पारिजात.. गंध प्रेमाचा..!
(मागच्या भागात आपण सुमी आणि अनीची भेट अनुभवली. पण त्यानंतर काही न बोलता ती तेथून निघून जाते. तिने असे का केले असावे, वाचा आजच्या भागात.)
******
त्यांच्या मनाचा वेध घेत विराजने विचारले.
आपली नजर खाली करत ते म्हणाले.
-विराज.
तो मंद हसून म्हणाला.
"थँक यू! राजा, मी लगेच निघतो." त्याला आलिंगन देत ते पळतच बाहेर गेले.
कारमध्ये इतका वेळ शांत बसलेली रावी घरात आल्याबरोबर तिला जाब विचारायला लागली.
अगदी मृदू आवाजात रावी बोलत होती.
ती स्वयंपाकघरात जायला वळली.
" तुझे डॉक्टर साठे म्हणजे माझा अनी आहे, गं."
तिचे डोळे पुन्हा भरून आले.
तिच्याजवळ येत ती म्हणाली.
"सॉरी मॉम, खरे तर मला नुकतेच काही दिवसांपूर्वी कळले. तुला सांगणार होते पण असे सांगण्यापेक्षा सरप्राईज द्यावं असं मला वाटलं."
आपले कान पकडत रावी छोटुसा चेहरा करून म्हणाली.
-रावी.
तिच्या मर्मावर रावीने घाव घातला.
"फरक पडतो बच्चा, तू लहान आहेस अजून. तुला नाही कळायचे."
"आणि आनंदी होते का म्हणून विचारलंस ना? हो होते मी आनंदी. तुझं माझं छोटुसं कुटुंब, सोबत अंगणातला पारिजात आणि भूतकाळातील माझा अनी.. हे आयुष्य पुरेसं होतं मला. आयुष्यभर मनात जपलेला अनी असा या वळणावर, ह्या रूपात भेटेल असं वाटलं नव्हतं गं मला."
मी सुखी होते ना रावी, का त्याच्याशी भेटवलंस?"
रडून सुकलेल्या डोळ्यात परत पाणी जमायला सुरुवात झाली.
"स्वतःलाच कितीदा फसवशील अगं? एकदा भूतकाळातून बाहेर पड ना. वर्तमानातल्या तुझ्या प्रेमाला पारखून तर बघ. सरांच्या डोळ्यातील भाव कळलेच नाहीत असे मला नको भासवू. जशी तू थांबलीस तसे तेही थांबलेत.. फक्त तुझ्यासाठी! आजवर त्यांनी स्वतःला थोपवलं होतं कारण तुझ्याकडे कधी परत येणार नाही असे आजोबांना त्यांनी वचन दिले होते. मनावर दगड ठेऊन ते वचन त्यांनी निभावलंय. पण तू हे का विसरतेस की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट पाहीन म्हणून त्यांनी तुलादेखील एक वचन दिले होते. मॉम, आजही ते त्यांच्या सुमीच्या वाटकडे डोळे लावून बसले आहेत गं. एक वचन तर त्यांनी पाळले, आता दुसऱ्या वचनाच्या पूर्ततेची तुझी पाळी आहे. खूप झाले आजवर, आता एक पाऊल तू पुढे टाकून तर बघ ना."
-सुमी.
" कोणत्या समाजाबद्दल बोलतेस मॉम? ज्या समाजाच्या भीतीपोटी आजोबांनी तुझ्या लग्नाला नकार दिला, त्या समाजाला तू कधीपासून घाबरायला लागलीस? आतापर्यंत एकटी जगली तेव्हा कुणीच विचारायला नाही आलं, आताही कोणालाच फरक पडणार नाही. इतक्या वर्षापासून प्रेमात आहेस, थोडं हातपाय हलवायला शिक जरा, नाहीतर नाकातोंडांत पाणी जाऊन उगाच तळाशी जाशील." तिचा हात हातात घेत रावी.
सुमी.
" नाही हं मम्मा. ते तर विराजचे सासरे होतील. तुझा अनी मला फक्त माझा डॅडू म्हणूनच हवाय." ती गोड हसून म्हणाली.
तिचा चेहरा लाजल्यासारखा झाला. "जरा जास्तच बोलायला लागलीस हं तू!" तिचे नाक खेचत ती म्हणाली.
इकडे "थँक यू! विराज." म्हणून ते बाहेर पडले. नेहमी आवडणारी कॉफी आज त्यांना नकोशी होती. अंगात अठरा वर्षाच्या तरुणासारखा उत्साह संचारला होता. कुणी डॉक्टर साठे म्हणून नव्हे तर आज केवळ सुमीचा अनी बनून तिला परत आणायचा निर्धार करून त्यांनी कार स्टार्ट केली. सुमीच्या भेटीने सगळ्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मनात एकच आस, कसलेही स्पष्टीकरण न मागता तिला सोबत आणायचे. एवढे दिवस एकटीने सगळं भोगलं आता तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद भरायचा. बस्स! ती सोबत हवीय, आणखी पुन्हा काही नको.
विचार करत ते ड्राईव्ह करत होते, तोच त्यांचा मोबाईल खणखणला. हॉस्पिटल मधून कॉल होता, इमरजन्सी केस असल्यामुळे त्यांना त्वरित बोलावले होते. इतका वेळ फुलपाखरू बनून उडणारे मन अचानक परत आपल्या जागेवर आले. आधी कर्तव्य महत्वाचे म्हणून त्यांनी आपली कार हॉस्पिटलच्या दिशेने वळवली.
.
.
.
क्रमश :
**********
आजच्या भागाने सुमी अशी अचानक का निघून गेली असावी, या शंकेचे निरसन नक्कीच झाले असावे, अशी आशा करते. तिच्या मनातील विचार तुम्हाला योग्य वाटले की नाही आणि आजचा पार्ट कसा वाटला, नक्की कळवा. सुमी आणि अनीची ही कथा निर्णायक वळणावर पोहचलीय. पुढचा पार्ट हा अंतिम असेल. तोवर वाचत रहा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद!