याच्या बोलण्यात जराही आपुलकीची ओल नव्हती.
"अगं आई किती दिवसांपासून असे चालु आहे त्यांचे.तुच विचार कर असं येऊन राहणे किंवा परत परत येणे जमणार आहे का ?नसतो गं एवढा वेळ.पैसे पाठवत आहे नं आम्ही दवाखान्यात राहू दे.तुलाही त्रास नको.नाही जमणार माझे येणे"

वीणा - त्रास...?बापाचं करायलाही त्रास पडतो यांना.वरतून मलाही सांगतात दवाखान्यात राहू दे.आज त्यांच्यावर वेळ आहे उद्या माझी वेळ येईल तेव्हा ?
आज मी तरी आहे त्यांचे करायला...तिला खूप रडायला येत होते.
अगतिक,भयावह भविष्यकाळ डोळ्यासमोर नाचत होता आणि भूतकाळ....तो मनःपटलावरून पुसता पुसल्या जात नव्हता.
क्रमशः
बाकी पुढील भागात. भाग-३मधे
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा