Login

परकाया भाग ७३

in this part richa is meetng her mother through vasu

परकाया भाग ७३

क्रमश : भाग ७२

वसू " सॉरी समीरा .. तुझा एक्सीडेंट झाला तरी मी तुझ्या साठी काही करू नाही शकले .. मला माहित नाही मी आता यातून जिवंत बाहेर पडेन कि नाही .. म्हणून एक सांगते .. राहुल .. राहुल चे तुझ्यावर प्रेम आहे .. तो मला नाही बोलला पण त्या दिवशी चुकून मी त्याच्या रूम मध्ये गेले होते तर तुझे खूप सारे मोठे मोठे पोस्टर्स मी त्याच्या रुम मध्ये पहिले .. तो तुझी वाट बघतोय  जशी मी जय ची वाट बघत होते ना तशीच .. "

समीरा च्या डोळ्यात पाणी आले .. आता इथे मरणाच्या दारात उभी असलेली वसू  आता सुद्धा माझा आणि राहुल चा विचार करते ..

समीरा " हो कळलंय मला ते .. माझे आणि जय चे चुकलेच .. आम्ही कसे काय एकमेकांकडे आकर्षित झालो काय माहित ? या सगळ्या मुळे राहुल ला आणि तुला खूप त्रास झाला ना "

वसू "  त्रास नाही ग .. तुझे आणि राहुल च मला माहित नाही पण जय च्या बाबतीत माझ्या कडून काही चुका झाल्या होत्या .. शिवाय माझे त्याच्यावर प्रेम आहे हे सांगण्याचे धैर्य नव्हते माझ्यात .. कदाचित मी सांगून मोकळी झाले असते तर आज परिस्थिती वेगळी होती "

समीरा " हे बघ , मी आणि राहुल लवकरच लग्न करणार आहोत .. माझ्या लग्नात तुला मिरवायचं  आहे तर लवकर बरी हो .. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय .. " समीराने तिला मिठी मारली तिच्या कपाळावर किस केले "

समीरा जे वसू  ला बोलली ते वाक्य बहुदा राहुल ने ऐकले होते ..

सर केबिन मध्ये आले ..  सरांबरोबर  राघव पण होता .. जय ला त्यांनी सध्या तू नको येउस असे म्हणून बाहेर थांबवले .

वसू " जय ला पण बोलवा ना प्लिज "

सर " नाही नको .. तो कॉम्पुटर वर तुम्हला बघतोय .. इथे काय होतंय हे सगळे तो बाहेरून बघतोय आणि ऐकतोय पण .. "

वसू " जय .. ये ना .. प्लिज .. मला एकटीला नको सोडू ना .. " आणि वसू  ने रडायला सुरुवात केली

सर जय ला बोलवे पर्यंत जय डायरेक्ट धावतच रूम मध्ये आला ..

जय " वसू .. रडू नको ना .. प्लिज .. मी आहे  इथेच ..” शेवटी जय चा हात धरून ती  बसली तेव्हा ती शांत झाली .

 सरांनी   लोलक काढला .. वसू  ला त्या लोलका कडे बघायला सांगितले .. वसू चे डोळे डावीकडे .. उजवीकडे  हलत होते .. पापण्या जड झाल्या होत्या .. आणि तिने मान मागे बेड वर टाकली

जय ने तिला अलगद बेड वर झोपवली .. आणि बाजूला झाला

जशी तिने मान टाकली तशी सरांनी नर्स ला बोलावली आणि  सरांनी राघव ला डोळ्यांनी खुणावले ..

राघव ने नर्स ला सांगितले कि त्या साखळ्यांनी वसू चे हात आणि पाय बांधून टाक

जय काही बोलणार तर त्यांनी डोळ्यांनीच त्याला सांगितले " कीप quite .. आवाज नको येऊ दे "

एखाद्या पिसाळलेल्या जनावराला कसे साखळीने बांधतात तसे त्यांनी वसू ला बांधले आणि इकडे जय चा त्याने धरून ठेवलेला त्याचा अश्रूंचा बांध फुटला .. तसाच भरल्या डोळ्यांनी तो रूम च्या बाहेर आला .. त्याला ते चित्र बघवतच नव्हते ..

बाहेर वीरू आणि राहुल उभे होते .. जय विरु च्या गळ्यात पडून जोर जोरात रडायला लागला

जय " माझी वसू .. पुढे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर येतच नव्हते .. "

त्याचे अश्रू बहुल राहुल नि वीरू ला पण भरून आले ..

वीरू " जय .. सांभाळ स्वतःला .. होईल रे ठीक ती .. माझा विश्वास आहे .. " त्याच्या पाठीवर दोघे हात फिरवून त्याला धीर देत होते .. खरं तर सगळेच घाबरले होते ..

समीरा तर आधीच मलूल पडली होती .. मनातून ती देवाचा धावा  करत होती ..

वीरू " जय सॉरी.. पण मला तुला एक सांगायचंय .. हि गोष्ट आता पंकज च्या कानावर घालायला पाहिजे .. उद्या उगाच काही कमी जास्त झाले तर नंतर त्याला खूप वाईट वाटेल .. "

जय " हो .. मला पण कळतंय ते .. पण अरे नंदू चा पाचवा महिना चालू आहे .. तिला कळले तर तिला हा ह्या अवस्थेत सहन नाही होणार "

वीरू " हो .. पण पंकज तिचा सख्खा भाऊ आहे .. त्याला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे तू एकदा त्याच्या बाजूने विचार करून बघ "

जय " एक काम करतो त्याला इकडे बोलावून घेतो .. मग सांगतो "

वीरू " ठीक आहे .. तू काळजी नको करुस .. मी बोलवतो त्याला .. तू आत लक्ष दे "

राहुल " जय .. मी ऑफिस मढे बोलून ठेवलंय .. वेळ आले तर आपण प्राव्हेट जेट ने USA ला जाऊ .. तिकडे तिला चांगली मेडिकल फॅसिलिटी देऊ .. तू काळजी करू नकोस "

जय थोडा सावरला होता .. पुन्हा आता आला

सर " बोल तू कोण आहेस ?"

काहीच उत्तर  नाही

सर " तू कुठे आहेस ?"

तू कुठे आहेस म्हटल्यावर वसू बेड वर हातपाय मारू लागली .. जसा काय तिला श्वास घेता येत नाहीये .. जय आणि राघव घाबरले .. जय तिला पकडायला  जाणार होता .. तर सरांनी त्याला डोळ्यांनीच " नको म्हणून सांगितले

सर " तुला तिकडे कोणी नेले .. तुला काय दिसतंय .. सांग मला सगळे सांग "

वसू " काहीच बोलत नव्हती .. पण अस्वस्थ वाटत होती "

सर " तू हे शरीर का पकडलेस ? तुझे असे कोणते काम राहून गेले .. बोल .. लवकर बोल.. हे बघ आता सांगितलं तर ठीक नाहीतर तुला मी मदत करणार नाही .. तुझे राहिलेलं काम पूर्ण करायला मी तुला मदत करेन .. बोल पटकन ..  "

वसू " काहीच बोलत नव्हती "

सर " हे बघ .. हे बघ तुला तुझ्या मम्मा ला भेटायचंय का ?"

 वसू  ने पटकन डोळे उघडले .. नताशा चा आत्मा सरांना को  ऑपरेट करत नव्हता .. पण जसे आई चा

विषय काढला तसे तिने लगेच डोळे उघडले "

लाल .. रक्ती लाल .. डोळे .. वसू  डोळे डावीकडे .. उजवीकडे .. मोठे मोठे डोळे करून फिरवत होती ..

सर " बोल आता .. तुझा मृत्यू कसा   झाला ? "

वसू कापऱ्या घोगऱ्या आणि भयानक आवाजात " मला जिवंत विहिरीत ढकलून दिले .. "

राघव आणि जय एकमेकांकडे बघू लागले .. राघव लिहीन घेत होता ..

सर " कोणी  ढकलले तुला विहिरीत ?"

वसू " कोणी ते मला दिसले नाही पण .. कारण मी शुद्धीत नव्हते .. मला कोणीतरी कसले तरी इंजेकशन दिले होते पण पुसटशे दिसत होते .. ते राजीव आणि अरमान चे बॉडीगार्ड्स होते "

सर " कोणी  इंजेक्शन दिले .. तू कोणाला भेटायला गेली होतीस ? "

वसू जोरात जोरात बेड वर हालत होती .. तिला बांधले होते त्यामुळे तिला जागेवरून हलता येत नव्हते नाहीतर तिने तिघांपैकी एकावर तरी हल्ला केलाच असता

वसू " मम्मा .. कुठेय .. मी तिला सांगेन .. बुलाओ मेरी मम्मा को "

राघव ने बाहेर मोबाइल वर मेसेज पाठवला .. रिचा च्या आईला बोलवा आणि जय ला थोडा वेळ बाहेर जायला सांगितले

जय बाहेर गेला

रिचा ची आई रम मध्ये आल्या आल्या

रिचा जोर जोरात साखळी तोडून मम्मा ला भेटायला आतुर झाली होती . इथल्या जोरात ती साखळी हलवत होती कि त्या साखळी मुळे वसू च्या हाताच्या मनगट आणि पाया मधून रक्त येऊ लागले

वसू च्या डोळ्यात आता राग नव्हता .. एकदम करुण भाव होता .. ती प्रेमाने तिच्या आई कडे बघत होती ...

वसू " मम्मा .. " एकदम कापरा आवाज

रिचा ची मम्मा पण खूप रडत होती .. तिने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला .. जसा मम्मा चा हात तिच्या डोक्याला स्पर्श झाला .. रिचा एकदम जोर जोरात रडायला लागली .. मम्मा मुझे माफ कर दो .. मैने आपका दिल दुखाया है ।

रिचा मम्मा " नहीं बेटा शायद मै भी ज्यादा हि सक्त हो गयी तुम्हारे साथ .. काश तुम जब घर आयी थी तभी मैने तुम्हे माफ किया होता "

वसू " मम्मा मेरे पास आ जाओ .. मुझे एकी गोदी मी सर रखना है "

बाहेर रितेश सगळे पाहत होता .. तो पण चक्क रडत होता ..

रिचा ची मम्मा " आ जा बेटा .. आजा .. मै तुझे सुलाती  हूं .. "

वसू च्या इतक्या जवळ जायची भीतीच वाटेल पण शेवटी आईच हो ती .. तिला आपल्या मुली ची कशी भीती वाटेल ..

त्या तीच डोके मांडीवर घेऊन तिला मायेने थोपटत होत्या ..

वसू तोंडातून फार विचत्र आवाज काढत होती .. रिचा चा  आत्मा रडत होता .. तो आवाज ऐकायला खूप भीती दायक होता ..

रिचा ची मम्मा " बेटा .. तुने तो अपनी जिन्दगी अपने हिसाब से जिली .. लेकिन बेटा तू ये सही नहीं कर रही हैं .. तू वसू  कि जिन्दगी खराब मत कर बेटा .. तू मुक्त हो जा बेटा .. मेरी सोना बेटा आपली मम्मा कि बात मानगी ना "

वसू " आ..... आ... खूप रडत होती .. "

रिचा बेटा " उसका पती उसकी राह देख रहा हैं .. जिद छोड दे बेटा .. तू वसू  के शरीर को छोड देगी ना "

वसू " अरमान .. अरमान .. को बुलाओ .. मैं उससे बात करना चाहती हूं .. मम्मा मै आपके पास आने वाली थी हमेशा के लिये .. मै माँ बनने वाली थी "

अचानक वसू  पूर्ण ताकतीने त्या बेड सकट उभी राहिली .. खूप अग्रेसिव्ह झाली होती ..

रिचा च मम्मा पण एक मिनिट घाबरली

राघव ने त्यांना लगेच  मागे घेतले .. नाहीतर त्या साखळीने त्यांना लागले असते

सर " कोणाशी ? कोणाशी लग्न ठरले होते तुझे ?"

वसू " कोणाशी काय ? अरमान शी ... अरमान च मेरे बच्चे का बाप था "

सर " नीट सांग काय झाले तुला ? कोणी मारले तुला ? का मारले तुला ? "

वसू " त्या दिवशी वसूचा पंजाबी ड्रेस घालून मला खूप छान वाटत होते .. आणि वसू  शी गप्पा मारल्यावर पण छान वाटत होते .. तिने मला सांगितले कि अजून वेळ गेलेली नाहीये .. या सगळ्या तुन बाहेर पडून  एक चांगले आयुष्य तू जगू शकतेस .. वसू  च्या  या बोलण्याने मला माझी हि मॉडेल वाली जिन्दगी सोडवशी वाटली .. कुठेतरी छोटीशी नोकरी करू .. छान संसार करायचा होता मला .. मला फसवले त्यानं .. मला फसवले त्याने आणि वसू  बेड वर  झोपली होती ती ताडकन उठून बसली .. तिचे लाल डोळे एकदम राग ओकत होते .. प्रतिशोध होता तिच्या डोळ्यांमध्ये .. "

जय बाहेरून खूप घाबरत होता .. एव्हाना वसू च्या हाताला खुप लागले होते .. तिचे शरीर हि कंपने सहन करण्या पलीकडे गेले होते

वसू " अरमान .. अरमान शी लग्न करणार होते .. तो यायला पण तयार झाला होता .. आम्ही कोर्ट मॅरेज करणार होतो .. "

सर " मग काय झाले ?"

वसू " अरमान ने मला सांगितले कि तो ठीक १० वाजता कोर्टात भेटेल .. मी आदल्या दिवशी माझ्या साठी नवीन शादीचा जोडा आणला .. एक मंगळसूत्र भी मैने खरीद लिया .. मेहंदी काढली हातावर .. मी सकाळी १० वाजल्या पासून कोर्टात जाऊन थांबले होते .. संध्याकाळचे ४वाजले तरी अरमान आला नाही .. त्याचा मोबाईल पण बंद येत होता .. त्याच्या  गार्ड चा पण नंबर लागत नव्हता .. " वसू  च्या  डोळयांतून घळघळ पाणी ओघळत होते ..

0

🎭 Series Post

View all