परतुनी येईल मी... भाग १

स्वच्छ निळ्या आकाशा खाली ती एकटीच उभी होती. निसर्गाची किमया, सुंदरता न्याहाळत तिचे डोळे चारी दिशांनी फिरत होते. नाजूक ओठांवर एक छान हास्य उमलले होते. मन आपसूकच प्रफुल्लित होत होते. समोर छान स्वच्छ पाण्याचे तळे होते. त्याच्या काठाशी ती जाऊन उभी राहिली. मोकळ्या हवेच्या स्पर्शाने त्यात मंद जल तरंग उठत होते. त्या तळ्याच्या शीतल पाण्यात तिने तिचे कोमल पाय बुडवले. गोऱ्या पायात नाजूक पैंजण पाण्यात भिजत होते. जणू त्या शीतल पाण्याशी त्यांचे जनोजन्मीचे नाते होते. तळ्यात एक सुंदर राजहंसाची जोडी विहार करत होती. त्यांना बघून ती त्यांच्या प्रेमात पडली.

तुम्हाला असं कधी वाटतं का की, अमुक एक घटना आधी घडून गेली आहे किंवा अमुक एखादी व्यक्ती जिला आपण पहिल्यांदाच बघतो किंवा भेटतो. तरी असे वाटते की, तिला किंवा त्याला आपण कुठेतरी बघितले आहे भेटलो आहोत. असं वाटतं का? वाटतं असेल तर आणि नसेल तरी ही कथा नक्की वाचा.
आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की परतून येतात. पुन्हा जन्म घेतात. करणं काहीही असो प्रेम वा सुड. ऋणानुबंध असतात ते पुन्हा भेटत. ह्या पर्वात आपण बघणार आहोत कथा पुनर्जन्माची. ऋणानुबंधांची, इतिहासातील पाने उलगडत जातील तस तशी रहस्यांची कोडी सुटतील. आता ह्यात प्रेम आहे की सूड? हे येणाऱ्या कथेतून कळेलच तुम्हाला.



स्वच्छ निळ्या आकाशा खाली ती एकटीच उभी होती. निसर्गाची किमया, सुंदरता न्याहाळत तिचे डोळे चारी दिशांनी फिरत होते. नाजूक ओठांवर एक छान हास्य उमलले होते. मन आपसूकच प्रफुल्लित होत होते. समोर छान स्वच्छ पाण्याचे तळे होते. त्याच्या काठाशी ती जाऊन उभी राहिली. मोकळ्या हवेच्या स्पर्शाने त्यात मंद जल तरंग उठत होते. त्या तळ्याच्या शीतल पाण्यात तिने तिचे कोमल पाय बुडवले. गोऱ्या पायात नाजूक पैंजण पाण्यात भिजत होते. जणू त्या शीतल पाण्याशी त्यांचे जनोजन्मीचे नाते होते. तळ्यात एक सुंदर राजहंसाची जोडी विहार करत होती. त्यांना बघून ती त्यांच्या प्रेमात पडली.


तळ्यापलिकडे एक छोटी टेकडी होती. रंगबेरंगी फुलांचे पांघरून घेऊन उभी. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा. त्यावर बागडणारी इवलिशी फुलपाखरे. निसर्गाची करणी काही औरच असते ना?


त्या टेकडी शेजारी काही अंतरावर एक मोठी हवेली होती. तिच्याच दिमाखात उभी. बघूनच अंदाज येत होता की, ती हवेली कित्येक वर्षांचा इतिहासाची साक्षी आहे. तिने परत तळ्या कडे बघितले.


हवेतील गारवा अंगाला झोंबत होता. तिने हळूच तिचा मलमली दुपट्टा दोन्ही हातांनी धरून मागे पकडला. गोऱ्या हाताच्या मनगटावर गोंदलेले ते तुळशीचे छोटेसे पान लक्ष वेधून घेत होते. तिने मान थोडी वर केली डोळे बंद केले आणि स्वतः ला त्या वाऱ्याच्या स्वाधीन केले. भरजरी तिचा घागरा अंगात घातलेली चोळी मागे उडणारा हातातील दुपट्टा. अशी ही लाण्यावती जणू अप्सराच. काही वेळ ती अशीच उभी राहिली. नंतर तिचे स्वतः ला त्या दुपत्यात बंदिस्त गेले. पण तो अवखळ वारा तिच्या नितळ चेहेऱ्याला हळुवार स्पर्श करत होता. तिच्या काळया, लांब कुरळ्या केसांतून हिंदोळे घेत होता. त्यामुळे तिच्या कानातील जड डूल मानेवर हलकेच आदळत होते आणि मनेवरचा तो तीळ अजूनच खुलून दिसत होता. हातात नक्षीदार बांगड्या, गळ्यात सोन्याची माळ. सगळं कसं मनमोहक होतं.


इतका सुंदर निसर्ग आणि त्यात उभी ती सुंदरतेची मूर्ती. बघून कोणीही प्रेमात पडावं अशी, फुलापेक्षा ही कोमल, अतिशय अनमोल, ऐन तारुण्यात बहरलेली नाजूक कळी. नावाप्रमाणेच स्वर्गीय रूप असलेली चित्रगंधा.


तितक्यात मागून तिला कोणी आवाज दिला.

"चित्रगंधा."

ती वळली तोच शांत वातावरण चिरत एक किंचाळी निघाली. क्षणात रक्ताची चिरकांडी तळ्याच्या पाण्यावर उडाली. राजहंसची जोडी, फुलपाखरू उडून गेले. इतकावेळ दिसणारा सुंदर निसर्ग अचानक कुरूप झाला. शीतल पाण्यात रक्ताचे ओघळ वाहत होते. स्वच्छ पाणी रक्ताने लाल होत होते आणि आसमंतात असुरी हास्याचे राज्य पसरले.


"आऽऽऽऽ." घामाने भिजलेला मिहिर झोपेतून जागा झाला.


"काय रे काय झालं?" मिहिरच्या रूममेट ने म्हणजे विशालने विचारले.


"काही नाही रे भयानक स्वप्न पडलं." मिहिर डोक्यावरचा घाम टिपत बोलला.


"हो का? पण काही वेळा पूर्वी झोपेत तू तर गोड हसत होतास. बघितलं तुला मी. मला वाटलं एखादी सुंदर मुलगी आली की काय स्वप्नात."


"हो रे, मुलगीच आली होती काय तो निसर्ग आज पर्यंत बघितला नाही असा आणि त्यात उभी ती, पण तिचा चेहेरा नीट दिसला नाही पण काय ते तिचे तेज होते. एखादी अप्सराच जणू." मिहिर त्या स्वप्नात परत हरवला.


"ओ हॅलो. इतकं ते स्वप्न छान होतं तर असा घाबरून का उठलास?" विशाल त्याच्या जवळ जात बोलला.


"अरे मध्येच कोणीतरी तिला आवाज दिला, तिने मागे वळून बघितले, जोरात किंचाळली क्षणात जमिनीवर ल रक्तच रक्त सांडले आणि मी हा असा घाबरून उठलो. कळलं नाही नक्की काय झालं. पण काहीतरी भयंकर असेल." मिहिरला परत घाम फुटला.


"काय नाव होतं रे तिचं?" विशालने उत्सुकतेने विचारले.


"नावं? अरे काहीतरी हाक मारली होती. पण आता आठवत नाहीये मला. पण नाव देखील छान होतं हे मात्र नक्की." मिहिर नाव आठवत डोकं खाजवत बोलला.


"बरं मग कोणी आवाज दिला तो तरी दिसला का?" विशाल अजून जाणून घेण्याच्या स्वरात बोलला.


"नाही रे, त्याचा पण चेहेरा नीट दिसला नाही." मिहिर बोलला.


"काहीतरी तर दिसलं असेल ना? कसा होता?.उंची, कपडे काहीतरी तर आठवत असेल तुला?" विशाल अधीर होत बोलला.


"नाही रे काहीच आठवत नाहीये. फक्त आवाज आठवतो त्याचा. पण तू इतका त्याच्या बद्दल विचारतो आहे?" मिहिर बोलला.


"काही नाही रे. तू वाचत असलेल्या पुस्तकातील एखादं कॅरेक्टर आलं का स्वप्नत ते बघत होतो. चल, नको इतका विचार करुस स्वप्नच आहे ते. काहीतरी ऐतिहासिक पुस्तकं वाचतोस म्हणून असं स्वप्नं पडलं असेल." विशाल उठत बोलला.


"ह्म. बरोबर आहे. पण खरंच खूप छान वाटतं होतं रे. आहाहा. असं वाटतं होतं स्वापणातील तळ्याच्या पाण्याची शीतलता खरंच अनुभवतोय मी. टेकडीवर पसरलेल्या फुलांचा सुगंध अजूनही नाकात दरवळतो आहे माझ्या असं वाटतं." मिहिर आपल्याच विश्वास रमला होता.


"ओ, हॅलो. सकाळ झाली आहे. उठ आता नाहीतर ऑफिसला लेट मार्क लागेल. आधीच नवीन जॉब आहे आपला. त्यात उशीर नको." विशाल त्याला हलवत बोलला.


"हो बाबा. बरी आठवण केली. विसरलोच होतो की, आता आपण कॉलेजला नाही जात कधीपण दांडी मारायला." मिहिर उठून तयारीला गेला.


विशाल त्याला जाताना बघत होता. आपल्याच विचारात मग्न तो मिहिरच्या स्वप्नाचा विचार करत होता.


तर हा आहे मिहिर आणि त्याचा मित्र विशाल. ह्यांची मैत्री कॉलेजच्या शेवटच्या वर्षी झाली. तसे आधी पासून दोघे एकच कॉलेजला होते. पण मैत्री नव्हती त्यांच्यात. एका कार्यक्रमाच्या दरम्यान दोघांची ओळख झाली आणि मग मैत्री. ती पण इतकी घट्ट मैत्री की दोघांनी एकच कंपनी मध्ये जॉब लागेल अशी कंपनी निवडली आणि आता महिना भरा पासून दोघे नोकरीच्या ठिकाणी म्हणजे मुंबईला एकाच फ्लॅट मध्ये राहत होते. दोघांचा जास्तीत जास्त म्हणजे जवळ जवळ दिवसाचे चोवीस तास वेळ सोबत जात असेल. मिहिर विशाल पासून काहीच लपवत नसे. दोघे एकमेकांशी सावली झाले होते.


तर मित्रांनो कशी वाटते आहे नवी कथा? अजून पुढे बरेच काही घडणार आहे. त्यासाठी वाचत रहा परतुनी येईल मी.


© वर्षाराज

🎭 Series Post

View all