Login

परकाया भाग ७६

in this part richa is free from all her pain

परकाया भाग ७६

क्रमश : भाग ७५

राघव लगेचच आला .

जय " ती रिचा म्हणून उठलीय "

राघव " अरे बापरे !! .. तू थाम्ब तसाच मी सरांशी बोलतो "

राघवन सरांना फोन करून सांगीतले .. सरांनी तिच्या आई आणि भावाला बोलावून घ्यायला सांगितले ..

इकडे वसू " अरे तू कोण आहेस .. का मला असे पकडून का ठेवलेय .. प्लिज सोड मला .. मला घरी  जायचंय

जय " तू मला ओळखत नाहीस का ? .. वसू  तू मला ओळखतेस .. वसू आहेस तू "

रिचा " प्लिज सोड मला .. माझ्या हाताला काय केलय .. माझ्या पायाला पण बँडेज का लावलय.. प्लिज मला जाऊ दे .. मला अरमान ला भेटायचंय "

तेवढ्यात पंकज आणि वीरू रूम  मध्ये आले ..

रिचा " कोण आहेत तुम्ही लोक .. मला असे का बघताय .. प्लिज सोडा मला "

पंकज ला तर काय बोलावे आणि कसे रिऍक्ट करावे ते समझेच  ना

वीरू त्याला डोळ्यांनीच सांगत होता " थांब  तुला सांगतो नंतर "

पंकज ला एवढे तर नक्कीच कळले होते जय ची चांगलीच वाट लागलीय .. जे काही चाललंय ते खूप भयानक आहे आणि विचार शक्तीच्या पलीकडे आहे ..

रिचा च्या अक्रास्थळ पणाला बघून  जय ने नर्स ला सांगून तिला पुन्हा साखळीने बांधायला सांगितले

नर्स ने सरांशी बोलून तिला एक झोपेचे इंजेक्टशन दिले आणि झोपवले

ती जशी झोपली तसा  जय उठला.

एक दिवस तिला असाच अराम करायला लावला . ती शुद्धीत आली कि लगेच तिला खायला प्यायला देऊन झोपवून ठेवली .

दुसरया दिवशी सकाळी  हॉस्पिटल मधून ऍम्ब्युलन्स निघाली  आज अमावस्या होती . आणि आंब्याच्या झाड जवळ येऊन थांबली .

पोलिसांची एक टीम पाण्यात उतरली होती .. रिचा ची बॉडी पाण्यातून काढायचा प्रयत्न चालू होता .

जय त्या ठिकाणी आल्यावर लिटरली एकदम हडबडलाच .. हेच ते ठिकाण जे त्याला स्वप्नात दिसले होते आणि तो लाल कपडा त्या आंब्याच्या झाडाला लटकलेला होता म्हणजे तो वसु च्या ड्रेस चा दुपट्टा होता ..

सरांनी तिथेच पूजेचे सामान मांडले .. बॉडी बाहेर काढायच्या आधी पासूनच ते मंत्र महा मृत्युन्जय  मंत्राचा जप करू लागले .. हनुमान चालिसा .. राम  रक्षा असे पवित्र श्लोक जप करू लागले ..

मंतरलेला पवित्र धागा सरांनी वसू  च्या  हातात बांधला.

एका बाजूला तिच्या देहाचे दहन करण्यासाठीची तयारी राघव करत होता .. लाकडाचे सरण तयार होते ..

वसू  ला अजूनही इंजेक्शन देऊन झोपवून ठेवले होते ..

रितेश आणि रिचा ची मम्मा खूप दुखी होते पण आता जे झालय ते त्यांनी एकसेप्ट केलंय .. अशा प्रकारे मरून सुद्धा मुक्ती ना मिळण्या पेक्षा लवकर मुक्त होईल तेवढेच बरे .. आणि यातून वसू  आणि जय बाहेर पडतील ते बरे अशी मानसिक तयारी झाली होती आता त्यांची .

जय ने एक पॅकेट रिचा च्या मम्मा ला दिले

जय " येह वही सारी है जो आपने चंदीगड में वसू को दि थी .. उसमे बाकी का सामान भी है .. बँगल्स टीका सब है .. वैसे भी वो शादी करना चाहती थी .. उसका शरीर जब पानी से निकलेंगा ये सब उसके शरीर के उपर डालदो .. एक दुल्हन  कि तरह उसको हम बिदा करेंगे "

रिचा ची मम्मा " हा बेटा .. जैसे तुम्हे ठीक लगे गा "

 त्यांचे दुःख बघून जय ला पण वाईट वाटले .. त्याने त्यांना एक मिठीच मारली ..

जय " एक माँ को येह सब देखना पड रहा है .. मै आपकी फिलिंग समज सकता हूं .. "

वसू च्या शरीरात असलेल्या रिचा ने सांगितलेल्या गोष्टीच्या व्हिडीओ च्या बेस वर अरमान ला त्याच्या फार्म हाऊस वरून अटक केले होते .. त्याला अटक करून विहिरी जवळ आणायला सांगितले होते

सरांनी जय ला वसू  बाहेर पूजेच्या इथे आणून पाटावर बसवायला सांगितले .. वसू  ला त्या मंत्रोउच्चाराने थोडी थोडी जाग येत होती ..  सरांनी तिच्या डोक्यावर देवीचे पवित्र कुंकू फासले आणि हनुमान चालिसा .. बजरंगी बाण , राम रक्षा याचे पठण सुरु केले .. जय तिच्या बाजूलाच बसला होता ..

तेवढयात विहिरीतुन तिचा मृतदेह बाहेर काढला .. पाण्यात असल्यामुळे मृतदेह अर्धा माशांनी खाल्ला होता .. काही खराब झाला होता .. तिच्या मृत देहाला बघितल्या वर रितेश आणि आई यांचा मात्र तोल सुटला होता .. खूप जोरात त्याचे रडायला लागल्या होत्या .. वीरू आणि पंकज त्या दोघांना सांभाळत होते ..

पोलिसांनी पांढऱ्या कपड्यांनी तिच्या शरीराला कव्हर केले .. रितेश ने ती साडी .. बांगड्या , टीका सगळे तिच्या शरीरावर टाकले .. पोलिसांच्या मदतीने तिचा मृतदेह सरणावर ठेवला गेला ..

वसू च्या डोळ्यांतून आपोआप अश्रू निघत होत

तिथे असलेल्या सर्वांनी तिच्या मृतदेहाला नमस्कार केला .. तिच्या आत्म्याच्या मुक्ती साठी प्रार्थना करत होते ..

थोड्याच वेळात अरमान ची गाडी तिकडे आली

जशी अरमान शी गाडी तिकडे आली .. वसू ने डोळे उघडले .. पुन्हा तसेच लाल डोळे .. होते .. जय ने तिला घट्ट पकडून ठेवले होते .. जय च्या हाताला हिसका देऊन वसू उभी राहिली ..

तिथे असलेले सगळेच जण घाबरले ..

सरांनी जय ला खुणावले .. सोड  तिला

वसू च्या शरीरात ताकद नव्हती ..

कशी बशी चालत ती अरमान जवळ जाऊ लागली ..

अरमान नताशा च्या शरीरराला नमस्कार करत होता .. तर हिने जाऊन त्याला मागून ओढले .. तसा तो घाबरून खाली पडला ..

रिचा " मेरे बच्चे ने तेरा क्या  बिघाडा  था ? जो उसके आने  के पहिले हि तुने मुझे मार दिया .. " वसू चा आवाज खूप भयानक होता .. राग आक्रोश , दुःख ,, डोळ्यातून पाणी पण येत होते .. एका आईच्या भावना होत्या त्या .. आपण मेलो त्याच्या दुःख पेक्षा आपले बाळ गेले याचे दुःख आणि यातना तिच्या आत्म्याला जास्त होत होत्या "

रिचा ने एका  हाताने अरमान ला उचलले आणि कागदाला भिरकावतात तशी भिरकावली

अरमान आंब्याच्या झाडाला जाऊन आदळला .. त्याच्या कपाळाला हाताला मार  लागला होता ..

आजू बाजूचे पोलीस .. हि सगळी मंडळी बघून घाबरत होती .. मध्ये पडायची कोणाची हिम्मत होत नव्हती ..

 निलेश पण तिथेच होता .. मॅडम चे हे भयानक रूप तो आज बघत होता .. सरांनी कॅमेरा पण लावले होते म्हणजे तिथे जे होतंय ते रेकॉड होईल 

एखादी डेड बॉडी चालावी तशी वसू  चालत पुन्हा अरमान जवळ गेली

रिचा "तू तो बाप था ना उस  बच्चे का ? बोल था कि नहीं ?"

अरमान ला तिने एका हातात उचलले होते

अरमान " हा .. हा .. मैं हि था .. मुझे माफ़  कर दे रिचा .. मैं तुझे मारना नही चाहता था .. लेकिन राजीव ने मुझे समझया कि अब तुझे मारना हि पडेगा .. नहीं तो तू चंदीगड जाके पोलीस कंप्लेंट करेगी .. "

वसू  चे डोळे आग ओकत होते ..

रिचा " उसको तो मैने फेक दिया नीचे .. मेरी जिंदगी खराब कि उसने .. और ऊस दिन वसू  को बरबाद करने वाला था .. रितेश को भी मार रहा था .. फेक दिया साले को नीचे .. जैसे मैं तडफ के मरी थी .. वोह भी ऐसा हि मर गया .. अब 'तेरी बारी है "

सर " रिचा उसको नीचे रख दे .. .. अरमान को पोलीस पकडेगी .. उसको उसके गुनाह किती सजा जरूर मिलेगी .. तू असे छोड दे "

रिचा " नही .. जोरात ओरडली ..ऐसे कैसे छोड दु .. उसके सामने मुझे किसीने इंजेक्शन लगवाया . उसने कुछ भी नहीं किया .. और मैं प्यार करती थी .. अपना पती माना था .. और इसने मेरा विश्वासघात किया है .. मेरे प्यार का अपमान किया है .. मैं इसे माफ़ नहीं करुंगी "

सर  " पहले मुझे एक वादा कर .. तू वसू  के शरीर को हमेशा के लिये छोड देगी .. चली  जायेगी .. फिर वापीस कभी भी नहीं आयेगी "

रिचा " हा .. ठीक हैं .. मै चली  जाऊंगी .. लेकिन अरमान को माफ नहीं  कारुंगी .. "

तेवढ्यात अरमान ने तिथल्या पोलिसांची पिस्तूल काढली आणि वसू वर नेम धरला

अरमान " हे शरीरच नाही राहिले तर तू काय करणार ..  अरमान ने कसलाही विचार न करता वसू वर गोळी झाडली ..

बंदुकीतून गोळी सुटली आणि आता वसू  ला लागणार तर जय ने तिला बाजूला केले आणि गोळी जय ला लागली ..

गोळीच्या प्रेशर ने जय  अर्धा मीटर  मागे सरकला गेला .. आणि झाडाच्या बुंध्याला आपटला आणि खाली  पडला

टन .. असा एकदाच जोरात आवाज झाला ..

वीरू .. पंकज .. निलेश ,राहुल समीरा सगळे जय कडे धावले

प्रत्यक्षात जय ला ती गोळी लागली होती पण जय च्या गळ्यात चंदिगढ च्या आंधळ्या साधूने दिलेलं लॉकेट होते .. गोळी त्या लॉकेट ला लागून खाली पडली .. त्याचा टन असा आवाज झाला .. पण गोळी च्या फोर्स मुळे जय मागे ढकलला गेला नि मागे डोक्याला झाडाच्या बुंधाट्याचा दगड त्याला लागले आणि डोक्यातून रक्त येऊ लागले

तो आंधळा साधू म्हटल्या प्रमाणेच झाले .. तू कवच आहेस तिचा .. आणि हे लॉकेट तुला आता नाही नंतर कामाला येईल .. आज  केवळ त्या लॉकेट च्या पेंडंट मुळे जय ला बुलेट लागली नव्हती ..

आता मात्र रिचा खवळली आणि तिने क्षणार्धात अरमान ला उचलले आणि विहिरीमध्ये फेकले ..

इकडे सरांनी त्यांचे मंत्र चालूच ठेवले आणि तिचा अंतिम दहनाचा प्रोग्रॅम सुरु केला .. इकडे रितेश ने तिच्या देहाला अग्नी दिला .. हळू हळू तिचे शरीर पेट घेऊ लागले .. सरांचे मंत्र चालूच होते ..

सरांनी वीरू ला खुणावले कि वसू  आता बेशुद्ध पाडणार आहे तिच्या बाजूला थांब ..

१५ एक मिनिटांनी वसू च्या  हातातला मंतरलेला दोरा आपोआप जळाला आणि त्याची राख झाली ..

सरांनी  आणि राघव ने डोळे मिटले ..

जय ला लागले होते पण स्वतः  उठून आला आणि वसू  ला धरू लागला ..

तिला उचलून गाडीत टाकणार तर तोच चक्कर येऊन खाली पडला.

तिथेच ऍम्ब्युलन्स होती .. जय ला आणि वसू  ला लगेच ऍम्ब्युलन्स मध्ये घालून जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केली ..

पंकज वीरू राहुल समीरा सगळेच टेन्शन मध्ये .. आता वसू  ला शुद्धीत कोण आणणार .. नेहमी ती अशी बेशुद्ध झाली कि जय बोलून बोलून तिचा शुद्धीत आणायचा ..

राघव  सरांच्या पाया पडला .. सर फायनली .. रिचा चा आत्मा मुक्त झाला .. थँक यु सर "

सर " अजून आपले काम संपले नाही .. जय च्या घराचे शुद्धीकरण करायचे आहे .

सरांनी पुन्हा एकदा वसू  ला चेक केलं .. तिच्या डोळ्यात टॉर्च मारून चेक केले .. तिचे हार्ट बिट्स पुन्हा स्लो होते.

जय ला चेक केले .. त्याचा रक्त स्त्राव खूप झाला होता आणि डोक्याला मार लागल्या मुळे  त्याला टाके पडले होते .. त्याला शुद्धीत यायला अजून २ तास तरी लागणार होते

 शेवटी राघव ला एक आयडिया सुचली

राघव " सर दोघांना एकाच बेडवर ऍडमिट करा .. कदाचित जय च्या स्पर्शाने वसू ला लवकर शुद्ध येईल .. "

सरांना पण हे पटले .. सरांनी तशा सूचना डॉक्टरांना दिल्या .. आणि वीरु आणि पंकज रितेश आणि रितेश च्या आई ला घेऊन जय च्या फ्लॅट वर आले ..

येई पर्यंत त्यांना पहाट झाली होती .. सकाळी लगेचच पूजा सुरु केली .. त्याच्या घरातली जी रूम बंद होती ती मधली रूम उघडली .. त्याच रूम  मध्ये होम हवन सुरु केले .. त्या रूम  मधले सर्व सामान बाहेर काढले अगदी बेड कपाट पडदे पांघरून कपडे सगळेच .. सर्व सामान एका मोकळ्या मैदानात जाऊन जाळून टाकले .. घरात गंगाजल चा शिडकावा कोपर्या कोपऱ्या मध्ये केला .. शांती केली होती

तसेच नताशा च्या फ्लॅट मधले पण सगळे सामान काढून ते सामान पण त्यांनी जाळून टाकले .. तिथेही शुद्धी केली .. शांती केली होती.

0

🎭 Series Post

View all