Login

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -36

Viraj Decided To Come Back To India.


आपण वाचत आहात गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!

(मागच्या भागात आपण वाचलं -
डॉक्टर साठे हेच आपल्या मॉम चा अनी आहे, हे कळल्यावर रावी विराजला फोन करते. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मदत करण्याचे विराज तिला आश्वासन देतो.
आता पुढे.)

**********


"गुड! कसला विचार न करता निवांत झोप आता. मी ऑफिसला निघतो." तो.

" विराज, तुला रिंग घ्यायची होती ना? "
तिने आठवण करून दिली.

" हम्म! आता असू दे, प्लॅन जरा चेंज झालाय. नंतर बघू. निघू मी? "
तो.

त्याला बाय करून तिने फोन ठेवला.



"गुडमॉर्निंग! मॉम."
सकाळी कॉलेजला निघताना सुमीची व्हाट्सअप ट्यून वाजली.
तिने बघितले तर, तो विराजचा मेसेज होता.
तिनेही हसऱ्या चेहऱ्याच्या स्मायलीसह गुडमॉर्निंगचा रिप्लाय दिला.

"मॉम म्हटले तर चालेल ना?"
त्याचा परत मेसेज आला.

तिने अंगठा वर केलेला इमोजी पाठवला.

"थँक्स! मला तुमचा एक फेवर हवा होता, आज रात्री थोडे उशीरा मी कॉल केला तर चालेल?" त्याचा मेसेज.

"नो प्रॉब्लेम!" ती.

" फक्त एक, रावीला ह्यातलं काही कळू देऊ नका, प्लीज." तो.


सुमीला हसू आलं. `प्रेयसीच्या आधी तिच्या मॉमला पटवायला बघतोय हा तर.´तिच्या मनात आलं.
तिने ओके म्हणून रिप्लाय पाठवला. त्यानेही लगेच `थँक यू मॉम!´म्हणून मेसेज केला.


काहीवेळाने एकमेकांना बाय म्हणून दोघेही ऑफलाईन गेले.



"गुडमॉर्निंग! सर." आत प्रवेशत रावीने सरांना ग्रीट केले.

"व्हेरी गुडमॉर्निंग डॉक्टर."
तिच्याकडे बघून ते गोड हसले.


त्यांच्याकडे बघून उगाच डोळे भरून आले तिचे.

`ह्या वयातसुद्धा किती मेन्टेड ठेवलेय ह्यांनी स्वतःला? बघून कुणाला शंकाही येणार नाही की हा माणूस मनात एवढं मोठ्ठ दुःख दडवून जगतोय.´

` मॉमजवळ किमान मी तरी आहे, तिला समजून घेणारी. पण ह्यांचं तसं नाहीये. एवढया वर्षांत पहिल्यांदा ते त्यांच्या सुमीबद्दल बोलले, तेही मी त्यांना तिच्यासारखी दिसते म्हणून. मी जर यांच्या आयुष्यात आले नसते तर त्यांचं दुःख कधी बाहेर आलंच नसतं का?´

ती स्वतःशी विचार करत खुर्चीवर बसली.

` डोन्ट वरी, आता रावी आलीय ना तुमच्या दारी! सगळं नीट होईल आता.´

त्या विचारासरशी आपसूकच तिचे ओठ रुंदावले.

तिच्या चेहऱ्यावरचे भाव ते नकळत टिपत होते. दोघांची नजरानजर झाली, तसं नजरेने `काय झाले?´ म्हणून त्यांनी विचारले. तिने खाली बघत `काही नाही´ म्हणून मान हलवली.

ओपीडी सुरु झाली होती, ती पेशंट तपासण्यात मग्न झाली.




सुमतीने ने कॉफीचा शेवटचा घोट संपवून मग खाली ठेवला, तेवढ्यात मोबाईलच्या स्क्रीनवर विराजचे नाव झळकताना दिसले.


"हां, बोल काय म्हणतोस?"

तिच्या प्रश्नावर त्याने पहीले आपला कान पकडला.

" सॉरी हो मॉम, माझ्यामुळे तुम्हाला इतका वेळ खोळंबून राहावे लागले. "

"हक्काने मॉम म्हणतोस आणि वरून सॉरीदेखील?" ती हसून म्हणाली.

"चालायचंच रे, तसेही झोपेचे खोबरे होण्याचे वय माझे. त्यामुळे तू केव्हाही बिनधास्त मला कॉल करू शकतोस."


" तुम्ही ना अगदी रावीसारख्या आहात, अवखळ, मनमोकळ्या. तुमच्याशी बोलल्यानंतर कसं छान प्रसन्न वाटते. " तो.

"हे बघ विराज, मुलगी पटवण्यापूर्वी तिच्या आईला पटवण्याची ट्रिक जुनी झालीय हं, तेव्हा काय ते स्पष्ट बोल."
सुमी त्याच्याकडे बघून मिश्किलपणे म्हणाली.

"नाही हो, तसं नाहीये. मी आपला साधासरळ माणूस. माझ्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळलंय ना, त्याबद्दल हेल्प हवी होती."
तो लहानसा चेहरा करून म्हणाला.

"ताकाला जाऊन भांडं काय लपवतोस? बोल कसली मदत हवी तुला?"
सुमी.

"मॉम, मला ना तुम्हाला सासूमॉम करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला चालेल ना?"
त्याने थेट विचारले.

सुमीला हसायला आले, इतके की हसून हसून डोळ्यात आलेले पाणी गालावर ओघळले.

"चालेल काय रे? मला तर धावेल. पण जिच्याबद्दल बोलतोय तिला विचारलंस का?"
ती.

"त्यासाठीच मदत हवीय तुमची. तिकडे परतल्यावर डायरेक्ट लग्नाची मागणी घालेन म्हणतोय, तेव्हा मला तिच्यासाठी सुंदर अशी रिंग घ्यायला हेल्प करा."
तो म्हणाला.


तिला वाटलं, `किती छान यांची पिढी! मनात आलं की दिले बोलून. आपल्या वेळेस तसं नव्हतं, तरी बाबांना मी दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही हे ठामपणे कसं सांगू शकले? ´

" मॉम, बघताय ना, हे काही डिजाईन्स! तुम्हाला कोणती आवडतेय ते सांगा? "

त्याच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली.

एकापेक्षा एक सरस डिजाईन्स तो दाखवत होता. रावीला आवडेल अशीच एक नाजूक चणीची  डायमंड रिंग तिने निवडली. विराजला देखील ती आवडली होती, पेमेंट करून त्याने ती रिंग घेतली.

" केव्हा येतो आहेस तू परत?"
फोन ठेवण्यापूर्वी सुमीने त्याला विचारले.

" बस मॉम, पंधरा दिवसात तुमच्या दारात हजर असेन."
तो.

" यू आल्वेज वेलकम डिअर. पण तिथले तुझे काम आटोपले ना? उगाच लवकर परतण्याचा अट्टहास करू नकोस."

ती त्याला समजावत म्हणाली.

"मॉम, खरं सांगू? जेव्हा अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता ना, तेव्हा मला भारतात परत येण्याची इच्छा नव्हती. पण त्यानंतर रावी माझ्या आयुष्यात आली, नी जगण्याचे सगळे संदर्भच बदलले. तिला सोडून जाताना माझा पाय निघत नव्हता, तरीही मी आलो इथे. पण आत कळतंय, तिच्याशिवाय नाही राहू शकत मी. सो, आय एम डूइंग पॅक अप फ्रॉम हिअर अँड विदिन फिफ्टीन डेज,आय विल बी देअर!"
तो मनमोकळेपणाने बोलत होता.

"अरे, पण असा मध्येच येतोस तर मग तुझ्या प्रोजेक्टचं काय?" काळजीने तिने विचारले.

" डोन्ट वरी, सासूमॉम! इथली सर्व सोय लावूनच येतोय मी. आणि आपली माती, आपली माणसं! हे पटलंय मला. अँड लेट मी टेल यू वन थिंग, एव्हरीथिंग इज फेअर ईन लव्ह अँड वॉर!"
तो डोळे मिचकावत म्हणाला.

"आणि तसेही प्रेमात पडलोय तर ते निभवावे लागेल ना?"
तिच्या डोळ्यात पाहत त्याने प्रश्न केला.
त्याचे बोलणे ऐकून नकळत तिला तिच्या अनीची आठवण आली अन तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली.

" आय एम सो प्राऊड ऑफ यू विराज अँड सो हॅपी आल्सो! माझ्या लाडोबाला तुझ्यासारखाच मुलगा हवा होता आणि तो मिळालाय. एका आईला आणखी काय हवं असतं? "
ती डोळे पुसत म्हणाली.

" डोन्ट बी सो टिपिकल मॉम! तुमचा लाडोबा माझाही लाडोबा झालाय आता."
तो हसून म्हणाला, तशी ती सुद्धा हसली.

"येतांना कळव रे मला, तुझ्या स्वागताची तयारी करावी लागेल ना." ती म्हणाली.

" हो, सांगेन. पण हे आपल्या दोघातलं टॉप सीक्रेट असेल, तुमच्या बच्चूला कळायला नको हं. "
तो.
" नाही कळू देणार रे बाबा, प्रॉमिस. "

तिने म्हटले आणि मग काही वेळाने त्यांचा कॉल डिस्कनेक्ट झाला.




"काय झालं डॉक्टर? अशी का बघते आहेस?"
त्यांच्याकडे एकटक बघत असणाऱ्या रावीला ते म्हणाले.

" काही नाही सर." तिने नजर वळवली.

" तुझी नजर काहीशी वेगळी वाटतेय आज. मी तुला माझ्या पास्टबद्दल बोललो, तेव्हापासून माझ्याकडे बघण्याचा कन्सर्न बदललाय असं वाटायला लागलंय. प्लीज रावी, अशी नको बघू. सिम्पथी नाही आवडत गं मला."
ते.

" नो सर, तसं नाहीये. ऍक्च्युअली पुढल्या महिन्यात माझं कॉनव्होकेशन होईल नी मग त्यानंतर मी नसेन ना तुमच्यासोबत इथे, म्हणून जरा वाईट वाटतेय. "
ती.

"हो खरंच की, माझ्या कसं लक्षात नाही आलं हे. पण मी तुला असं सोडणार नाही रावी, तू हवी आहेस मला, माझी लेक म्हणून रॅदर माझी सून म्हणून."
तिच्याजवळ येत ते म्हणाले. तिने चमकून त्यांच्याकडे पाहिले.

"तुझ्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत केव्हाच्या पोहचल्या, एकदा विराजसमोर मोकळी हो ना."
तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत ते म्हणाले.

"तुला सांगू, खरं प्रेम हे त्या पारिजातकासारखं असतं बघ, सुवासिक! त्याचा गंध आपोआप सगळीकडे पसरतो. तुझ्या प्रेमाचा हा पारिजात विराजच्या ओंजळीत टाक एकदा, त्याचीही ओंजळ या सुगंधाने भरून वाहू दे. विराजसोबत तुझे नाव जुळेल, तेव्हा खूप आनंद होईल मला. हवं तर मी तुझ्या घरी मागणी घालायला येईन."
तिच्या डोळ्यात बघत ते म्हणाले.


तिने लाजून मान खाली घातली.


"अरेच्चा! तुला लाजताही येते तर. कीप इट अप डॉक्टर, तू माझ्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी सून म्हणून येशील त्या दिवसाची वाट बघेन मी. चल, आता राऊंडवर जाऊयात."
ते बाहेर निघत म्हणाले.


` सर, लक्ष्मीच्या पावलांनी यायला मलाही आवडेल, पण तसं नाही झाले तरी तुमच्या लक्ष्मीला मात्र लवकरच तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. आय प्रॉमिस यू!´

पाठमोऱ्या जाणाऱ्या त्यांच्याकडे बघत ती मनात म्हणाली.



विराजचे अमेरिकेतील प्रोजेक्ट जवळपास त्याच्या हातात आले होते, पण त्याला सध्या ब्रेक हवा होता. नजरेसमोरून रावीचा चेहरा जाता जात नव्हता. त्याने मनाशी पक्के केले, आता मिशन एकच..


`बॅक टू इंडिया!´


तशी त्याची हालचाल सुरु झाली होती.

.

.

.

क्रमश :


************

तर आता  विराज अमेरिकेहून  निघतोय...  काय असेल त्याचा पुढचा प्लॅन?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा, आपला आवडता पारिजात..

हा पार्ट आवडला तर कमेंट आणि लाईक करा. फेसबुकच्या वाचकांनाही विनंती, पार्ट आवडला तर नक्कीच एक लाईक करत चला. तुमचे एक लाईकसुद्धा मला पुढे लिहायला नवी प्रेरणा देत असते.

माझे इतर लेख वाचण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता.


🎭 Series Post

View all