परकाया भाग ७१
क्रमश : भाग ७०
थोड्या वेळाने जय पण वसू च्या शेजारी झोपला त्या दोघांचा त्याने बेड वर पडल्या पडल्या सेल्फी काढला .. ती आता कुठे दिसतेय का हे बघायला .. तर ती बेड वर नव्हती ..
आत कुठे असेल म्हणून जय ने पडल्या पडल्या वेग वेगळ्या ऍंगल ने सगळ्या रूम चे फोटो काढले आणि फोटोस चेक करू लागला .. तर त्याला कुठल्याच फोटोत ती दिसली नाही ..
अर्धा एक तास तिघे जरा झोपले असतील तर दाराची बेल वाजली .. जय उठला आणि दार उघडायला गेला .. तर बाहेर नताशाची मम्मा होती
जय " अरे आंटी .. आईए .. म्हणून जय ने त्यांना घरात घेतले .. त्यांना पाणी दिले .. वीरू पण झोपलेला उठून बसला ..
जय ने त्यांच्यासाठी चहा टाकला
त्या पण फ्रेश होऊन बसल्या .. जरा अवघडल्याच होत्या .. काय बोलावे .. हे काही नाते वाईक नाहीयेत .. सगळेच ऑड होत होते .. तरी पण जय त्यांना एका आई जवळ जसे वागायला पाहिजे तसा वागत होता .. जय त्यांना चहा घेऊन जातच होता ... तर एकदम एक हवेचा दाब त्याच्या बाजूने सर्रकन गेल्या सारखा भास त्याला झाला ..
खरं तर .. नताशा च आत्मा मम्मा ला बघून खूप खुश झाला होता .. पण अदृश्य शरीरा मुळे तिला कोणीच पाहू शकत नव्हते .. ती तिचे अस्तित्व दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होती .. जय ला ती त्याच्या बाजूने सर्रकन गेल्याचा भास झाला होता ..
जय ने त्यांना चहा बिस्कीट खायला दिले आणि रितेश ला फोन करून कळवले कि तुझी आई आलीय तू आज रात्री इकडेच ये .. तो हि येतो म्हणाला
जय " आंटी .. आपने पोलीस कंप्लेंट कि कॉपी लाई है क्या ? और नताशा आय मिन रिचा का फोटो लाया क्या ?"
रिचा ची आई " हा बेटा .. सब लाया है .. तुम्हारी बीवी कहा है "
जय " वो अंदर सो रही है । थोडी देर के बाद मिलेगी आपको "
रिचा ची आई " उसे देखकर ऐसा लगता हैं मेरी बेटी फिर वापस आ गयी "
जय ला पुन्हा हवेचा लोंढा त्याच्या आजू बाजूला वावरत असल्या सारखा वाटला ..
रिचा ची आई " क्या हुआ बेटा .. तुम थोडा परेशान स लग रहे हो "
जय " नही .. कुछ नही आप थोडा आराम कर लो .. शाम को डॉक्टर के पास जाना है "
रिचा " उससे पहिले हमें पोलीस स्टेशन जाना पडेगा बेटा .. मुझे पोलीस स्टेशन से कॉल आया था ?रिचा के बारे में बात करने बुलाया है "
जय " ठीक है .. तो आप और रितेश वहा जाके डायरेक्ट हॉस्पिटल में आईयेगा .. हम लोक उधर हि मिलेंगे "
कधी तिच्या आई च्या आजू बाजूला हवेचा लोंढा पास होत होता .. कधी कधी जय च्या आजू बाजूला ..
थोड्या वेळाने जय ने वसू ला उठवले आणि हॉस्पिटल ला जायची तयारी करू लागला .
जय मनातून खूप अस्वस्थ होता . आता ज्या सरांची तो वाट बघत होता त्यांना आज तो फायनली भेटणार होता . सध्या तरी राघव वर विश्वास ठेवून वसू ला या त्रासातून मुक्ती देणारा हाच एकमेव माणूस दिसत होता .
रितेश आणि रिचा ची आई पोलीस स्टेशन ला निघून गेले .. आणि ते डायरेक्ट हॉस्पिटल ला भेटणार होते .
वसू हास्पिटला ला जायची तयारी करत होती पण मनातून खूप घाबरली होती .. भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती
जय " वसू .. इकडे बघ .. तूला माझ्या वर विश्वास आहे ना .. तुला मी काहीही होऊ देणार नाही .. मग थोडा सपोर्ट कर ना प्लिज राजा .. तुझा असा रडका चेहरा बघून मला पण नको वाटतंय हे सगळे पण आपल्याला यातून लवकर बाहेर पडायचय कि नाही ?.. मग तू सुद्धा या गोष्टीला फाईट करायला मना पासून तयार होईल पाहिजे कि नाही? तू कमकुवत पडलीस तर तुझे शरीर पण आपोआप कमकुवत पडणार .. आता मनातून निर्धार कर .. काही झाले तरी हे शरीर माझे आहे .. हे आयुष्य माझे आहे आणि ते मलाच जगण्याचा अधिकार आहे .. असे उठसूट दुसरा कोणीही येऊन माझ्या शरीरावर आणि मनावर ताबा नाही मिळवू शकत .. " .. "
वसू " जय मला खूप भीती वाटतेय .. असे वाटतेय कि आता मी तुझ्या पासून खूप दूर चाललेय .. आपली हि भेट शेवटची असली तर .. ? मी परत आलेच नाही तर यातून .. त्या हॉस्पिटल मधून मी परत आलेच नाही तर .. अशी भीती वाटते मला सारखी .. " डोळ्यातून पाणी वहात होते .. "
जय " वसू असे काहीच होणार नाहीये .. एवढी सगळी जमवा जमव कशासाठी करतोय मी .. असे घाबरून कसे चालेल .. भीती मला पण वाटते पण मी माझ्या मनाला लागत समजावतो .. माझ्या वसू ला माझ्या पासून दूर करण्याचा अधिकार मी देवाला सुद्धा दिलेला नाही तर हे तर काय भूत आहे .. वसू आपल्या प्रेमाचा अंत असा होऊच शकत नाही .. "
वसू " हे बघ .. माझ्या शरीरावर पुन्हा चट्टे उठायला लागलेत .. माझे शरीर जळत आहे .... माझ्या शरीरावर माझा हक्क नाही राहिला .. मी काय करू जय "
जय " स्टॉप निगेटिव्ह थिंकिंग वसू .. हे निगेटिव्ह विचार मनाला कधीच उभारी येऊन देत नाहीत .. मान्य आहे हा प्रॉब्लेम नक्कीच वेगळा आहे .. याच्याशी फाईट करणे इतके सोपे नाहीये .. तू नताशाला ठणकावून सांग .. मला तुझी गरज नाहीये .. माझी माझी मी समर्थ आहे .. मला माझे जीवन जगण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाहीये .. मी माझ्या नवऱ्या बरोबर सुखी आहे .. मला तुझी साथ नकोय .. मी तुझ्या बरोबर येणार नाहीये .. हे तिला कळले पाहिजे .. तिला असे वाटतंय कि आम्ही तुला त्रास देतोय .. तुझ्या चांगुल पणाचा फायदा घेतोय .. "
वसू " जय एक मिनिट .. हेच सगळे मी माझ्या डायरीत जेव्हा तू आपले लग्न एकसेप्ट केलंस ना तेव्हा लिहलंय "
जय " काहीही करून हि डायरी त्या नताशाने वाचली पाहिजे .. तिला विश्वास बसला पाहिजे कि तू माझ्या बरोबर सुखी आहेस .. "
वसू ने तिची लेटेस्ट डायरी जय ला काढून दिली .. जय मी जर मी माझ्या शुद्धीत नसले तर हि डायरी तुझ्याकडे ठेव.. जय ने ती त्याच्या जवळ ठेवून घेतली .
वसू ने जाण्या आधी जय ला एक कडकडीत मिठी मारून घेतली .. जय मी तुला विसरत नाही पण जर विसरले ना ... "
जय ने तिच्या तोंडावर हात ठेवला .. असे काही होणार नाही .. तुला मी सांगितलेलं लक्षात आहे ना .. तू मला वचन बद्ध आहेस .. तू माझी आहेस तुला मरायचा सुद्धा अधिकार नाहीये .. " तिच्या कपाळावर किस करत होता .. तिच्या कपाळाला कपाळ लावत होता .. तिच्या गालावर आलेले अश्रू हाताने पुसत होता ..
दोघे एकमेकांचे सांत्वन करत होते .. वीरू मनोमन देवाची प्रार्थना करत होता .. दोन दिवसां वर अमावस्या आली होती .. आज पासून अमावस्या पर्यंत जय आणि वसू ची परीक्षा होती .
तिघे हॉस्पिटल ला पोहचले .. डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाऊ लागले .. राघव , राहुल आणि समीरा आलरेडी तिकडे आलेलेच होते .. रितेश आणि त्याची आई येणारच होते .. जय ने इन्स्पेक्टर निलेश ला पण मेसेज करून ठेवला होता कि असे असे ते आज ट्रीटमेंट घेणार आहेत .. जर काही गरज लागली तर कॉल करेन ..
वसू ला ऍडमीट करण्यासाठी डॉक्टरांनी एक रूम तयार केली होती .. त्यात चारी बाजूला cctv होते .. फक्त एक बेड .. बाकी कोणतेच सामान नव्हते .. त्या रूम जरासा जरी आवाज झाला तरी कंट्रोल रूम ला ऐकायला जाईल अशी सोय केलेली होती . वसू व्हॉलेंट झालीच तर तिला त्या बेडलाच साखळीने बांधावी लागेल अशी सोय त्या बेड ला दिसत होती .. .
राघव ने जय ला एकट्याला ती रुम दाखवली .. वसू या रूम मध्ये सेफ राहील असे तो सांगत होता .. जय जसे जसे रूम पाहत होता तो पण मनातून घाबरत होता ..
राघव " चलायचं .. सर वाट बघत आहेत "
जय " हो चल .. कधी ना कधी हि वेळ येणारच होती .. "
जय वसु ला घेऊन केबिन मध्ये आला
जय " तु.. आय मिन तुम्ही "
राघव " अरे .. जय .. असा काय बोलतोय .. ते माझे सर आहेत .. आज सकाळीच ते USA वरून आलेत "
सर " अरे .. मिस्टर जय .... हे सर्व तुमच्या पत्नी च्या बाबतीत झालेय का ? अरेरे सो sad "
राघव " सर.. तुम्ही ओळखता का यांना? "
सर " अरे .. तो एक को इन्सिडन्स च म्हणावा लागेल .. तुला म्हटले होते ना मी .. मी USA ला जायच्या आधी कि आज मी एक सत्य नारायणाची पूजा पण सांगितली ते त्यांच्याच घरी "
राघव " अरे बापरे हो का .. तुम्ही म्हणाले होतात आठवले मला .. संध्या काळी तीर्थ प्रसादाला मी तिथे गेलो होतो "
सर " मग मिस्टर जय .. मी तेव्हाच तुम्हाला सांगितले होते कि काहीतरी वेगळाच हवेच दाब मला तुमच्या घरात जाणवतोय .. मला कळले आता .."
जय " सॉरी सर .. मी तेव्हा तुमचा अपमान पण केला .. "
सर " नो इट्स ओके .. तुम्ही तुमच्या पत्नी वर किती प्रेम करता हेच दिसले मला त्यातून .. "
जय " सॉरी सर .. प्लिज माझ्या बायकोला यातून बाहेर काढा "
सर " यासाठी तुम्हला फक्त दोनच गोष्टी करायच्यात .. एक म्हणजे देवा वर विश्वास आणि दुसरा म्हणजे माझ्या वर पण विश्वास दाखवायला लागेल .. तुमची पत्नी माझ्या साठी एक पेशन्ट आहे बाकी काही नाही .. जरी त्या कितीही सुंदर असल्या तरीही "
जय " सॉरी सर .. आता प्लिज अजून किती लाजवाल मला .. मी माफी मागतो तुमच्या त्यावेळी मी जरा जास्तच बोललो मी तुम्हाला .. "
सर " मी तुम्हांला लाजवायला नाही बोलत आहे जय ... मी फक्त क्लिअर करतोय .. "
राघव " सर .. हा माझा खूप जवळचा मित्र आहे .... याच्या वतीने मी पाहिजे तर माफी मागतो "
सर " राघव .. नो नीड ऑफ धिस .. पेशन्ट ला आत मध्ये आणा .. मी एकदा चेक करतो "
जय रुम च्या बाहेर गेला आणि वसू ला हाताला धरून आत मध्ये घेऊन आला
वसू घाबरत घाबरतच आत आली .. समोर खुर्ची वर तिला बसवले .. जय तिच्या बाजूला बसला . राघव जय च्या बाजूला बसला .
सर "नमस्कार मॅडम .. तुम्ही मला ओळखलं का ?"
तसे वसू ने त्यांच्याकडे कडे पहिले .. आणि मग जय कडे पहिले ..
वसू " जय हे तर भटजी आहेत ना "
सर " अरे वाह .. तुमच्या लक्षात आहे म्हणजे मी .. "
वसू " हो .."
सर "काय त्रास होतोय तुम्हाला ?"
वसू " मला थोडा वीकनेस आहे .. कधी कधी खूप जोरात पोटात दुखते .. कधी कधी खूप जोरात पाय दुखतात .. कधी कधी उलटी सारखे पण होते .. आणि हे असे काहीसे सारखे होत राहते .. "
सर " थोड्या इथे बेड वर आडव्या पडणार का ? मी एकदा चेक करतो .. "
वसू जय कडे बघू लागली .. जय ने तिला डोळ्यांनीच हो म्हणून सांगितले .. त्याने तिला मदत केली त्या बेड वर झोपायला ..
सरांनी तिला सस्टेटॉस्कोप ने चेक केले .. bp मशीन ने bp चेक केले .. हाताने पोट दाबून .. इथे दुखते का इथे दुखते का ? असे प्रश्न विचारले .. "
वसू " दुखायला लागले कि पोटात दुखते एवढे नक्की पण कुठे दुखतं ते सांगता येत नाही ..
मग सरांनी तिचे पाय चेक केले .. ढोपरांवर काहीतरी मारून चेक केले ..
आणि सांगितले कि “आपण एक ब्लड टेस्ट करूयात चालेल का ?"
जय ने होकार दिला .. आता होकार देण्या व्यतिरिक्त काही पर्याय पण नव्हता
डॉक्टरांनी स्वतः तिचे ब्लड काढून घेतले आणि नर्स ला लिहून दिले कोणता रिपोर्ट काढायचा ते .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा