Login

परकाया  भाग २३

in this part jay and samira meet in the office

परकाया  भाग २३

क्रमश: भाग २२

जय जातानाच समीरा च्या आवडीचा चॉकलेट चा बॉक्स आणि तिच्या आवडीचा लव्हेंडर फुलांचा बुके घेऊन ऑफिस ला तिच्या आधी पोहचला आणि आधीच तिच्या डेस्क वर सर्व ठेवून तिची वाट बघत बसला .

इकडे वसू ला लॅच सिस्टिम माहित झाली होती .. तिने  येताना तिच्या जवळ कॅश आणली होती . ती घाबरत घाबरतच घरातून बाहेर पडली . काल रात्री जय ने नेलेल्या सुपर मार्केट मध्ये गेली आणि वाणी सामान , दूध , भाजी पाला , क्लीनिंग मटेरियल, कुकर ,शेगडी , तवा , पॅन   असे सर्व आणले . त्या सुपर मार्केट मधल्या मुलाने होम डिलिव्हरी दिली .

समीराच्या आधी राहुल ऑफिस ला आला .. जय आणि राहुल दोघे भेटले .. नॉर्मल गप्पा मारत बसले .

तेवढ्यात जय ची दिल कि धडकन आली .. जय मुद्दामून त्याच्या डेस्क  वर बसला आणि लॅपटॉप च्यामागून तिला नेहमी सारखा बघत होता

अहाहा काय ते सौदर्य .. कुरळे केसांना दाबून तिने एका पोनीटेल मध्ये बांधले होते ..दोन्ही साईडने एक बट बाहेर गालाला स्पर्श करून खुश होऊन नाचत होती . तिने घातलेला फॉर्मल ड्रेस  .. ब्राऊन कलर ची लिपस्टिक आणि काजल . क्युटनेस ओव्हरलोड .. बऱ्याच दिवसांनी जय तिला पाहत होता .. असाच जाऊन तिला एक घट्ट मिठी मारावी असेच त्याला वाटत होते पण तो ऑफिस मध्ये आहे ची   त्याला जाणीव होती .

समीराला डेस्क वर ठेवलेला बुके बघितल्यावरच कळले कि हे काम जय चे आहे .

तिने लगेचच जय कडे तिचा मोर्चा  वळवला

समीरा " हाय डिअर .. थँक्स फॉर माय फेव्हरेट फ्लॉवर्स . कसा आहेस ? नाईस टू सी यु "

जय " तू कशी आहेस ? आता अर्जेंट काम नसेल तर तू कॉफी ला येतेस का ? मला खूप बोलायचंय तुझ्याशी ?"

समीरा " उम्म .. आताच आले तर  लगेच नको .. मी सांगते तुला फ्री झाल्यावर "

समीराला पण त्याच्याशी खूप काही बोलायचे होते हे त्यालाही दिसत होते ..

जय " ठीक आहे .. "

समीरा ने तिचे  काम उरकले आणि ११ वाजता जय बरोबर खाली कॅन्टीन मध्ये गेली .. दोघेही त्यांच्या नेहमीच्या कोपऱ्यातल्या जागेवर गेले .. स्नॅक्स आणि कॉफी घेऊन बसले . राहुल ला पण त्यांनी बोलवले होते पण आज राहुल मुद्दामून आला नाही दोघांना नीट बोलता यावे म्हणून

मग जय तिला वसू प्रकरण नीट सांगू लागला .. मग नंदू च्या लग्नच हिच्या लग्नामुळे अडत होते .. मग आकाश  प्रकरण सांगितले .. मग वसू  ने दोन वेळा त्याच्या समोरच केलेला मरणाचा प्रयत्न हे सगळे त्याने तिला सांगितले .. आणि आता त्याने कोणत्या कारणासाठी तिच्याशी लग्न केलेय .. हेही सांगितले .. हे लग्न फक्त तिला जीवन जगण्यासाठी एक नवी दिशा मिळण्यासाठी आहे .. त्याच त्याच गोष्टी ज्या कि तिला त्रास देत होत्या त्यातून बाहेर काढण्यासाठी आहे .. आणि दोघांनी म्युचल अंडरस्टँडिंग करून केलेले आहे .. हे सगळे तिलाही मान्य आहे .. तुझ्या बद्दल ची पण तिला मी सगळी माहिती सांगितली आहे हे असे सगळे त्यांने समीरा ला  सांगितले ..

जय " आता तूच सांग मी जे केले ते चुकीचे केले का ?"

समीरा " सगळे मला मान्य आहे पण आता मला घरातून किती प्रॉब्लेम होईल .. माझे मॉम डॅड .. ज्या मुलाचे  आलरेडी लग्न झालेय त्याच्याशी रिलेशन ठेवून देतील का ? तूच सांग ? "घरातल्यांना कॉन्व्हिन्स करायला खूप कठीण आहेत या सगळ्या गोष्टी "

जय " हे बघ .. सत्य सांगितले तर  पटेलच कि त्यांना "

समीरा " जय .. मला असे वाटतंय हे सगळे आता पण इथेच थांबवू ..आणि आपण आता नॉर्मल फ्रेंड्स जसे पहिले होतो तसे राहू .. तू जे लग्न केले आहेस ते पूर्ण कर .. तुला वाटतंय तेवढे सोपे नाहीये हे सगळे .. अन तिच्या डोळ्यातुन अश्रू च्या धारा वाहू लागल्या .. हे शब्द बाहेर पडताना तिला खूप यातना होत होत्या ..  वसू ने सांगितल्या प्रमाणे तिला हे नाते आता संपवायचे होते ..

जय ने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले .. " जानु , मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय .. आणि तू .. तू जगशील का माझ्या शिवाय ?"

समीरा " मला हे एक्सेप्ट करावेच लागेल .. सगळ्याचं गोष्टी आपल्या मानसारख्या  होत  नसतात . आपली रिंग हरवणे .. तू मला किस करायला जातानाच तुझ्या बाबांच्या तब्बेती चा फोन येणे .. तू मला प्रोपोज केल्या केल्या तुला तिकडेच जावे लागणे .. तिकडे गेल्यावर तू अश्या सिचवेशन मध्ये फसणे कि त्यातून तुला बाहेर येण्यासाठी तुला लग्न करावे लागणे .. ह्या सगळ्या गोष्टी फार विचित्र वाटतात मला .. असे वाटतंय कि नियतीला , डेस्टिनी लाच आपल्या दोघांना एकत्र बघायचे नाहीये .. "

जय " आपली डेस्टिनी आपल्या हातात आहे .. आपण घडवू  आपल्याला पाहिजे तसे .. तुला माझ्या वर विश्वास नाहीये का ?"

समीरा " फ्रँकली स्पिकिंग .. नो .. मला आता दुसऱ्याचा अधिकार , दुसऱ्याच्या वाट्याचे सुख ओढून मिळवायचे नाहीये "

जय " अग .. नाहीये तसे काही .. तुला मी इतके सांगतोय .. "

समीरा " जय .. ती आधीच मनाने खचलीय .. तिला तुझा आधार हवाय .. जमलं  तर तिला प्रेम पण दे .. "

जय " समीरा .. माझा विचार कर जरा .. आम्ही दोघे फक्त मित्र आहोत ..  तुला कळत कसे नाहीये "

समीरा " आपण पण पहिले मित्रच होतो ना .. काश  कि त्या दिवशी मला प्रपोझ नसते केलेस .. आपली दोस्ती पण स्पॉईल केलीस तू "

जय " आणि प्रेम .. मी जे प्रेम तुझ्यावर करतोय .. तुझ्या साठी फील करतोय त्याचे काय ?"

समीरा काहीच बोलत नाही .

जय " तू एकदा तिला भेट तर .. तिला तुझी पण गरज आहे .. आपण तिला इकडे मस्त सेटल करू .. नोकरी मिळाली कि ती स्वतःच्या पायावर उभी राहिली कि तीच शोधेल तिचा लाईफ पार्टनर .. आपण दोघांनी नाही राहुल ला पण घेऊन तिघांनी मिळून तिला सपोर्ट करू .."

समीरा " ते तर करूच रे .. मी आपल्या बद्दल बोलतेय ..तू मगाच पासून माझ्याशी बोलतोय पण तू मोबाइल कडे बघतोयस .. जरासा फोन ब्लिंक झाला कि लगेच बघतोस का ? माहितेय ? तुझ्या डोळ्यात मला तिची काळजी दिसतेय ? तिला आज घरी एकटीला ठेवून आलास तर तिने तुला फोन केला तर तुझ्या कडून तो कॉल मिस नको होयला म्हणून ना "

जय " हो .. हेच कारण आहे .. कारण मला खरोखरच तिची काळजी आहे .. आता नाही म्हटले तरी ती माझी जवाबदारी आहे .. जोपर्यंत ती सेट होत नाही तोपर्यंत आपण लग्न पण नाही करू शकत .. हे जरी खरं असले तरी मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो हे हि सत्यच आहे "

समीरा " बस .. आता हा विषय आपण थांबवू .. अजून काही वेळ गेलेली नाहीये .. बघू थोडे दिवस .. काय गणित बदलतंय .. "

जय " म्हणजे ?

समीरा " म्हणजे ? आय एम नॉट युअर गर्ल फ्रेंड .. आपण फक्त फ्रेंड्स आहोत .. आणि आपण तिला पण आपल्यात घेऊ चौघे फ्रेंड्स आहोत ..तु मला जे प्रपोझ केलेस ते विसरून जा .. आणि जर सगळे व्यवस्थित झाले तर तू मला परत प्रोपोझ कर .. यावेळी मला अंगठी पण घाल आणि लगेच मला किस  कर .. मी  वाट बघेन त्या क्षणांची "

जय " मी आता प्रोपोझ नाही करणार तुला .. मी तुला पळवून नेणार आहे आणि डायरेक्ट लग्न  करणार आहे लवकरच .. मला थोडा वेळ दे "

समीरा " सध्या माझ्या मागे पण कोण लागले नाहीये कि मी लगेच तुला नाही म्हटले कि दुसऱ्या बरोबर जाईन .. पण हा एक वर्षात जर हे सगळे तू ठीक केलेस तर बरं आहे .. नाहीतर माझा तुला अलविदा असेल .. "

जय " मला वाटले कि तू मला समजून घेशील .. "

समीरा " जय .. काय अपेक्षा आहे तुझी माझ्या कडून ? तुझी बायको तुझ्या घरात तुझ्या बरोबर राहतेय .. तू माझ्या समोर लग्न करून आलायस .. तुझ्या हातात  तिने घातलेली रिंग दिसतेय तरी मी तुझ्या बरोबर प्रेयसी म्हणून राहू असे तुझे म्हणणे आहे का ? "

जय वैतागलाच ..” अरे यार .. हि वसू खरच  एक पनवती  आहे माझ्या आयुष्याला लागलेली .. सगळी माझी लाईफ स्पॉईल केली तिने .. आणि तू तिचे लग्न मोडावे म्हणून प्रे केलेस ते माझ्या किती अंगलट आलाय तुला काय माहित ?"

समीरा " जय शट अप , तू तिच्या समोर हा प्रस्ताव मांडलास  .. तिने नाही .. तिला कशाला बोलतोस "

जय " अग  .. हा प्रस्ताव मी मांडला म्हणून म्युचल अंडरस्टॅण्डिंग तरी झाली नाही तर अप्पांनी तिला माझ्या गळ्यात पर्मनंट बांधली असती .. हे डोके लावून मी मार्ग काढलाय "

समीरा " जय स्टॉप धिस  टॉपिक फॉर सम टाईम .. मला आता खुप त्रास होतोय "

जय " ठीक आहे .. आय नो .. चल जाऊ .. मला पण काम आहे आज "

बरा च वेळ काथ्याकूट काढून काही उपयोग झाला नाही ..

दोघेही खिन्न मनाने काम करायला आले ..

घरी वसू  ने सगळे घर छान साफ केले .. सगळे किचन अरेंज केले .. आणि संध्याकाळी जय येईल त्या वेळे आधी छान स्वयंपाक करून ठेवला ..

जय संध्याकाळी घरी आला .. जरा नाराजच होता आणि आज वसू मुळे माझ्या आयुष्यात हे सगळे होतंय असे त्याला वाटू लागल्याने थोडा मनातून वसू वर नाराज होता .. त्यानेच लॅच च्या कीज ने लॉक उघडले .. घरात पाय टाकल्यावरच त्याला घरात झालेले बदल लक्षात आले .. घर छान स्वछ दिसत होते .. फार काही न बोलता त्याच्या रूम मध्ये गेला आणि दार लावून घेतले .. वसू ला त्याच्या चेहरा  बघूनच  कळले होते कि बिनसलंय म्हणजे समीराने त्याला समजून घेतलेलं नाहीये ..

तिने लंगच त्याच्या साठी चहा टाकला ..

तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि किचन मध्ये पाणी प्यायला गेला .. किचन पण छान आवरल होता .. आणि वाफाळणारा चहा त्याचा समोर वसू ने धरला आणि एक गोड स्माईल दिली

0

🎭 Series Post

View all