Login

पेशवाई पराठा

Paratha
साहित्य
प्रत्येकी ५० ग्रॅम काजू, भाजलेली खसखस, भाजलेले तीळ, खोबरा किस बारीक, थोडे तिखट, १चमचा आमचूर, १चमचा पिठी साखर, तेल, चविप्रमाणे मीठ, १वाटी कणिक, अर्धी वाटी मैदा.
कृती
खसखस, तीळ व काजू मिक्सरमधून रवळ काढा. ही पूड खोबरे किस व आमचूर साखर सर्व एकत्र मिसळा व त्यात थोडे तिखट व चविप्रमाणे मीठ घाला. हे झाले सारण. कणिक व मैदा यात मोहन घालून पुरीसाठी भिजवतो तसे भिजवा. चांगले मळून सारख्या आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळ्यासाठी दोन चमचे सारण घेऊन पुरनाच्या पोळीप्रमाणे पराठा करा. तव्यावर आवडीप्रमाणे तेल /तूप घालून दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजा. चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.