पाठीराखा भाग 2
मागील भागात आपण पाहिले शांताराम आपल्या लहान बहिणीचे लग्न लावून देतो. स्वातीचा नवरा संतोष प्रचंड संशयी आहे. अशातच स्वातीला दिवस जातात. आता पाहूया पुढे.
संतोष कामावरून दमून घरी आला.
" स्वाती चहा आण लवकर."
स्वाती चहा घेऊन आली.
स्वाती चहा घेऊन आली.
तिने आपण आई होणार असल्याचे सांगितले.
" इतक्या लवकर कशी काय आई होणार तू?"
त्याने निर्लज्जपणे विचारले.
त्याने निर्लज्जपणे विचारले.
" अहो,इतकी आनंदाची बातमी आणि तुम्ही असे काय करता?" स्वाती कसेबसे म्हणाली.
" कुणाचं पाप आहे हे? त्या सचिनचे तर नाही?"
संतोष जोरात ओरडला.
संतोष जोरात ओरडला.
त्याने स्वातीला प्रचंड बडबड केली. त्यानंतर संतोष स्वातीला कमी पैसे देऊ लागला. तिची खाण्या पिण्याची आबाळ होऊ लागली. स्वातीला शिवीगाळ मारहाण रोजचेच झाले. असेच एक दिवस जोराचे भांडण झाले आणि त्याने स्वातीला ढकलून दिले.
स्वाती नेमकी पोटावर पडली. शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात दाखल केले. शांताराम आणि सुभाद्राला समजताच दोघे धावत निघाले.
शांताराम समोर निपचित पडलेल्या स्वातीला बघून हंबरडा फोडून रडला.
" स्वाते माफ कर बाय. तुझ दुख न्हाय दिसल ह्या करंट्या भावाला. डॉक्टर माझ्या स्वातीला वाचवा."
शांताराम हात जोडून म्हणाला.
" स्वाते माफ कर बाय. तुझ दुख न्हाय दिसल ह्या करंट्या भावाला. डॉक्टर माझ्या स्वातीला वाचवा."
शांताराम हात जोडून म्हणाला.
" स्वाती वाचेल पण तिचे बाळ नाही वाचले. तिच्या अंगावर मारल्याच्या खुणा आहेत."
डॉक्टर एकेक शब्द बोलताना शांताराम रागाने पेटला होता.
संतोष दवाखान्यात फिरकला नाही. सुभद्रा आणि शांताराम स्वातीला घरी घेऊन आले. शून्यात नजर लावलेली स्वाती बघून सगळे हळहळ करत. भाचे मंडळी आत्या,आत्या करायची पण स्वाती सुन्न बसून राहायची. हळूहळू स्वाती सावरू लागली. एक दिवस तिच्या सासरचे आले.
" आमचा मुलगा चुकला. संसारात भांडणे होत राहतात. तुम्ही तिला आयुष्यभर पोसणार का?"
त्यांनी सरळ प्रश्न विचारला.
शांताराम सगळे ऐकत असताना सुभद्रा पुढे आली.
" त्यांच्या आधी म्या सांगते एकेक घास कमी खाऊ पण पोरीला न्हाय पाठवणार परत."
स्वातीने हे ऐकले आणि गळ्यात पडून रडू लागली.
स्वातीने हे ऐकले आणि गळ्यात पडून रडू लागली.
" बहीण अशी माघारी आली तर लोकं नावे ठेवतील." एक शिकलेला सुशिक्षित म्हणाला.
" पावन मेलेल्या बहिणी परीस सोडलेली बहीण चाललं मला. निघा आता तुम्ही. म्या हाय तिचा पाठीराखा भक्कम."
शांताराम ठामपणे म्हणाला.
शहरात असलेल्या दोन भाऊ आणि बहिणीने सरळ हात वर केले. स्वाती ही आता शांताराम आणि सुभद्रा यांची जबाबदारी होती. स्वातीने हळूहळू आपले नशीब समजून पुन्हा जगायला सुरुवात केली.
शांताराम एक दिवस भाजी घेऊन बाजाराला गेला होता. तिथे त्याला स्वातीची मैत्रीण सुषमा भेटली. सुषमा डी.एड करत होती.
" दादा,स्वाती कशी आहे? तिला किती छान मार्क होते. पुढे शिकली असती तर चांगली नोकरी लागली असती."
सुषमा स्वातीची चौकशी करत म्हणाली.
सुषमा स्वातीची चौकशी करत म्हणाली.
शांताराम घरी आला. कोर्टात घटस्फोटाची केस चालू होतीच.
त्याने स्वातीला विचारले," स्वाती तुला फुड शिकायचं व्हत ना?"
" दादा त्याला पैसे लागतील. कॉलेज सरकारी मिळाले तरी राहणे,खाणे पिणे याचा खर्च कसा करणार? त्यापेक्षा गावात शिवण वगैरे काहीतरी शिकते."
स्वातीने उत्तर दिले.
" वन्स तुम्ही नाव घाला. पैक आमी करू उभ." सुभद्रा पुन्हा त्यांच्या पाठी उभी राहिली.
नवरा सोडलेली पोरगी अशी बाहेर शिकायला जाणार म्हणून सगळे नावे ठेवू लागले. शांताराम मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.
स्वाती आला दिवस पुढे ढकलत होती. एक दिवस शांतारामने स्वातीला बोलावले.
"स्वाती,हा फारम बग. आजच भरून ठीव."
त्याने फॉर्म स्वातीच्या हातात दिला.
त्याने फॉर्म स्वातीच्या हातात दिला.
" दादा, डी. एड चा फॉर्म आहे हा,पण पैसे?"
स्वातीने विचारले.
स्वातीने विचारले.
" वन्स, दाग दागिन घालून मिरवायच त्या परीस तुमचं शिक्षण व्हवू द्या."
सुभद्रा म्हणाली.
शेवटी स्वातीने फॉर्म भरला. शांताराम आणि स्वाती प्रवेश घ्यायला गेले. दूर कोकणात स्वातीचा नंबर लागला. शांताराम तिला कॉलेजला घेऊन गेला.
" स्वाती नीट रहा. अभ्यास कर."
त्याने डोळे पुसत निरोप घेतला.
त्याने डोळे पुसत निरोप घेतला.
महाविद्यालयात स्वातीने कात टाकली. सगळे उपक्रम,स्पर्धा यात स्वाती भाग घेत होती. स्पर्धा गाजवत होती. दोन्ही वर्षी तिने पहिला नंबर सोडला नाही दुसऱ्या वर्षीचा निकाल लागून तीन चार महिने होत आले होते. एक दिवस पोस्टमन स्वातीच्या नावाचे पत्र घेऊन आला.
" वन्स, आव बाहेर या. तुमच्या नावाच पत्र आलं हाय." सुभद्राने आवाज दिला.
नोकरीचे पत्र पाहून स्वातीचा आनंद गगनात मावेना. परंतु नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात होती. लोक म्हणायला लागली आता बहिणीचा पगार खाणार. शांताराम मात्र आनंदी होता. त्याने स्वातीला नोकरीची परवानगी दिली .
स्वाती नोकरीवर हजर झाली. अनेकजण सांगत की स्वाती तिच्या एका मित्रासोबत असते. पण शांताराम कोणालाही उत्तर देत नव्हता. असेच वर्ष उलटून गेले. स्वाती घरी आली नव्हती. पत्र आणि फोन यातूनच खुशाली कळत होती. रक्षाबंधन दोन दिवसांवर आले होते. आता तरी स्वाती येईल असे सुभद्रा आणि शांताराम दोघांना वाटत होते.
स्वाती येईल का?
आपल्या भावाची आठवण ती ठेवेल का?
पाहूया अंतिम भागात.
©® प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा