प्रियाने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. रोहन ही खूप खुश होता. पण प्रिया अनाथ होती.प्रिया ला फार वाटायचे की आपल्या बाळाचेही कौतुक व्हावे.त्याला आजी-आजोबा सर्वांचे प्रेम मिळावे. पण रोहन मात्र त्याच्या आई बाबाशी बोलायला तयार नव्हता.
एकदिवस रोहन बाळा सोबत गप्पा मारत असताना प्रिया रोहन चा मूड बघून हळूच म्हणाली,
अहो ऐका ना, आता तरी फोन करा घरी, सासूबाई खुश होतील.
अग नाही ग, तुला आठवते ना बाबा काय बोलले मला, मी मेलोय त्यांचा साठी. अन आज इतक्या आनंदाचा क्षणी त्यांनी पुन्हा काही अपमान केला तर नकोच.तेही नाहीच आले की. तू आराम कर मी आलोच.
अन बाळाला प्रिया जवळ ठेवून रोहन रूम बाहेर आला व डोळ्यातील अश्रूना वाट मोकळी केली. कारण त्यालाही त्याचा घरचांची खूप आठवण यायची, अगदी रोजच.
दोन वर्षापूर्वी रोहन ने प्रिया सोबत लग्न केले. घरचे ह्या लग्नाचा विरोधात होते. कारण प्रिया अनाथ असल्यामुळे घरचे तिचा स्वीकार करायला तयार नव्हते. रोहन ने हर प्रकारे समजावले सर्वाना, पण सर्व निष्फळ. रोहन अन प्रिया ची एका मैत्रिणीमुळे ओळख झाली. मग कधी योगायोग तर कधी ठरवून भेटी वाढत गेल्या. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. प्रिया अनाथ असली तरी तिचा हुशारीने तिने स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण केले होते.एका नामवंत कंपनीत कार्यरत होती. दिसायला सुंदर अन स्वभावानेही खूप मनमिळाऊ, समंजस. दुसऱ्याचा मदतीला नेहमी तत्पर. रोहन ही कर्तबगार न हुशार . मग त्यांनी लग्न केले. रोहन ला वाटले होते की लग्न केल्यावर तरी घरचे प्रियाला स्वीकारतील. पण उलटच घडले. आई न बाबा दोघांनीही तिचा स्वीकार करण्यासाठी नकार दिला.तुझ्यासाठी माझ्या घराचे दार कायमच बंद, असेही बाबा बोलले.
याचा रोहनलाही राग आला अन त्याने तडक प्रियाला घेऊन घर सोडले. खरंच अशा वेळी हळूहळू मनाची कवाड बंद व्हायला लागतात. एक नवे नाते सुरु होत असतांना, फुलत असतांना अशा बंद दाराची सल उरी बाळगत वाटचाल करावी लागते.
पण त्यानंतर कोणीच कोणासमोर ही आले नाही. प्रियाला तर खूप अपराधी वाटायचे की माझ्यामुळं सासर तुटले. तिला तिचा नवऱ्याचे दुःख बघवत नव्हते. पण कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते.
कधी कधी नात्यापेक्षा इगो खूप मोठा होऊन बसतो.प्रियाला समजत नव्हते की रोहन ला कसे समजावावे. पण तिने मनाशी पक्का निर्धार केला होता की आई वडील अन रोहन यांच्यातील संवादाचा कमजोर झालेला सेतू पुन्हा बळकट करायचा. तिला तिचा बाळाला आजी आजोबा चे प्रेम द्यायचे होतेच.
एकदिवस रोहनला सुट्टी असताना तिने पुन्हा अगदी शांततेत त्याच्या आई चा विषय काढला.
रोहन, आपण एकदा जाऊया तुझा घरी. मला मान्य आहे तुही चिडला आहेस. पण त्यांचा ही हक्क आहेच की त्यांचा नातवाला पाहायचा. कदाचित आता त्यांचा राग ही गेला असेल. तुही कधी लहानपणी चुकला असशील तेव्हा त्यांनीही तुला माफ केलेच असणार ना... आज तुही एक मुलाचा पप्पा आहेस, आई -बाबा होणे म्हणजे सोपे असते का ?? आज तू माफ करुन बघ त्याना.अन तुझा इगो जरावेळ बाजूला ठेव.आज इतक्या महत्वाचा नात्यात तू तुझा इगो कुरवाळत बसलाय. आता तूच ठरव की तुला नाते महत्वाचे की तुझा इगो?? ती खूपच आगतिकतेने बोलत होती.
रोहनचा तर डोळ्यातून अश्रू वाहत होतेच. त्याचाही एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय संपत नव्हता, हे तोही जाणून होताच की. त्याने प्रियाचा हात हातात घेत म्हणाला, खरंच तू योग्य बोलतीयेस. मला हे नाते खूप महत्वाचे आहेग. अन कोणत्याही नात्यात माफी मागितली तर कमीपणा येतच नाही उलट ते आणखीन घट्ट होते. ठीके ते नाही आले तर काय झाले, आपण जाऊ.
थोडया वेळाने त्यांचा 3महिन्याचा बाळाला घेऊन प्रिया अन रोहन आई बाबांचा घरी आले.आईनेच दार उघडले. सर्वाना पाहून तिला खूपच आनंद झाला. रोहन च बोलण्यासाठी सुरुवात केली. आई तुही नाही आलीस कधी, मलातर तुझी रोज च आठवण येते.
सर्वाना पाहून आईचा डोळ्यातून तर आनंदाने अश्रू वाहत होते खूप खुश झाली होती. आई इतकेच बोलली, येरे राजा आत ये.मला माहित होते तूम्ही नक्की याल एक दिवस. देवाने ऐकली माझी प्रार्थना. आईने तर क्षणात बाळाला उचलून घेतले.
अहो, आपला रोहन आलाये. आईने खुशीतच बाबाना आवाज दिला. बाबा ही लगेच आले हॉल मध्ये रोहन अन प्रिया ने दोघांना ही नमस्कार केला.आई बाबा दोघेही जणू रोहन ची प्रतीक्षाच करत होते.
बाबाचा चेहऱ्यावर अपराधी भाव होता ते बोलू लागले, माझेही चुकलेच. आम्हाला तुमचा आनंद महत्वाचा. आई बाबांना तर फक्त त्यांच्या मुलांचे सुख, समाधान पाहिजे असते, पण त्यावेळी आम्हाला समाजातील प्रतिष्ठा महत्वाची वाटली.आम्ही दोघांनीही बऱ्याचदा विचार केला की तुम्हाला भेटावं अन घरी घेऊन यावे पण वाटले तुही खूप रागात गेला होतास. काय करावे हेच समजत नव्हते. कोणत्या तोंडाने तुमची माफी मागणार?? पण आम्हाला विश्वास होता राग शांत झाल्यावर तुम्ही नक्की याल एकना एक दिवस. तुझ्याशिवाय आमचे तरी कोण आहे? आता सर्व सामान घेऊन आपल्या घरी यायचे बरे.
प्रिया आजपासून तुही आम्हाला आई बाबा च बोलायचे बरे. आई म्हणाली.
यावर प्रिया ही गोड हसून म्हणाली, हो नक्की आई.
आज सर्वांचाच चेहऱ्यावर समाधान होते. स्मित हास्य होते.
नाते कोणतेही असो, भाऊ -बहिणीचे, मैत्रीचे असो नवरा बायकोचे असो असा गुंता निर्माण होतोच बऱ्याचदा. बऱ्याचदा हा गुंता मोकळेपणाने बोलले तर सहज सुटू शकतो. पण त्याआड येतो तो आपला अहंकार वृथा अहंकार. मग ही दरी वाढतच जाते. पण मनाची कवाडे फार काळ अशी बंद नाही ठेवता येत.त्याचा प्रत्येकालाच त्रास होतो.पण फक्त माघार कोण घेणार इथेच अडते सर्व.
फोन हँग झाला की आपण जसा तो रिस्टार्ट करून पाहतो तसेच प्रत्येक नात्यात केले तर. नाते हँग झाले की तेही रिस्टार्ट केले पाहिजे माणसाने. कोणतेही नाते टिकणे हेही आपण कितीवेळा सॉरी अन थँक्यू म्हणतो यावर बऱ्याचदा अवलंबून असते. जगात कोणताही प्रवास विनाकारण सुरु होत नसतो अन संपतही नसतो. म्हणून आपण ही आपले असे एखादे हँग झालेले नाते रिस्टार्ट करून बघूया. त्यासाठी पासवर्ड आहे "I am sorry " अन आयुष्याचा प्रवास सोबतीने करूया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा