परकाया भाग ६४
क्रमश : भाग ६३
वीरू वसू ला हाक मारत होता .. पण वसू ला जणू ती हाक ओळखीची वाटतच नव्हती ती पुढे पुढे चालू लागली
वीरू ला एवढ्या मोठ्या हॉस्पिटल ची सवय नव्हती .. ती नक्की कुठे चाललीय त्याला कळे ना ..
त्याने जय ला फोन लावून सांगितले
वीरू " जय वसू कुठे तरी निघालीय .. मी आवाज देत होतो तरी ऐकले नाही तिने "
जय " तुझ्या नजरे च्या पट्टया त आहे ना ती .. ?"
वीरू " अरे तेच तर ना .. ती बहुतेक लिफ्ट मध्ये गेली .. मी काय करू ?" वीरू घाबरला होता ..
जय ने त्याच रूम च्या खाली काचेतून बघितले तर वसु एक ऑटो मध्ये बसताना त्याला दिसली . "
जय लगोलग त्या रूम मधून बाहेर आला आणि वीरू ला घेऊन खाली आला
वीरू " कुठे गेली ? ती अशी एकटी इकडे फिरते का ?"
जय " हो आता तिला रस्ते माहित आहेत पण आता आपल्याला तीचा पाठलाग करायला लागणार आहे "
वीरू " तुला माहितेय का ? ती कुणीकडे गेली असेल ?"
जय " हो अंदाज आहे ? "
वसू ऑटोत बसून पब मध्ये आली .. बाहेर ९ वाजले होते .. पब मध्ये खुप गर्दी होती . जय आणि वीरू आत मध्ये आले
वीरू " काय रे हे .. ? हे इकडे पार्टी आहे का कसली ?"
जय " अरे ह्याला ना पब म्हणतात .. सगळे तरुण मुले मुली .. डान्स करायला , ड्रिंक्स घ्यायला येतात इकडे .. "
वीरू " बापरे केवढा गाण्यांचा आवाज आहे .. "
जय " तू वसू दिसतेय का बघ ?"
वीरू " आपली वसू इकडे आली ?"
जय " काय विचारू नकोस ? ती काय करेल त्याचा नेम नाहीये .. "
जय आणि वीरू ड्रिंक्स काउंटर वर आले .. तर तिकडे वसू नव्हती ..
जय ला ती जॉन दिसला
जय " हाय जॉन .. " त्याने त्याला वसू चा फोटो दाखवला .. " हि मुलगी आता इथे आली होती का ?"
जॉन ने हातानेच इशारा केला .. तर समोर वसू पब मध्ये डान्स करत होती ..
जय पटकन तिच्या समोर गेला .. वीरू त्याच्या मागे मागे
वीरू " जय .. हिच्या कानाखाली वाजवू का रे मी ? हे काय फालतू पणा लावलाय ?"
जय " अरे हो .. ती वसू आहे पण वसू नाहीये .. "
वीरू " तेच तर एक मुस्काटात लावली कि बरोबर आठवेल तिला सगळे "
जय " हि पब्लिक प्लेस आहे .. चारी बाजूला cctv आहे .. असे कोणाला मारू नाही शकत .. आपल्याला जेल होईल "
वीरू " जय तू काय तिच्या समोर नाचतोय .. हात धरून बाहेर खेच तिला .. हिने काय ड्रिंक घेतली कि काय ? डोळे बघ तिचे "
जय " हो आपल्याला उशीर झाला ना यायला .. तेवढ्यात तिने घेतले असणार .. आता हिला इथून बाहेर काढायला पाहिजे .. "
वीरू ची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती .. सर्वत्र ड्रिंक्स घेणाऱ्या .. डान्स घेणाऱ्या मुली बघून त्याला अस्वस्थ होत होते ..
जय " वीरू तू तो ड्रिंक देणारा मुलगा आहे ना .. त्याच्या इथे बस .. मी आलोच .. हिला घेऊन असे म्हणे पर्यंत जय च्या समोरून वसू गायब ..
आता टेन्शन जय ला आले.. त्याच्या समोर असताना जरा तो मागे वळला होता वीरू ला हाताने फक्त ड्रिंक काउंटर दाखवत होता तर मागे वळून बघे पर्यंत वसू गायब ..
वीरू " अरे जय .. वसू कुठे गेली ?"
दोघे खूप घाबरले .. जय आणि वीरू ने कोपरा आणि कोपरा त्या हॉल चा तपासला ..पण वसू दिसे ना .. जय लेडीज वॉशरूम च्या इथे पण जाऊन आला ..
लेडीज वॉशरूम च्या जवळ एक लिफ्ट होती .. त्या लिफ्ट ला जय ने कॉल केला तर वसू चा दुपट्टा लिफ्ट मध्ये पडला होता ..
आता मात्र जय खूप घाबरला .. वसू चा जीव धोक्यात आहे हे नक्की .. वसू कुठेय तू ? कितीही मोठ्याने जरी आवाज दिला तरी कोणाला ऐकूच येणार नाही इतका गोंधळ होता तिथे ..
जय लिफ्ट च्या आत गेला .. लिफ्ट मध्ये ५ फ्लोअर होते .. कुठे असेल ? कोणत्या फ्लोअर वर जाऊ ? जय ला काहीच सुचत नव्हते "
वसू ला तिचे स्वतःचे भान नव्हते .. त्यात आज पहिल्यांदा तिने ड्रिंक्स घेतले होते .
जय आधी सर्वात लास्ट फ्लोअर वर गेला .. तिकडे ओपन टेरेस होते ..
जय " वसू .. वसू .. रिचा .. रिचा .. नताशा .. नताशा .. आर यु देअर ?" सगळी नाव घेत होता तो .. पटपट सगळं टेरेस त्याने बघितला .. जीन्याने खाली आला .. तर बरेच बॉडीगार्ड होते तिथे ..
जय ने आत मध्ये जाण्यासाठी निघाला तर बॉडी गार्ड त्याला पाठवे ना
जय " मी एका मुलीला शोधतोय ? हि माझी वाइफ आहे ? ती आलीय का इकडे ? प्लिज मला आत सोडा नाहीतर मी पोलिसांना कॉल करेन "
बॉडीगार्ड " इकडे कोणी नाहीये .. आता मध्ये कोणालाच सोडायची परमिशन नाहीये .. आज साहेब आलेलेच नाहीयेत .. त्यामुळे आत कोणीच नाहीये "
जय " मग तू कोणाचे राखण करतोय .. साहेबाच्या कुत्र्याची का ?"
बॉडीगार्ड " प्लिज गो फ्रॉम हिअर .. "
जय " हे बघ .. भाई .. मला आत जाऊ दे .. माझी बायको आत आहे .. नक्की .. मला जाऊ दे "
बॉडीगार्ड " आत कोणीच नाहीये सर "
तेवढयात आतून काच फुटल्याचा आवाज आला आणि एक माणूस खाली पब च्या गेट च्या समोर धपकन पडला .. खलास .. .. कोण तरी खाली पडून मेला होता ..
पोलिसांच्या गाड्या येऊ लागल्या ..
तोपर्यन्त जय ची आणि त्या बॉडीगार्ड ची हातापायी झाली .. जय ला त्याने एक दोन मुक्के मारले आणि तेवढ्यात जय ने पण त्याला मारले .. जय ने त्याची पिस्तूल त्याच्याच डोक्याला मारली तसा तो बेशुद्ध झाला .. जय पटकन आत गेला ..
आता मध्ये एक मोठा हॉल होता .. आणि तिकडचे सामान सगळे इकडे तिकडे पसरले होते .. समोरच्या काचेतून कोणीतरी खाली पडल्या मुळे सर्वत्र काचा पसरल्या होत्या ..
जय " वसू .. वसू .. तू आहेस का ? इकडे ? वसू ?"
सोफ्याच्या मागून रडण्याचा आवाज येत होता .. जय हळू हळू पुढे जात होता ..
जय " वसू .. वसू ती आहेस का ? वसू ?"
जय रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेला तर वसू सोफ्या मागे रडत होती .. खूप घाबरली होती ..
जय ने पटकन तिच्या जवळ घेतले .. तिला मिठीत घेतले ..
वसू " काय आहे हे ? काय करते ? इकडे कुठे आलीस ? कोणी आणले तुला ?"
वसू ने ड्रिंक्स घेतल्यामुळे तिला तिचे भान पण नव्हते .. पण रडत होती .. घाबरत होती .. जय ने तिला हाताने उचलले आणि तिथून निघाला .. तर मागून एक बॉडीगार्ड आला .. जय कडे पिस्तूल रोखली .. " खाली ठेव तिला .. कोण आहेस तू ? इकडे काय करतोय ? ह्या जागेची माहिती कोणी सांगितली ?"
जय " बाजूला हो .. हि माझी बायको आहे ? "
बॉडीगार्ड " ह्या मुलीला माझ्याकडे सोपव .. नाहीतर मी गोळी घालीन "
जय " पिस्तूल माझ्या कडे पण आहे ?" बाजूला हो ... हो बाजूला .. "
बॉडीगार्ड " ह्या मुलीला रिचा बद्द्दल काहीतरी माहिती कशी ?"
जय " कोण रिचा मला माहित नाही ?"
बोडुगार्ड " हि मुलगी .. राजीव ला कशी ओळखते ?"
जय "मला काही माहित नाही .. मला आता इथून जाऊ दे .. पोलीस येतील .. ?"
बॉडीगार्ड " कशा वरून हि तुझी बायको आहे ? "
जय " व्हॉट ? मग काय मी खोटे बोलतोय ?"
बॉडीगार्ड " हि रितेश ला कशी ओळखते ?"
जय " कोण रितेश ?" मला नाही माहित .. बाजू ला हो .. हिला घरी नेणे गरजेचं येआहे "
बॉडीगार्ड " मोबाइल मध्ये बायको म्हणून ही चा फोटो आहे तुझ्या .. असेल तर दाखव मग सोडतो तुला .. "
जय ने त्याला त्या दोघांचे फोटोस दाखवले "
बॉडीगार्ड " ठीक आहे जा .. "
जय जायला निघाला ..
बॉडीगार्ड " इकडून नाही .. तिकडून जा .. पुढच्या दारी पोलीस आलेत .. मर्डर झालाय .. पोलीस सगळ्यांना चेक करत आहेत "
जय ने त्याचे ऑफिस चे कार्ड त्याला दिले .. माझा नंबर आहे यावर .. मला कॉल कर उद्या .. रिचा बद्दल बोलायचंय "
बॉडीगार्ड " मला माहितीच होते .. ह्या मुलीचा आणि रिचा चा काहीतरी संबंध आहे .. तिने मला रितेश .. म्हणून हाक मारली "
जय " काय ? तू रितेश आहेस ?"
रितेश " हो .. मी माझ्या बहिणीला शोधतोय .. रिचाला "
जय " रितेश प्लिज मला कॉल कर उद्या .. मला खूप बोलायचंय तुझ्याशी"
रितेश " शक्यतो मला पोलीस पकडून नेतील .. मी त्या राजीव ला काचेतून फेकून दिले "
जय " तू एक काम कर.. तू पण माझ्या बरोबर चल आताच .. नंतर बघू काय करायचे ते "
रितेश आणि जय मागच्या दराने निघाले आणि घरी आले
जय ने वीरू ला कॉल केला आणि सांगितले " मी वसू ला घेऊन घरी आलोय .. तू डायरेक्ट घरीच ये .. हा मेसेज वाचल्यावर डिलीट कर .. आमच्या बद्दल काही बोलू नकोस कोणाला .. तू एकटाच आहेस असे सांग "
वीरू " ओके "
जय वसू ला घेऊन घरी आला .. रितेश पण त्याच्या बरोबरच घरी आला .. त्याला त्याने बाहेर सोफ्यावर झोपायला सांगितले आणि सांगितले कि आपण उद्या बोलू .. आणि तो वसू ला घेऊन बेडरूम मध्ये गेला ..
वसू ला कोणीतरी दोन चार कानाखाली मारलेल्या असाव्या .. तिच्या गालावर त्याचे हात दिसत होते .. तिच्या ओठातून रक्त येत होते .. आणि ती शुद्धीत नव्हती ..
जय ने तिला शॉवर खाली उभी केली .. तिचे कपडे चेंज करून .. जिथे जिथे लागलय तिथे .. डेटॉल लावून .. क्रिम लावून दिले ..
किचन मध्ये जाऊन लिंबू पाणी घेऊन आला आणि तिला ते पाणी पाजले ..
पुन्हा किचन मध्ये गेला आणि खिचडी लावली ..
खिचडी झाल्यावर रितेश ला खायला दिली .. आणि वसू ला एकेक घास करून भरवली .. "
तेवढ्यात वीरू घरी आला
जय " तुला पोलिसानी काही प्रश्न विचारले का ?"
वीरू " नाही .. त्यांनी चेक केले कि मी ड्रिंक्स घेतले नाहीत .. म्हणून त्यांनी विचारले कि तू एकटाच असा आलास इथे ?"
जय " मग
वीरू " मी सांगितले .. मी गाव वरून आलो होतो .. पब काय असतो माहित नव्हते ते बघायला आलो .. तर तेवढयात तुम्ही आलात.. मग सोडले त्यांनी मला "
जय " सॉरी .. तुला एकटीला सोडून आलो .. माझ्या जवळ काहीच पर्याय नव्हता "
वीरू " ते जाऊ दे रे .. वसू कशी आहे ?"
जय " तिला मारलंय कोणीतरी .. गालावर हातचे ठसे दिसतायत .. आता काहीच बोलायच्या कंडिशन मध्ये नाहीये .. तिने पहिल्यांदाच ड्रिंक घेतलेत .. काय झालंय काय माहित .. पण बाकी इन्जुरीज नाहीयेत .. "
राकेश " तिला काहीच झालेलं नाहीये .. मी होतो तिथेच "
जय " म्हणजे ? प्लिज नीट सांग "