Login

पातळ भाजी भाग 2

Patl
पातळ भाजी
भाग 2

प्राचीचा हात भाजला ,तिने नकळतच तापलेली कढई स्वतःच्या हाताने उचलून बाजूला केली...पुन्हा स्वतःची दया आली...लगेच डोळा भर पाणी...

मदतीला कोणी नसते ,पण काम जे कधी केले नव्हते ते सोपवून गेल्या होत्या आई...त्यांना माहीत होते तिची धांदल उडणार.. तरी.....

"आत्ता हा असता तर सांगितले असते त्याला मदत कर म्हणून..." स्वतःशी बोलली

तितक्यात तो बाहेरून आला होता...त्याने स्वयंपाक घरात सहज डोकावले...तर त्याला झालेला प्रकार लक्षात आला... ती हातात हात पकडून त्या पोळलेल्या जागेवर फुंकर मारत बसली होती ,तर एका मध्येच ती तिळाला पसरवत होती...तीळ जळाले होते...करपल्याचा वास येत होता...

त्याने लगेच एछास्ट चालू केला ,फॅन लावला खिडक्या उघडल्या ,आणि तिला धरून जरा बाजूच्या खर्चीवर बसवले ,तिला पाणी दिले ,इकडे मलम शोधला...आणि तिच्या हातात ठेऊन दिला..

तिने लगेच डोळे वर करून त्याच्या कडे केविलवाणी नजर टाकली ,थोडा राग ही होता..तो समजून गेला आणि चूक कळताच त्यानेच मलम काढून हळुवार हळुवार पणे तिच्या हाताला लावला...पुन्हा तो ही फुंकर मारत बसला..


ते तीळ ती परात त्याने बाजूला उजेडात घेऊन पाहिली... आणि काही तीळ तोंडात टाकले...खाऊन पाहिले तर ते करपट लागत होते..

तो तिला म्हणाला..."तीळ पूर्ण जळाले आहे ,करपट लागत आहेत...तर त्याचे लाडू नको करायला..."

"पण मी काय सांगू आईला ,आता त्या पुन्हा घर भर बाऊ करतील ना हो.." रडू येत म्हणाली

"आधी तुझा हात महत्वाचा आहे ,लाडू आणि तीळ बाजारात मिळतात...त्यात हे डोळ्यातील पाणी आवर ग...काळजाचे पाणी पाणी होते माझ्या....दगडासारखा माणूस कमजोर पडतो emotionally..." तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला

तोच तिला त्याचा त्रास झाला आणि ओरडली ,"आssss ,हात हात माझा..." तिच्या वेदना डोक्यात गेल्या

"तो लगेच पुन्हा सॉरी सॉरी म्हणून तिला पुन्हा फुंकर मारत होता....हे सगळे माझ्याशी लग्न केल्या मुळे होतंय तुला ..." तो सहज बोलून गेला


तो असे वेड्या सारखे काही तरी बोलून गेला आणि तिला हसू आले...तिला समजले माझा नवरा किती भोळा आहे...किती साधा सरळ आहे... प्रेमळ..काळजी करणारा आहे... माझे दुःख त्याला बघवले गेले नाही...ह्यातच सगळे मिळाले... मग वाटतं लागू दे असे किती ही चटके...त्यावर जर प्रेमाची ,प्रेमाने फुंकर घालणारा असे जिवलग माझा तर लागू दे चटके...


असे मनातल्या मनात गोरिमोरी होऊन ती मनोमन हसली...आणि तिच्या डोळ्यात एक प्रेमाची चमक त्याला दिसून आली...त्याने आता कुठे मोठा श्वास घेतला , तिचे रडू घालवले म्हणजे मी तिला हसवू शकलो हे ही खूप सुख देणारे आहे तिच्या साठी..

"चल मग आपणच बाहेर जाऊ ,बाजारात ...तुझे मन लागेल जरा...वेदना कमी होतील...आणि चेहरा जो सुकला आहे तो फ्रेश होईल...त्यात पार्लर ही करून येऊ...म्हणजे तशी माझ्या सुंदर बायकोला गरज नाही अशी आई म्हणून गेलीच आहे जातांना ,पण ठीक आहे जाऊन येऊ तिथे ही एकदम लगेच...."

"ते जळलेले तीळ...?" ती

"त्याचे खास आपल्यासाठी लाडू करू ,खास आपल्यासाठी तू आणि मी दोघे मिळून खाऊ " तो हसत म्हणाला

"तुम्ही असाल तर काही अवघड नाही असे समजू मग..?? "

"म्हणजे सासरी निभावणे..."

"नक्कीच असेल मी,पण कधी कधी बाजू बदलावी लागते मला ही...as a मुलगा म्हणून..पण ती माझी बाजू तू सांभाळून घेशील ,हो ना..." तो