Login

पातळ भाजी भाग 3

Patl
भाग 3
पातळ भाजी

"उठा चला मॅडम आता वेदना जरी होत असल्या तरी तुम्हाला मात्र प्रेमाने प्रेमाचा हात पुढे केला आहे...फुंकर घालून मनाला होणाऱ्या वेदना कमी केल्या आहे...आता रडणे नाही..."

ती मनाला समजावत होती.

इकडे अजून ही वेदना होत होती ,मोठा चट्टा पडला होता..ठसठस थांबत नव्हती ,कसानुसा चेहरा झाला होता..आई ग करत ती कशी तरी उठली...त्याने हात दिला..तशी ती उगाच दाखवत होती आणि म्हणाली ,"आता जर बर वाटतंय होईल नीट..."

"इतक्या लवकर नाही होणार, मला माहित आहे..कढईचाचटका आहे तो माझ्या आईसारखाच !!! "

ती पुन्हा हसली तसा तो हात भिंतीला लागला..पुन्हा त्रास झाला.

तो लगेच तिच्या भाजलेल्या हाताच्या बाजूनं झाला ,त्याने काळजी घेतली दाखवली की जी बाजू कुठे ही लागू शकते आणि तिला त्रास होऊ शकतो त्या वेदनेच्या बाजूने आपण आडवे उभे राहू म्हणजे त्रास होणार नाही.

"मला जमेल अहो,मी करू शकते...किती सांभाळून घ्याल मला आणि माझी बाजू.!! "


"आता हात हातात घेतला आहे मॅडम मी तुमचा म्हणजे मला तुमची ही बाजू सांभाळायची आहेच..." तो तिच्या डोळ्यात पाहून हळूच बोलून गेला


तिला समजले त्याला काय म्हणायचे आहे ते... ती लगेच मोठा श्वास सोडत म्हणाली

"काय असेल ते असेल ,पण मी ही माझी बाजू सांभाळून घेईल ,सगळी तसदी त्रास तुम्हाला तरी कश्याला...तुम्हाला इतर बाजू ही आहेत ज्या सांभाळायच्या आहेत..." ती हळूच म्हणाली


त्याला ते हळूच बोलणे ऐकू आले... त्याने हलके मान हलवली..त्याला ते ही पटले...पण थोडा नकार ही जाणवला त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याने अजून तिची बाजू सावरून घेतली..तिला पकडून धरत बाहेर आणले.. तिची ओढणी घेऊन तिच्या खांद्यावर टाकली. तिला मान डोलवून म्हणाला, "मी गाडी काढतो तू सांभाळून ये बाहेर, भीतीला खेटून येऊ नकोस...ती बाजू सांभाळ...खरचटू देता कामा नये..." दम होता पण तिच्या काळजी पोटी होता

"हम्मम, " ती त्याला बघत म्हणाली

त्याने गाडी बाहेर काढली तसा तो गाडीतून उतरला आणि तिला बोलावून घेतले

"चला मॅडम ,की मी येऊ ?"

"येऊ शकते मी तिथपर्यंत सहज स्वतःच्या काळजी ने.."

तिचे हे शब्द ऐकून त्याला जरा वाईट वाटले, इतका ही तुटतकपणा का असावा...काळजी घेतली तरी वाईट...काळजी नाही घेतली तरी वाईट...काय कसे वागावे कळत नाही.

"तू किती खोचक बोलतेस ग ,जसा मी वाईट नवरा आहे .."

"सगळे अनुभव येत आहेत...जमेल तशी गोड बोलेल पण इतक्या लवकर शक्य नाही मनात खूप गोंधळ झाला आहे ,तो सेटल होऊ द्या. "

"गोंधळ ,कसला??" तो

"तुम्ही तुमच्या घरी आहेत ,ही तुमची माणसे आहेत ,तुम्हाला म्हणून सगळे सहज आहे..माझ्यासाठी तसे नाही मग गोंधळ तर होणारच ना..."

"ते सगळ्याच मुलींच्या बाबतीत असते यार तू काही नवीन नाहीस...सगळ्याच मुली करतात इतके ऍडजस्ट...तरी मी आहे ना सोबत तुझ्या.. "तो न राहून म्हणाला

तिला अजून ही कोडे होतेच आजचा दिवस सुखी गेला ठीक आहे ,पण उद्याचा दिवस काय घेऊन येईल...आज अंतर कमी झाले मनातले पण रोज काही ना काही कारणाने सुरुवात चांगली नाही झाली तर साहजिक आहे माझा राग ह्या माझ्या म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीवर निघणार...त्यातून वाद होणार आणि अंतर वाढणार...त्याच्या कडून ही आणि माझ्या कडून ही...मने सहज नसतात जुळायला...ही प्रेमाची फुंकर नित्याने हवी असते...ही काळजी घेणे रोज तर शक्य नाही..त्यात ही त्याला त्याच्या माणसां समोर मर्यादा पाळाव्या लागतील...मग वाटले जरी की तिला आधार द्यावा तरी देतात येत नाही

"आज इथे आई बाबा ताई तुमचे भाऊ घरात कोणीच नाही म्हणून आलात लगेच धावून फुंकर मारायला.. " ती

"हो मग त्याचं काय ह्यात मी हे करायला नको होते का ?? " तो तिच्या प्रश्नाला सहज हसत म्हणाला

"तसे नाही ते घरी असते तर असे केले नसते तुम्ही ,मग तर हॉल मध्ये बसून गम्मत बघितली असती ,लांबून इन्स्ट्रुकॅशन देत बसला असतात...तुमची आई काय म्हणेन धावून गेलो तर हे विचार करून..."


त्याला आता जास्तच हसू येत होते ,त्याने ते लपविण्यासाठी तोंडावर हात ठेवला ,तशी ती म्हणाली "घ्या हसून ,मी गम्मत करते का इथे..सगळी चेष्टा सुचते ना तुम्हाला.."

"नाही ग ,मी कोणालाही घाबरत नाही जे मी आज केले ते आई बाबा इतर कोणी ही समोर असतांना केलेच असते...त्यांना माहीत आहे त्यांना हिरा कसा आहे ते...पण सुरुवातीला हे ट्रक बदलताना प्रत्येक मुलाला लगेच बायकोच्या ट्रॅक वर जाता येत नसते समजून घे...हे तुला ही लागू आहे..."

"वाटलंच मला तुम्ही मला गप्प करणार, जास्त बोलू नका " ती गोड रागात

"म्हणजे जास्त बोलू नका ही धमकी समजू का मी तुझी मला दिलेली पहिली धमकी...! " तो हसत

"नाही म्हणजे पुढे बघून गाडी चालवा हे सांगते मी त्यात धमकी का समजायची..."

"चल तुझी पहिली धमकी सेलिब्रेट करूया सॉफ्टी खाऊन...थोडी तुझ्या गरम रागिष्ठ नाकाला लावतो म्हणजे राग कमी होईल.." तो

ते गाडी उभी करणार इतक्यात समोर सासूबाई आणि ताई दिसतात ,त्याही हॉटेलमध्ये बसलेल्या असतात..त्यांना दिसेल हे दोघे ...आता जर समजले की ही काम सोडून नवऱ्या सोबत फिरत आहे तर काय होईल...आता नवरा साथ देईल की मांजर होईल आई समोर बघू...

स्टोरी कशी वाटली सांगत चला म्हणजे लेखकाला अजून हुरूप येईल आणि तो पुढील भाग लवकर सादर करेल.. तुमच्या like कंमेंट्स म्हणजे आमचे आनंदाचे इंधन नाहीतर लेखनाची गाडी पुढे चालणे शक्य नाही