परकाया भाग ६८
क्रमश: भाग ६७
इन्स्पेकटर चहा घेऊन निघाला
बोरकर " मिस्टर जय मला कधी येऊन भेटाल .. जे सांगितले ते काम लवकर आणि गुपचूप करावे लागणार आहे "
जय " तुम्हीच सांगा कधी ते मी पोहचेन तिथे "
जय " अजून एक काम होते .. नताशा याच बिल्डिंग मध्ये वरती २ मजले राहते .. सध्या ती पण मिसिंग आहे .. रितेश च्या म्हणण्या नुसार रिचा शर्मा आणि नताशा एकच आहेत .. तर हा तिचा भाऊ आहे या बेसिस वर तिचा फ्लॅट आम्ही उघडू शकतो का ?"
बोरकर " मिस नताशा चे नाव राजीव च्या मॉडेल लिस्ट मध्ये निघालय .. सध्या तुम्ही त्यात पडू नका .. पोलीस तिथपर्यंत आपोआप पोह्चतीलच .. नाहीच पोहचले तर मग बघू काय करायचे ते "
रितेश " सर .. ज्या अर्थी माझ्या बहिणीचा आत्मा ह्यांच्या मिसेस मध्ये आहे त्या अर्थी तिच्या सोबत नक्कीच काहीतरी झालेय .. त्या कडे पण बघावे लागणार आहे .. राजीव हा त्यातलाच एक आहे .. आणि tv स्टार अरमान त्याचा पण त्यात हात असण्याची शक्यता आहे .. कारण रिचा चा बॉयफ्रेंड होता तो "
बोरकर " त्या अरमान चा पण ऍक्सीडेन्ट झालाय ना .. "
रितेश " हो . पण आज तो राजीव चा अंतिम संस्कार करायला शहरात आलाय "
जय " मिस्टर बोरकर .. ज्या ठिकाणी अरमान चा ऍक्सीडेन्ट ती जागा पण शोधली पाहिजे .. ती जागा मला स्वप्नात दिसली आणि वसू ने कधीही न पाहिलेली जागा पेन्सिल स्केच ने काढली होती "
बोरकर " या दोन वेगळ्या केस आहेत .. आपण थोडा धीर धरू यात .. हे cctv चे निस्तरू आधी कारण नाहीतर तुम्ही यात फसू शकता "
जय " थँक यू मिस्टर बोरकर "
बोरकर " मिस्टर जय .. मी पण तुमच्याच वयाचा आहे .. तुम्ही मला निलेश म्हणून हाक मारू शकता . नाहीतरी तुमच्या मिसेस ला पहिल्यांदा भेटवले तेव्हा हा माझा मित्र म्हणूनच भेटवले होते ना . "
जय च्या डोळ्यात एकदम वेगळीच चमक आली होती आणि त्याने निलेश बोरकर ला म्हणजे इन्स्पेकटर ला पुन्हा मिठीच मारली.
अखेर विजय हा सत्याचाच होतो म्हणतात ना तसे सगळे जुळून येत होते . जय च्या या लढाईत अजून एक साथीदार त्याला जोडला गेला होता .
वसू ला झालेल्या दुखापती मुळे तिला आरामाची गरज तर होतीच पण थोड्या वातावरणात पण बदल झाला तर परिस्तिथी थोडी बदलेल्या विचाराने जय काहीतरी प्लॅन बनवू लागला
राघव " जय .. माझा तसाही phd चा थोडा अभ्यास बाकी आहे .. माझे सर आले कि ते मला रिसर्च पेपर साठी मार्गदर्शन पण करतील तर आता मी थोडा अभ्यास करेन असे म्हणतो . माझी आई दोन दिवस बाहेर गावी गेलीय तर घरी मी एकटा आहे .. तर मी वीरू आणि रितेश आम्ही तिघे आमच्या घरी जातो . आम्ही बॅचलर पार्टी करू जरा आणि वीरू ला आपली सिटी पण दाखवतो .. "
वीरू " मला चालेल .. जय तू पण खूप दमलायस आणि वसू ला आरामाची गरज आहे .. तर हे बरं पडेल .. "
रितेश " सॉरी राघव .. मी माझ्या मित्रा कडे जाईन राहायला .. तसेही मम्मा येणार आहे पर्वा .. ती आली कि आपला पुढचा प्लॅन करू "
जय " वीरू त्या मांत्रिका ने सांगितल्या प्रमाणे येत्या शनिवारी अमावस्या आहे .. त्याला विचारू या का आपण आधीच काय काळजी घ्यायची ते "
वीरू " तो तसाही फोन वर काही सांगणार नाही . आपण जर तिकडे गेलो तरच तो काहीतरी करेल "
जय " मग आता काय करावे ? मला तर काही सुचतच नाहीये ?"
राघव " हे बघ आपण एकदा माझ्या या सरांना भेटू .. जर त्यांना भेटून हा प्रॉब्लेम सुटला नाही तर तो ऑप्शन तर आपल्याकडे कायम आहेच ना .. "
जय " ठीक आहे .. "
रितेश त्याच्या मित्राच्या घरी गेला .. आणि वीरू राघव च्या घरी गेला .
इकडे समीरा च्या तब्बेतीमध्ये बरीच प्रगती होती .. राहुल तिची उत्तम काळजी घेत होता .. ती रिकव्हर होईल मनाने आणि शरीराने हे बघत होता .. .. ती झोपली कि जरा जरी आ वा ज झाला तरी दचकून जागी होयची .. कधी झोपेत वसू चे भयानक रूप आठवून घाबरून उठायची .. त्यामुळे राहुल बऱ्यापैकी लक्ष ठेवूनच होता .. तिला मुद्दामून हसवायचा .. नॉर्मल गप्पा गोष्टी करायचा .. जेणे करून झालेला प्रकार ती विसरून लवकर बॅक टू नॉर्मल रुटीन येईल .
तिला जेवण भरवायचा .. वेळेत गोळ्या औषधे द्यायचा .. तिची चांगलीच सेवा करत होता ..
तो हे का करत होता हे जरी त्याला कळत नसले तरी समीरा साठी हे मीच करायला पाहिजे हे मात्र त्याला कळत होते .
इकडे जय आणि वसू आज पूर्ण दिवस घरातच होते .. दोघांनी खूप अराम केला ..
जय " वसू तुला बरं वाटतंय का थोडं आता ?"
वसू " हो .. थोडा विना कारण थकवा आलाय .. बाकी बरी आहे मी "
जय " मग उद्या आपण दोघे बाहेर जाऊया का कुणीकडे तरी ?.. किंवा एखादा सिनेमा पाहूया "
वसू " सिनेमा नको .. त्या पेक्षा कुठे तरी मोकळ्या हवेत जाऊ "
जय " ठीक आहे .. बीच वर जायचे का मग ?"
वसू " हो चालेल "
जय " ठीक आहे मग उद्या पण बीच वर जाऊ .. आधी आपण दोघे फिरू मग राघव आणि वीरू ला तिकडेच बोलावतो .. रात्री हॉटेल मध्ये जेऊ आणि घरी येऊ "
वसू " राहुल आणि समीरा ला पण बोलावं ना "
जय " अग त्यांचा ऍक्सीडेन्ट झालायं ना .. मी कॉल करून सांगतो त्याला .. तो काही नाराज नाही होणार "
वसू " ठीक आहे .. त्यांना डिस्चार्ज मिळाला कि परत जाऊ "
जय ' ठीक आहे "
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी समी रा ला आणि रा हू ल ला चेक केले आणि सांगितले कि त्यांच्या जखमा भरल्या आहेत . .. टाके आपण अजून दोन दिवसांनी काढू .. तुम्ही त्यांना आज घरी नेले तरी चालेल "
राहुल तर तस आधीच बरा झाला होता .. त्याचे पण टाके २ दिवसन्नी काढायचे होते ..
वीरू मात्र राघव बरोबर राहून पकला होता .. तो फिरायला नेत होता त्याला पण गाडी ४० च्या स्पीड ने चालवायचा .. एवढ्या हळु म्हणजे वीरू ला शिक्षा केल्या सारखे वाटत होते .. पण तो माणूस म्हणून हुशार आणि चांगला आहे हे त्यालाही कळले होते "
दुपारचे जेवण झाल्यावर राहुल ने दोघांचे डिस्चार्ज करून घेतले .. तिचे सामान हॉस्पिटल मधल्या माणसा कडून गाडीत ठेवून घेतले .. आणि तिला हाताला धरून खाली घेऊन आला .
राहुल " कसे वाटतंय समु ? बऱ्याच दिवसांनी फ्रेश एअर मध्ये "
समीरा " हो ना .. राहुल .. " पुढे तिला काही बोलवेच ना .. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .. तिला त्याचे मना पासून आभार मानायचे होते पण " थँक यु हा शब्द कमी पडेल आणि त्याला तिला इतका पण परका करायचे नव्हते
राहुल " अरे .. समु .. चक्क एवढी टफ गर्ल च्या डोळ्यात अश्रू .. धिस इज नॉट डन "
समीरा " टफ कसली रे .. एखाद्या कागदाला उचलून फेकावी तशी तिने मला दोन वेळा फेकली होती .. आणि तिसऱ्यांदा जर तू कॅच नसती घेतली ना तर मी बहुदा आज जिवंत नसते .. "
राहुल " अरे .. काय एवढा विचार करतेय .. एखादा ऍक्सीडेन्ट आहे असा समज आणि विसर ते .. मी समजू शकतो पण आज जय कडे बघ केवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधे आहे तो .. त्याच्या पुढे आपले दुःख फार कमी आहे .. तू लवकर बरी हो आपल्याला त्याला मदत करायचीय .. अजून ताकतीने ..
गाडी चालवता चालवता त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला ..
समीरा " वसू क शी आहे ?"
राहुल " तिने अजून एकाला वरून खाली फेकून दिलेय .. "
समीरा " व्हॉट ?"
राहुल " हो अग .. जे काही आहे ते खूप विचित्र आहे ... जय खूप स्ट्रेस मध्ये आहे.. मला म्हणत होता मी नोकरी सोडतो आणि गावीच जातो हिला घेऊन .. इकडे कामावर पण जाता येत नाहीये .. मग मीच बॉस शी बोलून त्याला २ महिने सुट्टी मिळवून दिलीय, आणि त्याचा जीव जळतो ग वसू साठी .. ती जेव्हा विसरते ना त्याला तो काळ जास्त त्रास देतो त्याला . "
समीरा " यार .. बिचारा .. काय झाले त्याच्या आयुष्यात .. "
राहुल :" आणि वसू ती तर एंजल आहे यार .. त्या नताशा नावाच्या मुलीशी मैत्री काय केली ..ती मेली काय आणि तिच्यात घुसली काय ? काय सगळे विचार शक्तीच्या बाहेर आहे ?"
समीरा " पण तिने माझ्यावर का हमला केला ? मी काय केले होते तिचे ?"
राहुल " अग .. नताशा ला वसू सुखात हवीय .. वसू ला जर कोणी त्रास दिला .. किंवा वसू ला न आवडणाऱ्या गोष्टी कोणी केल्या तर ती भडकते .. शी इज प्रोटेक्टइंग वसू .. नताशाने वसू ची आधीची डायरी वाचली होती ज्यात वसू ने उल्लेख केला होता कि जय आणि समीरा लग्न करणार आहेत .. त्यामुळे नताशाला तुझा राग येत होता .. तू जेव्हा जेव्हा जय शी बोललीस ना तेव्हा तेव्हा मी निरीक्षण करत होतो वसू अस्वथ होत होती .. पण तुम्ही असे बोलता हे वसु साठी नवीन नव्हते ..नवीन होते ते नताशा साठी .. म्हणू ती म्हणाली " जय पासून लांब राहायचं .. जय फक्त वसू चा आहे " आठवतंय का ?आणि उलट तिने जय ला पण धमकावले होते " तू फक्त वसू चा आहेस "
समीरा " हो रे .. "
राहुल " तेच सांगतोय मी .. हे वाटतं तेवढं सोपे नाहीये .. "
बोल बोलता राहुल चा फ्लॅट आला
समीरा " अरे .. तू मला आधी माझ्या फ्लॅट वर सोड ना "
राहुल " नाही .. तू आता इकडेच राहायचे .. "
समीरा “अरे .. हे काय राहुल .. मला माझ्या फ्लॅट वर सोड बघू .. इकडे कुठे आणलेस मला .. पाहिजे तर आपण कॉफी घेऊ घरी आणि मग सोड "
राहुल ने तिला हाताला धरून बाहेर आणले आणि लिफ्ट मधून त्याच्या फ्लॅट वर घेऊन गेला
राहून ने फ्रिज मधून बॉटल काढली आणि तिला पाणी दिले स्वतःला घेतले आणि कॉफी बनवू लागला
समीरा " फ्लॅट छान ठेवला आहेस राहुल "
राहुल " अरे ते सकाळी रोज सर्व्हन्टस येतात क्लीनिंग ला आणि कूक पण येतो .. मी काहीच करत नाही .. तसाही मी झोपण्या पुरताच येतो इथे "
समीरा " हमम.. "
राहुल " तू त्या बेडरूम मध्ये रहा .. मी इकडे राहीन "
समीरा " नको अरे .. तू मला माझ्या फ्लॅट वर सोड "
राहुल " नो मोअर डिसकशन .. मी निर्णय घेतलाय .. तू गप्प बस "
समीरा "नको ना "
राहुल " काय प्रॉब्लेम आहे ? माझ्यावर विश्वास नाहीये का ?"
समीरा " शट अप राहुल "
राहुल " मग प्रॉब्लेम काय आहे .. तुला अजून नीट चालता येत नाहीये .. तू एकटी कसे मॅनेज करणार आहेस "
समीरा " मी बोलावून घेईन अरे कोणाला तरी "
राहुल " पण इकडे मी पण एकटाच आहे ना .. माझी काळजी कोण घेईल मग .. "
समीरा " तू पण बोलावून घे कोणाला तरी "
राहुल " कोण नाही येणार माझ्या घरून .. मला माहितेय .. आणि उगाच घाबरून जातील आणि मग कायमचे मला घरीच राहायला जावे लागेल .. मला माझी फ्रीडम नाही संपवायची " बोल बोलता कॉफी च मग तिच्या हातात दिला आणि स्वतःला पण घेतला .."
दोघांनी कॉफी घेतली .. राहुल ने तिला बेडरूम मध्ये नेली .. आणि एक वॉर्डरोब ओपन केले .. या मध्ये तुला लागेल ते सर्व सामान आहे .. काही लागत असेल तर सांग मी अरेंज करेन अर्ध्या तासात .. '
समीरा ने बघितले तर खूप सारे डिझाईनर ड्रेसेस .. ऍक्सेसरी .. गारमेंट्स सर्व काही होते "
समीरा " अरे तू काय वेडा झालाय का ? मी हे कसे वापरू ? कोणाचे आहेत ते ?"
राहुल " ऑल आर न्यू .. साधारण तुझ्या साईझ चे आहेत "
समीरा " हो दिसतंय मला .. तू तर सिंगल आहेस ना .. हे कोणाचे ड्रेस आहेत आणि एवढे ?"
राहुल हसतच .. " ते सांगेन तुला नंतर कधी तरी .. दयाटस माय लिटिल सिक्रेट .. तुला हे सगळे नको असेल तर अर्धा तास दे मी तुझ्या साठी नवीन ऑर्डर करतो "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा