Login

पारो भाग-३ ( जलद ब्लॉक लेखन)

पारो


मागच्या भागात आपण बघितलं की पारो घरातून गायब आहे.सर्वजण तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता पुढे..

पारोच्या वडिलांनी आणि काकांनी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची असं ठरवलं.
आणि ते पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची कंप्लेंट नोंदवून आले.अरबाज बद्दल सांगायचं त्यांनी मुद्दामच टाळलं.
इकडे त्या दिवशी आपल्या आईचं बोलणं ऐकून
पारो घाबरली होती.तिला आता कुठल्याच बंधनात राहवसं वाटत नव्हतं.म्हणूनच तिने त्या दिवशी स्वतःच्या घरातील दागिने आणि पैशाची चोरी करून बॅगमध्ये भरले. दुसऱ्या दिवशी कॉलेजला न जाता ती थेट अरबाजला भेटायला गेलीआणि ती घर सोडून आली असल्याचं सांगितलं.सुरुवातीला अरबाज ने तिला समजावून घरी जायला सांगितलं.परंतु, ती घरातून पैसे आणि दागिने घेऊन आली आहे हे बघितल्यावर मात्र त्याने आपण इथून पळून जाऊन लग्न करू असं तिला वचन दिलं. तो तिला घेऊन गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला.अहमदाबाद मध्ये पोहोचल्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली.आठवडाभर पारो सोबत राहिल्यानंतर एक दिवस ती झोपलेली बघून तो सगळं सामान, पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला.जाग आल्यानंतर पारोने अरबाजला शोधण्याचा प्रयत्न केला.पण तो तर निघून गेला होता.पारोकडे तर अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हते.पारो नवीन शहरांमध्ये रस्त्या रस्त्याने आरबाजला शोधत होती.शेवटी अंधार पडला.आता रात्रीच कुठे जायचं.परत एखाद्या हॉटेलमध्ये जायला ना पैसे होते ना कुठलं ओळखपत्र.ती तशीच बस स्टॉप वर एका बाकड्यावर झोपून राहिली.रात्रीच्या सुमारास तिथे तीन चार जण आले.सगळे दारूच्या नशेत धूत होते.एकट्या पारोला तिथे झोपलेले बघितलं आणि त्यांच्या मनात वासना जागृत झाली.त्यांनी पारोला उचलून गाडीत टाकली आणि
लांब नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.त्यानंतर त्यांनी तिला एका शेतातल्या घरात कोंडून ठेवले.सलग पंधरा ते वीस दिवस ते तिच्यावर बलात्कार करत राहिले.मन भरल्यानंतर एक दिवस रात्री त्यांनी तिला गाडीत टाकलं आणि हायवे ला नेऊन फेकून दिलं.रात्रभर ती रस्त्याच्या कडेला निश्चित पडून होती.डोक्याला अंगाला बराच मार लागला होता.पण एका मागून एक झालेल्या अतिप्रसंगा नंतर पारोचं मानसिक संतुलन बिघडलं होतं.त्या दिवसानंतर ती रस्त्यावर फिरू लागली.मिळल ते खाऊ लागली.तिला काळ-वेळ प्रकारचं भान नव्हतं.एक दिवस रात्रीची गस्त घालत असलेल्या पोलिसांना ती रस्त्यावर जखमी सापडली.तिच्या जुन्या जखमांमध्ये अक्षरशः किडे पडले होते.कुठल्यातरी वाहनाने धडक दिल्याने डोक्यातून रक्त वाहत होतं.तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.पारोवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पारो गरोदर असल्याचे सांगितलं.पोलिसांनी पारोच्या घरच्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
पारोची घरच्यांशी भेट होईल का बघूया पुढच्या भागात....

🎭 Series Post

View all