Login

आणि ताबा सुटला

स्त्री च मातृत्व जागले की की ती चंडी होते
तिचे हुंदके त्याचा मार.
सगळं कसं निर्विकार...
तो बोलायचा ..ही फक्त एकायची..
तो उपभोगायाचा..ती फक्त मुस्मुसायची...
त्याची नजर त्याचा अत्याचार
तिची अवहेलना ती किती सहणार
एक दिवस नजर त्याची तिच्या पोरीवर गेली
इतके दिवस ती अबला होती पण आज तीच्या मधली आई जागली...
तिने त्याचा प्रत्येक घाव सहला पण आता तो तिच्या मुलीकडे वळला..
आणि,तिच्या मनाचा ताबा सुटला....
ती बेभान झाली..आणि दुर्गा बनून त्याचा काळ बनली...

0