परकाया भाग ७५
क्रमश : भाग ७४
जय " डॅम इट सर .. प्लिज डू सम थिंग व्हेरी फास्ट .. लूक ऍट हर .. ती पांढरी पडतेय .. ब्लड फ्लो थम्बलाय .. डॉक्टर हरी अप .. आपण एक्सटेर्नल ब्लड सप्लाय करू .. इकडे जोर जोरात पम्पिंग सुरु होत ..
जय हात रब करत होता .. कानाशी बोलत होता ..
शेवटी तिला आय सी यु मध्ये शिफ्ट केली .. व्हेंटिलेटर वर ठेवली आणि ब्लड लावले ..
सर " अर्धा तास तरी आपल्याला वेट करावे लागेल .. "
जय बाहेर डोक्याला हात लावून बसला होता .. तेवढ्यात पंकज आला .. पंकज
वीरू " अरे पंकज इतक्या लवकर कसा काय आलास ?"
पंकज " अरे तुझा फोन आला ना तेव्हा आलरेडी मी बाजूच्या शहरात ऑफीस च्या कामाला आलो होतो . वसू ला बरे नाहीये म्हटल्यावर सगळे सोडले आणि निघालो तडक .. जय अरे काय अवस्था करून घेतलीय स्वतःची .. काय झालंय वसू ला ? "
जय काही बोलायच्या मनस्थितीत नव्हता .. त्याने पंकज ला एक घट्ट मिठी मारली
जय " सॉरी मी आपल्या वसू शी काळजी नाही घेऊ शकलो .. मी हरलो .. सॉरी मला माफ कर .. मी तुझा गुन्हेगार आहे"
वीरू " जय अरे सांभाळ स्वतःला .. तू स्वतःला का दोष देतोय .. "
पंकज ला काहि कळे ना .. हा काय असे बोलतोय .. नक्की काय झालेय
वीरू ने पंकज ला सगळे सांगितले
पंकज ला पण आधी विश्वास बसला नाही .. त्याच्या पण डोळ्यात अश्रू आले .. अरे यार माझी वसू यात कुठे फसली .. आणि जय .. बिचारा केव्हा पासून एकट्याने सगळे पेलतोय.. आम्हाला सांगितले पण नाही .. काय करू याचे मी ..
जय डॉक्टरांना बोलला मी तिला घरी घेऊन जातो .. तीला हॊस्पिटला मध्ये रात्र काढायची नव्हती ..
सर " मिस्टर जय .. आर यु आऊट ऑफ माईंड .. इकडे काय चाललंय कळतंय का ? सगळे एक्सपर्टस डॉक्टर तुमच्या मिसेस ला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत .. थोडा धीर धरा .. तिचे हार्ट बिट्स बारीक असले तरी बंद नाहीयेत .. थोडा टाइम द्या .. राघव प्लिज टेक हिम अवे "
जय " सॉरी सर .. मला तिच्या जवळ बसू द्या ना प्लिज .. तुम्ही राघव ला विचारा ती मला रेस्पॉन्ड करते .. ती थोड्या उशिरा का होईना पण माझ्या आवाजाने ती शुद्धीत येते .. "
राघव " सर मागे पण असेच बरयाचदा झालेय .. वसू त्याला रीस्पॉन्ड करते .. मी माझ्या डोळ्यांनी पहिलय "
सर " ठीक आहे .. एक अर्धा तास द्या .. नाहीतर मी जय ला आत मध्ये पाठवायची सोय करतो "
वीरू " राहूल तू समीराला घेऊनन घरी जा .. इथे किती वाजे पर्यंत थांबाल .. समीरा पण खूप थकलेली दिसत आहे .. तिला पण आरामाची गरज आहे . रितेश तू तुझ्या मम्मा ला घेऊन घरी जा .. हि चावी घे .. "
वीरू मुद्दामून एकेकाला घरी पाठवू लागला .. कारण बरीच जण असल्यामुळे गोधळ होऊ लागला होता .. आणि जय आय सी यु च्या बाहेर काचेतून जे बघत होता ते तिथून हटतच नव्हता ..
पंकज ला नक्की अजून काय होतय याचा अंदाजच येत नव्हता
राघव ला सरांकडे बघू का जय ला सांभाळू असे झाले होते ..
राहुल समीराला घेईन निघून गेला .. वीरू ला सांगून गेला .. काहीही वाटलं तर कॉल कर मी पोहचून जाईल लवकर "
वीरू पंकज ला घेऊन रूम बाहेरच्या बाकावर बसून घडलेले सगळे नीट डिटेल मध्ये सांगत होता .. .
अर्धा तास झाला वसू काहीच रीस्पॉन्ड करत नव्हती .. जय ला बाहेर थांबायला होतच नव्हते .. तो रिक्वेस्ट करून करून शेवटी वसू च्या रूम मध्ये गेलाच ..
तिच्याच बेडवर तिच्या शेजारी झोपला .. तिचा हात हातात घेऊन आडवा पडला .. तिचा हात त्याने त्याच्या हृदयावर ठेवला .. जय च्या हृदयाचे ठोके वसूच्या हाताला जाणवत होते ..
जय " वसू उठ .. चल आपल्याला घरी जायचंय .. जायचंय ना .. तू तर म्हणाली होतीस तुला हॉस्पिटल मध्ये झोपायचे नाहीये .. मी तुला न्यायला तयार आहे तर तू उठत नाहीयेस . वसू पंकज आलाय तुला भेटायला .. जय पुन्हा कान जवळ जाऊन " वसू गावा वरुन पंकज आलाय तुला भेटायला .. तो तिच्या गालावर हलक्या थपडा मारू लागला .. " वसू उठ यार ..किती त्रास देशील आता .. माझा जीव घेणार आहेस का आता ? वसू उठ ना .. "
यावेळी वसू अर्धा तास होऊन गेला तरी रीस्पॉन्ड करत नव्हती .. जय बोलून बोलून थकला होता .. तिच्या कडून काहीच रिस्पॉन्स मिळेना .. सगळेच टेन्शन मध्ये होते
हळू हळू वसू चे शरीर जय ला पांढरट दिसत होते .. हि अशी का दिसतेय .. हे सांगून सांगून जय वैतागला .. डॉक्टरांच्या कोणत्याच ट्रीटमेंट ला ती रिऍक्ट करत नव्हती .. जय च्या डोळ्यात अश्रूंच्या धारा तर येतच होत्या पण खूप इंपेशण्ट झाला होता .. त्याला आता त्याची वसू पाहिजे होती .. आत्ताच्या आता .. तो न थकता काही बाही तिच्याशी बोलत होता मुद्दामून तिच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी .. आई अप्पा , नंदू , तिची आई , पंकज , त्यांच्या गावातल्या गोष्टी बोलत होता .. वसुच्या कदाचित कानापर्यंत त्या गोष्टी हळू हळू जातहि असतील पण शरीरात त्राण नव्हता .. एखाद्याने शरीरातील सगळे त्राण काढून घेतल्यावर फक्त मेंदू आणि हृदय चालतंय अशी तिची अवस्था होती ..
जय काना जवळ जाऊन बोलता बोलता तिला किस करू लागला .. " वसू उठ .. आपल्याला सगळे बघतायत .. उठ .. बघ हा मी तुला किस करेन अजून एकदा .. बाहेर पंकज पण आलाय .. नंतर माझ्यावर चीडशील .. बघ हा उठ .. मी आत तुला किस करणार आहे नाहीतर .. उठ .. आणि पुन्हा तिला किस करू ..
तिथल्या डॉक्टरांना खूप राग येऊ लागला .. तिथला एक डॉक्टर आत आला आणि जवळ जवळ जय ला ओढून बाहेर नेऊ लागला होता .. जय ला तो डॉक्टर ओढत होता तर इकडे वसू ने त्याचा हात पकडला ..
डॉक्टर " आर यु मॅड .. हे काय चाललंय ? शी इज आऊट ऑफ कॉन्शस "
जय च्या किस ने वसू चा थाम्बलेला रक्त प्रवाह सुरु झाला .. तीच शरीर जे पांढरट .. निळसर दिसत होते ते पुन्हा .. थोडे थोडे नॉर्मल दिसायला लागले
जय " डॉक्टर .. स्टॉप ... लूक शी होल्ड माय हॅन्ड .. "
तो डॉक्टर पण अश्यर्यचकित झाला .. वसू ने त्याचा हात बऱ्यापैकी घट्ट पकडला होता .. पण डोळे मिटले होते
बाहेर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .." नाऊ शी इज आऊट ऑफ डेंजर " असे सर राघव ला म्हणाले ..
जय ची अवस्था तर शब्दात सांगणे कठीण होती .. हसतोय का रडतोय त्याला काहीच कळत नव्हते .. तो पुन्हा तिच्या शेजारी येऊन बेड वर आडवा पडला .. तिला कुशीत घेऊन तिच्या डोळ्यातल्या ओघणाऱ्या अश्रुना पुसू लागला ..
जय " किती घाबरवतेस मला . इतका त्रास देते का कोणी ? मी काय बोलत नाही तर .. काही पण करायला लावतेस का मला .. इथे सगळ्यांसमोर "
राघव ने बाहेर येऊन वीरू ला आणि पंकज ला सांगितले वसू अजून शुद्धीत आली नाहीये पण आऊट ऑफ डेंजर आहे
वीरू आणि पंकज धावतच आय सी यु मध्ये डोकावले तर जय तिच्या बेड वर तिच्या पांघरुणात झोपला तिला कुशीत घेऊन शांतपणे झोपला होता
पंकज " अरे हा वेडा आहे का ? ती हॉस्पिटल मध्ये आहे याचे तरी भान आहे कि नाही त्याला "
राघव " खरंच तो वेडा आहे .. आणि म्हणूनच वसू बहुदा आज वाचलीय .. मेडिकल सायन्स ने हात टेकले होते .. केवळ आणि केवळ जय च्या प्रेमा मुळे वसू शुद्धीवर आलीय.. "
पंकज ला जे ऐकावे ते नवलच वाटत होते .. दोघे पुन्हा बाकावर येऊन झोपले ..
राघव आणि सर त्यांच्या केबिन मध्ये पुन्हा केस डिस्कस करू लागले
सर " सिरिअसली राघव .. इतके प्रेम करतो ना हा तिच्यावर .. मी तर हे असे पहिल्यांदाच पहिले .. जवळ जवळ १ तास तो तिच्या जवळ बोलत होता .. त्याने केलेल्या किस मुळे तिच ब्लड सर्कुलेशन होऊ लागले आणि त्यामुळे ५ मिनिटांनी ती हात पकडण्याच्या योग्य झाली .. बापरे .. देवा कोणती परीक्षा बघतोयस रे पोरांची .. मुक्त कर त्रासातून या दोघांना .. "
राघव " सर मी पण खूप घाबरलो होतो .. म्हटले बहुतेक रिचा चा आत्मा वसू च्या आत्म्याला पण घेऊन गेला कि काय ?"
सर " अरे हो ना .. मला पण वाटले पोरगी चे इंटर्नल व्हेन्स फुटल्या कि काय ? आता ती जर शुद्धीत आली नसती ना .. ती पांढरी पडत होती .. जय हुशार आहे .. त्याचे तिच्याकडे खूप लक्ष होते .. आपल्याला कळले पण नसते कि ती गेली म्हणून .. तिच्या स्किन मध्ये झालेला बारीकसा बदल त्याला लगेच कळला होता .. ग्रेट आहे यार तो .. "
राघव " हो सर .. हि रिअली लव्हज हर .. पुराणात एक सावित्री होती तिने यमाकडून तिच्या नवऱ्याचे प्राण परत आणले होते .. हा एक सत्यवान आहे जो त्याच्या सावित्री साठी जीवाचे रान करतोय .. आलेल्या परिस्थिती शी लढतोय " हॅट्स ऑफ टू हिम "
सर " बघ राघव आता हे तर कळलंय ... कि तिचा मृत्यू कसा झालाय .. आणि तिचे शरीर कुणीकडे आहे हे सुद्धा आपल्याला कळलंय .. उद्याचा दिवस मध्ये आहे .. पर्वा अमावस्या आहे .. त्या आधी पोलिसांची मदत घेऊन तिचा मृतदेह बाहेर काढून ठेवायचा .. तिथेच अरमान ला आणि तिच्या आई आणि भावाला बोलावून घेऊ .. आपण हिला हॉस्पिटल च्या ऍम्ब्युलन्स मधूनच तिकडे घेऊन जाऊ .. आता असे सेशन करत बसण्यात पॉईंट नाही .. आणि शिवाय तिच्या जीवाला धोका आहे .. त्यामुळे आता तिला इथेच अराम कार्याला लावायचे .. आणि बाकीची तयारी करू .. तू तिच्या आईशी बोलून घे .. तिच्या शरीराचे प्रॉपर अंतिम संस्कार करू ..
मी उद्या मंतरलेला धागा वसू च्या हातावर बांधतो .. तिच्या वर अंतिम संस्कार करायच्या आधी तिला आपण अरमान ला भेटवायची .. अरमान ला भेटल्यावर ती नक्कीच आक्रमक होईल ..
मी जो धागा बांधेन तो धागा जेव्हा तिचा आत्मा मुक्त होईल तेव्हा आपोआप जाळून खाक होईल म्हणजे आपल्याला पण कळेल कि तीचा आत्मा मुक्त झाल कि नाही .. आणि ते झाल्या नंतर जय च्या घराची शुद्धी करावी लागेल .. वसू च्या ज्या वस्तू तिच्या कडे आहेत त्या सगळ्या तिच्या शिरा बरोबर जाळून टाकायच्या .. आणि एक कापडी बाहुली बाळा सारखी गुंडाळून तिच्या शरीरा बरोबर तिला पण दहन करायचे .. कारण तिचा जीव तिच्या बाळात अडकलेला आहे ..
राघव " ठीक आहे मी बाकीची तयारी करतो .. तुम्ही तेवढे त्या पोलिसांशी बोलून घ्या . ती केस ची कॉपी आपल्याला त्यान्ना द्यावी लागेल .. म्हणजे अरमान ला कायद्याने शिक्षा होईल "
सर " ठीक आहे .. बघू काय होतंय ते "
सकाळी वसू उठली तेव्हा तिने बघितले जय च्या कुशीत ती आहे आणि जय शान्तपणे गाढ झोपलाय पण त्याने त्याचे हात तिच्या भोवती असे घट्ट पकडून ठेवले होते कि ती जरा जरी हलली तरी तो उठेल .. तिने डोळे उघडले पण आज ती वसू नव्हतीच .. आज ती रिचा होती ..
रिचा ला जय चा राग येऊ लागला .. कि हा माझ्या इतका जवळ का घेऊन झोपलाय ..तिच्या शरीराला तर अशक्त पणा होताच .. उठायची नाही हलायची पण ताकद नव्हती .. शिवाय हाता च्या मनगटाला आणि पायाला घोट्याला खूप जखमा झालेल्या तिथे पण बँडेज केलेले होते ..
रिचा " ए हॅलो .. प्लिज लिव्ह मी .. तुला लाज वाटत नाही .. मेरे करीब सोया है .. चल उठ .. "
जय ला खरं तर खूप झोप येत होती .. तो पण खूप दमला होता ..
जय " वसु .. प्लिज यार लेट मी स्लिप .. आणि तू पण झोप .. "
वसू " कोण वसू .. मी रिचा आहे .. रिचा .. सोड मला .. आलरेडी मला हाताला खूप पेन होतंय "
हे वाक्य ऐकल्यावर जय चे डोळे खाडकन उघडले ..
जय ने तिला अजून घट्ट पकडले
बाजूला एक बेल होती ती वाजवली .. लगेच तिकडे नर्स आली ..
जय " प्लिज कॉल राघव .. इट्स अर्जेंट "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा