परकाया भाग ६०
क्रमश : भाग ५९
जय " आमच्या गावाला एक मांत्रिक आहे .. मी कधी पहिला नाही पण त्याने भूत बाधा झालेल्याना बर्याच जणांना वाचवले आहे .. तर आता येणाऱ्या अमावास्येला जर आपण माझ्या गावी गेलो तर आपण तिकडे देवळात जाऊन तो त्याच्या तंत्र शक्तीने भुताला बाहेर काढू शकतो "
राघव " नको जय .. ते लोक खूप अघोरी असतात .. कधी कधी झाडूने वैगरे मारतात .. किंवा गार .. गरम पाण्याचा मारा शरीरावर करतात .. मला विचारशील तर वसू च्या शरीराला हे झेपणार नाही "
जय " मग काय करायचे ?" आपण काय डिटेक्टिव्ह आहोत का ? रिचा शर्मा ची केस सोडवायला ? "
राघव " नाहीच ना .. पण सेशन मधून आपल्याला रिचा शर्मा चा मृत्यू कसा झाला हे कळेल .. तिची बॉडी कुठे आहे ते कळेल .. साधारणता:त्याच्या वर अन्याय करणाऱ्या ला शिक्षा मिळाली कि हे आत्मे तृप्त होतात ... एकदा ती तृप्त झाली कि तिच्या शरीरावर प्रॉपर अंतिम संस्कार तिच्या घरातील लोकांनी केले कि आत्म्याला मुक्ती मिळते .. यात पण वसू ला थोडा त्रास होईलच पण तो खूप होऊ नये म्हणून आपण आधीच तिला रक्ताच्या बाटल्या आणि औषधें द्यायची म्हणजे शरीराची हानी होणार नाही .. आणि आत्मिक शक्ती वाढवायला तू आहेसच कि .. तुझे प्रेमच तिला यातून बाहेर काढणार आहे .. "
जय " तसेच होऊ दे बाबा .. "
तेवढयात राहुल आणि समीरा आले ..
राहुल " अरे सॉरी.. खूप उशीर झाला .. "
समीरा ने आल्या आल्या जय ला एक मिठी मारली ते वसू ने पहिले ..
वसू पाणी घेऊन बाहेर आली ..
वसू " काय अग किती उशीर केलात तुम्ही लोकांनी "
राहुल " काय अग ट्रॅफिक खूप लागले "
समीराने वसू ला बघितले तर वसूच्या तब्बेतीकडे बघितल्यावर ती घाबरलीच
समीराने उठून वसू ला मिठी मारली
समीरा " वसू .. कशी आहेस राणी ? "
वसू " मी ठीकच आहे म्हणायचे ? काय माहित आत काय लिहून ठेवलंय आमच्या नशिबात "
समीरा च्या डोळ्यात टचकन पाणी आले ..
समीरा " जय .. हे काय होऊन बसले .. मला बघवत नाहीये रे हिच्याकडे ? कसली तब्बेत खालवलीय तिची ? तू चल पण हिला आत्ता च्या आत्ता ऍडमिट करू ?"
जय ने तिच्या खान्द्यावर हात ठेवला आणि तिला गॅलरीत घेऊन गेला .. वसू हे सगळे पाहत होती .. तिच्या डोळ्यातले हावभाव बदलत होते .. राघव चे निरीक्षण चालू होते
जय " अग समीरा तू कशाला रडतेस ? आणि प्लिज डोन्ट ओव्हर रिऍक्ट इंफ्रण्ट ऑफ हर "
समीरा " सॉरी जय ? जय मला हे बघवतच नाहीये .. आय एम स्केअर्ड "
जय " प्लिज डोन्ट बी .. मला तुझी मदत लागणार आहे .. तू आताच घाबरलीस ? आपल्याला मुख्य काम करायचेय .. त्याचाच तर प्लॅन करायचाय "
समीरा जय च्या काळजीने जय च्या खांद्यावर डोके टेकून उभी होती
राहुल " हे गाईज .. आता चला .. "
जय तिला घेऊन आत आला . राघव .. राहुल .. समीरा सगळेच वसू ला मदत करू लागले ..
राहुल " डार्लिग .. आज तू बस .. आज तुला आम्ही जेवण वाढतो "
राघव " एस .. मी पानं घेतो "
जय " मी पाणी घेतो "
समीरा मी वाढू लागते ..
चौघांना वसू ला एका जागेवर बसवली आणि सगळे मिळून काम करू लागले .. मध्ये मध्ये तिच्या सूचना चालूच होत्या .. आणि बाकीचे सगळे ती सांगेल तसे करत होते .
जय वसू ला भरवत पण होता .. आणि स्वतः जेवत पण होता ..
राघव " यार वसू .. माझी बायको आली ना कि तुझ्याकडे कुकिंग क्लास ला पाठवतो .. तेव्हडे जेवणाचे शिकवशील तिला "
सगळे हसायला लागले
राघव " वसू , डू यु have एनी सिस्टर .. ? मला बायको बघायचे काम तुझे "
जय " अरे .. तू गावाला चल .. कोणीतरी भेटलंच ? पण वसू इज अँटिक नमुना .. तिच्या सारखी नाही कोणी भेटायची ? हो कि नाही वसू ?"
वसू " अरे जय आपली सुरू .. सुरू अजून लग्नाची आहे "
राघव " चला म्हणजे माझे लग्न होण्याचे चिन्ह आहेत म्हणजे ? मला वाटले देवाने मला एकट्यालाच पाठवले कि काय खाली "
पुन्हा सगळे हसायला लागले
वसू " जय .. सरू .. " तिच्या डोळ्यातून पटकन अश्रू आला "
जय " काय झालंय .. आठवण आली का तिची ? तू जेवण झाले कि कॉल कर ना तिला "
वसू " सुरू .. "म्हणे पर्यंत पुन्हा डोळ्यातून पाणी वाहू लागले
जय " अरे यार .. रडू नको ना .. " तिचे डोळे पुसू लागला
राघव " अग .. तुझी इच्छा नसली तर मी तसाच राहीन बिन लग्नाचा .. तू रडू नकोस ग "
वसू रडता रडता हसू लागली ..
जय " काय यार तू घटकेत हसते .. घटकेत रडते .. काय झालंय सुरू ला "
समीरा " कोण आहे हि सुरू "
वसू " माझी बाल मैत्रीण .. खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर .. पण मी स्वार्थी .. मला जसा जय मिळाला तशी मी तिला विसरून गेले .. एकदाही कॉल पण नाही केला "
समीरा " सो sad .. असे नको होते करायला तू वसू "
राहुल " इट्स ओके .. अजून काही झालेलं नाहीये .. आपण जेवल्यावर तिला विडिओ कॉल करू .. टेन्शन नही लेने का ?"
वसू " हमम.
राघव " चालेल .. म्हणजे मला लगेच बघता पण येईल "
वसू हसायला लागली .. जशी ती हसली .. तशी जय ने तिच्या कपाळावर किस केले ..
वसू " जय नको ना सगळ्यांसमोर .. मला कसे तरी होते "
राहुल " जय .. शी इज शाय पर्सन.. नॉट लाईक अस "
जय " हमम .. ती एकटी असली कि मारते आणि सगळे असले कि लाजते .. मग प्रेम करायचे कधी ? आणि कसे ?"
राहुल , राघव , समीरा आणि जय .. सगळे जोरात हसू लागले "
वसू " मार खाशील हा जय ? "
जय " सॉरी .. सॉरी .. माझी मारकुटी म्हैस आहे ती "
वसू " गप ना .. जय .. "
राघव " सुरू पण मारकुटी आहे का ?"
पुन्हा सगळे हसायला लागले.
बोलता बोलता समीरा आणि जय एकमेकांच्या हातावर टाळी देत होते .. मधेच मजेत एकमेकांना डोळा मारत होते .. नॉर्मल होते सगळे हे वसू साठी पण .. नॉर्मल नव्हते ते वसू च्या आत असलेल्या रिचा ला .. रिचा च्या आत्म्याला समीरा चा राग येत होता .. हि मुलगी जय ला का चिकटते यावरून तिला राग येत होता .. समीरा हे नाव तिने ऐकले असावे .. जय ला समीरा बरोबर लग्न करायचेय असे डायरीत वसू ने लिहलेलं नताशाने वाचले होते .. नताशा ने ते रिचाला सांगितले असावे कदाचित
वसू " जय .. माझे पाय खूप दुखायला लागलेत .. मला उठताच येत नाहीये .. मला बेडरूम पर्यंत सोड ना "
जय " ए उगाच लाडात येऊ नकोस .. आता तर तू चालत होतीस ?.. तुला पाहिजे तर मी सोडतो ..पण चालता येत नाहीये असे सांगून घाबरवू नकोस मला "
वसू " नाही अरे .. खरंच उठता येत नाहीये .. "
तसे एक मिनिट सगळे शांत झाले ..
राहुल " डॉक्टरकडे जायचे का ?"
वसू " नको .. थोडा अराम केला कि बरं वाटेल .. आज खूप वेळ उभी हाती ना मी .. हल्ली असेच होते मला .. आं ... आ .. जय चल ने ना आत .. मला खूप पाय दुखतायत "
जय " बरं चल .. "
जय ने तिला लिटरली उचलून बेडरूम मध्ये नेले आणि बेड वर ठेवले .. तर तिने त्याच्या गळ्यात जो हात घातला होता तो ती काढायलाच तयार नाही
जय " अग सोड हात .. आणि हे काय रडतेस काय ?"
वसू " जय मला खूप त्रास होतीय .. खूप पाय दुखतायत .. "
जय पाय दाबू लागला ..
वसू रडतच " आह ! .. जय जाम पाय ठणकतायत .. काही तरी झाले आताच्या आत्ता . आणि तू काय मला नरकात पाठवणारच आहे स का ? पाय सोड .. पाय नको दाबूस .. नवऱ्याने बायकोचे पाय नसतात दाबायचे "
जय " काही होत नाही ग .. उलट बायकोच्या पायात स्वर्ग असतो " आणि हसु लागतो
वसू " माझा इथे जीव जातोय आणि तुला काय मस्करी सुचतेय "
जय " वसू .. मरणाच्या गोष्टी केल्यास ना तर मी फटके देईन हा आता "
जय ने दार लावून घेतले
आणि तिच्या शेजारी झोपला .. तिला डोक्याला मसाज करू लागला .. पाठीला रब करू लागला .. “झोपायचं प्रयत्न कर .. मी पायाला बाम लावलाय होईल बरे आता "
जय " वसू रडतेस का ? दुखणे वेगळे आणि दुःख वेगळे .. रडू नकोस यार प्लिज .. जाऊ या का डॉक्टरकडे ? "
वसू रडतच " मला आज आता मनातून खूप रडावंसं वाटतंय .. काय माहित ? मला भीती वाटतेय जय .. ? जय तू माझा आहेस ना ... तू लांब नको जाऊस .. माझ्या जवळ थांब "
जय " हो रे बाळा .. मी तुझाच आहे .. आणि कुठे जातोय मी .. काय वेड्या सारखे चाललंय .. काय होतंय का तुला ?"
वसू " समीरा ब्रेक अप च्या दुःखातून बाहेर आली का रे ? तिला आपण दोघांनी खूप दुःख दिलय ? ती बरी आहे ना "
जय " हो अग .. ती एकदम ओके आहे .. तू नको तिची काळजी करुस ?"
वसू " नक्की ना .. आपला माणूस आपला नसणे याचा त्रास किती असतो हे मलाच माहिती .. आता ते दुःख तिच्या वाट्याला माझ्या मुळे आलेय "
जय " वसू .. स्टॉप धिस टॉपिक .. ती एकदम ओके आहे .. तू उगाच दुःख ओढवून घेऊ नकोस .. "
तिचे डोळे पुसत पुसत .. तिला रिलॅक्स करत त्याने तीला झोपवले आणि मग बाहेर आला
समीरा " कशी आहे ती ? अचानक काय झाले?"
जय चा मूड जरा ऑफ दिसलाच सर्वांना
राघव " मी तुला म्हटले ना जय .. तिची तब्बेत खूप खालावलीय .. तिच्या इतकी सहन सहन करणारी मुलगी जर ढसा ढसा रडत असेल तर तो पेन किती हाय लेव्हल चा असेल आपण इमॅजिन पण करू नाही शकणार "
आणि हो हे अशा शक्ती असल्या कि पाय दुखणे हा अजर सुरु होतो .. इतका कि पायात त्राणच राहत नाही .. काही दिवसांनी तिला व्हील चेअर आणावी लागेल"
राहुल " जस्ट शट अप राघव .. काहीही बोलतोस का ?
राघव " आय नो हे ऐकायला खूप विअर्ड आहे पण हेच सत्य आहे .. जय ची मनाची तयारी होयला हवी म्हणून स्पष्ट बोललो "
समीरा " व्हील चेअर कशाला ? ती काय एवढी जाड आहे .. जय उचलेल तिला "
राघव " जय तू राग मनू नकोस पण वसू ला लवकरात लवकर चान्गली ट्रीटमेंट सुरु करणे गरजेचे आहे "
राहुल " जय मी उद्या त्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट घेतो .. आपण उद्याच जाऊ .. पाहिजे तर मी येतो तुझ्या बरोबर "
जय " ठीक आहे .. पण उद्या नको .. मला तिला मनाने तयार करावे लागेल .. खूप घाबरट आहे रे ती .. डॉक्टर म्हंटले आधीच रडारडी सुरु "
राहुल " मग नकोस सांगुस .. आपण डायरेक्ट ऍडमिट करू तिला "
जय " हमम.. ते पण आहेच .. अरे बेसिकली तिला समीराची काळजी वाटतेय .. तिला असे वाटतंय कि मी समीराला सोडल्याने ती दुःखात असेल आणि याची कारणीभूत ती आहे "
समीरा चे पण डोळे पाणावले ..
जय " समीरा .. यार सॉरी .. मी तुझा गुन्हेगार आहे .. तुला या सगळ्यात उगाचच त्रास झाला .. इमोशनली अटचमेंट अशी एकदम तोडणे सोपं नसते .. ती म्हणते ते बरोबर आहे "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा