आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!
*********
`बॅक टू इंडिया!´
सकाळी हॉस्पिटलला निघण्यापूर्वी रावी विराजला कॉलवर विचारत होती.
त्याने लगेच कलटी मारली.
ती.
आळसावलेल्या आवाजात तो म्हणाला.
" आता झोपू का मी?" त्याचा प्रश्न.
जवळजवळ ती ओरडलीच.
" आपलं काय ठरलं होतं? मॉम आणि सरांना एकत्र आणायला प्लॅनिंग करणार होतो ना आपण? आता काय चाललंय तुझं? "
थोड्या रागाने ती.
तिचा तसा चिडका स्वर ऐकून त्याला जाम मजा येत होती.
"ठीक आहे, नकोच येऊ तू. माझे मी बघून घेईन. मी एकटीने करू शकते सगळं हॅन्डल आणि ऐक, यापुढे आपली पार्टनरशिप संपली आता."
तिने फणकाऱ्याने कॉल कट केला.
तो काही बोलणार, पण कॉल केव्हाच बंद झाला होता.
`सॉरी पार्टनर, तुला दुखवायचं नव्हतं मला, पण मग सरप्राईज द्यायचंय तर एवढं करावंच लागेल ना? ´
मोबाईलमध्ये तिचा फोटो बघून तो बोलत होता.
तो तिच्याच तंद्रीत गुंग झाला होता.
संध्याकाळची कातर वेळ, कितीही नको म्हणताना त्याच्या आठवणीत गुंतलेली ती आणि कानात गुंजणारा लतादीदींच्या आर्त स्वरातील गाणी ..!
ते ऐकताना तिच्या डोळ्यात हेलकावणारे पाणी गालावर आलेच.
"सगळा मूड घालवला ना."
श्रुतीकडे बघत ती.
तिच्याजवळ बसत तिने शांतपणे विचारलं.
ती चिडून बोलली खरी पण अश्रुंचे बरसणे चालूच होते.
सकाळी रावी हॉस्पिटलला गेल्यानंतर तिला विराजचा कॉल आला होता…
" हे, हाय श्रुती, इट्स विराज."
तो.
तिचे प्रश्नावर प्रश्न सुरु झाले.
तो म्हणाला.
श्रुतीने त्याला विश्वास दिला तेव्हा कुठे तो निवांत झोपू शकला.
रावीकडे बघत तिने विचारले.
आपले नाक पुसत ती म्हणाली.
श्रुती गेल्यानंतर बिछान्यावर पडल्यापडल्या ती पुन्हा सरांचा विचार करू लागली.तिला हॉस्पिटलचा पहिला दिवस आठवला. सर आणि विराज, दोघेही तिच्या आयुष्यात एकाचवेळी आले होते, हे आठवून नकळत तिच्या ओठांवर हसू उमटले. डीजीओची दोन वर्ष कशी भराभर संपत आली, तिलाच उमगेना. ह्या दोन वर्षांत काय काय घडलं होतं. सरांचा खाल्लेला ओरडा, विराजशी झालेले भांडण, नंतर त्यांच्यातील मैत्री. तिची ती सीझरची पहिली, त्यात तेवढीच कॉम्प्लिकेटेड केस, आणि त्यामुळे सर आणि विराजचे उलगडलेले नाते. सगळंच कसं अकलनीय!
या सगळ्या आठवणीत तिला तो लाडवाचा प्रसंग आठवला. सरांच्या वाढदिवसाला तिने डब्यातला लाडू दिलेला, तेव्हा पहिला घास घेताक्षणी त्यांचे भाव बदलले होते.
`इतक्या वर्षानंतर सुद्धा तिच्या हातची चव त्यांच्या जिभेवर अजूनही रेंगाळत असेल का?´
तिच्या प्रश्नाचे उत्तर तीच देत होती.
बेसनाच्या लाडवांसोबत सरांचा वाढदिवस पुन्हा नजरेसमोर आला आणि तिचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. हातातल्या मोबाईलमध्ये ती कॅलेंडर बघायला लागली... त्यांचा वाढदिवस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला होता.
वॉव! त्याच दिवशी ह्या दोघांना भेटवलं तर?´
स्वतःला सुचलेल्या कल्पनेने तिला खूप आनंद झाला.
`डॉक्टर रावी, यू आर रिअली ग्रेट!´
आपल्या हाताने स्वतःचीच पाठ थोपटायला जाणार, तोच तिच्या हातातला मोबाईल खणखणला.
"हॅलो, बच्चाs!"
पलीकडे रडवेल्या आवाजातील सुमी होती.
रावीच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव आले.
सुमीचा स्वर तसाच होता.
ती.
सुमी.
लगेच तिने कॉल बंद देखील केला.
.
.
.
क्रमश :
**********
काय झाले असेल सुमीला? का तिने एवढया तातडीने रावीला बोलावले? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात..
तोवर हा भाग कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा. तुमचे like सुद्धा मला पुढे लिहायला प्रोत्साहन देत असते.त्यामुळे fb पेजवर like करायला विसरू नका.
साहित्यचोरी गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या परवानगीशिवाय त्यांचे लेख शेअर करू नयेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा