आता पुढे..
आता हळूहळू अरबाज आणि पारो एकमेकांना बाहेर भेटायला लागले.तासंतास हातात हात घेऊन समुद्रकिनारी फिरायला लागले.पारू घरच्यांशी खोटे बोलून कधी एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने तर कधी मैत्रिणीला भेटायचं म्हणून बाहेर पडू लागली.एक-दोन भेटीनंतरच अरबाज ने केलेली शरीरसुखाची मागणी सुद्धा तिने पूर्ण केली होती.ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.म्हणूनच तर तिने त्याच्या शपथेखातर पहिली बियर प्यायली आणि मग पुढे शपथा आणि नशा करणे वाढतच गेले.एका सुसंस्कारित आणि श्रीमंत घरातील पारो आता नशेच्या पूर्ण आहारी गेली होती.दुर्दैवाने तिच्या घरामध्ये कुणालाही ह्या गोष्टीची कल्पना आली नाही.दिवसा मागून दिवस जात होते. पारो बारावी मध्ये शिकत होती. तिने सिव्हिल इंजिनियर व्हावं असं तिच्या पप्पांचं स्वप्न होतं.परीक्षा अगदी तोंडावर आल्या होत्या.मागील काही दिवसापासून मोनिकाला पारोच्या वागण्याचा संशय येत होता म्हणून तिने पारो घरी नसताना तिच्या रूमची तपासणी केली.पारोच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये तिला सिगरेट आणि ड्रग्सचे पॉकेट सापडले.ते बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
आपली 17 वर्षाच्या आडनिड्या वयातली मुलगी नशा करते ही गोष्ट एखाद्या आईला कळाली तर तिच्या मनाची काय अवस्था होईल हे शब्दात सांगणे कठीण.
मोनिका ने पारोशी बोलायचे ठरवले.या गोष्टींबद्दल तिने घरात कुणालाही कल्पना दिली नाही.रात्री तिने पारोला जाब विचारला.घाबरलेल्या पारोने आईची माफी मागितली आणि पुन्हा अशी गोष्ट करणार नाही असं वचन दिलं.शेवटी आईचं काळीज ते!लेकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेलेली पारो
रात्र झाली तरी घरी पोहोचली नाही.सगळीकडे शोधाशोध सुरू होती.पण कुठेच पत्ता लागत नव्हता.पारोच्या एका मैत्रिणीने तिच्या आणि अरबाज च्या नात्याबद्दल सांगून टाकले.सोबतच पारो ड्रग्स घ्यायची ही पण माहिती दिली.घरच्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता.पण सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा मोनिकाने पारोच्या रूममध्ये ड्रॅग्स बघितल्याचे सांगितले.
आता पुढे काय होईल?पारो कुठे असेल?
बघूया पुढच्या भागात...
.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा