Login

पातळ भाजी भाग 4

Patl
पातळ भाजी
भाग 4

"मला बाहेर जायला सहसाह आवडत नाही ,ते ही भर दुपारी ,इतक्या कडक उन्हात.."तो

"ते का बरं..?"

"नाही मी विचार करत होता ,माझी बायको गोरी आहे..."

"हम्मम्म मग त्यात काय..." ती

"माझी बायको काळी नको पडायला म्हणून.." तो

"माझा रंग पक्का आहे ,चढला तर उतरणार नाही ,अगदी प्रेम रंग ही.." ती

"काय !!! काय !! काय !! हे काय होत..प्रेम
रंग..! " तो दबक्या आवाजात म्हणाला

"म्हणजे मी स्वतःवर जे प्रेम करते त्याचा रंग.." ती लाजत

"भाजलेले बरंय वाटतं, म्हणजे इतके भारी भारी वजनदार वाक्य बोलत आहेस म्हणून " तो

तिक्यात ती," आई गsssss , आई गsss!! त्रास होतोय खूप...जिव्हारी लागले खूप.."

"काय काय होतंय..?" तो पटकन काळजीपूर्वक फुंकर घालत

"म्हणजे तुम्हाला जिव्हारी लागले म्हणते हो.."

"म्हणजे नाटक हाssss..!!"

"मी खूप सहन करू शकते ,अगदी खूप..तसे सांगितले मी माझ्या मनाला...सासर आणि सहन करणे दोन्ही गोष्टी सहज जमल्या तरच निभाव लागतो नवरा बायकोच्या नात्याचा...त्यात ही जखम क्षुल्लक आहे..." ती एकदम भावनिक होत म्हणाली

त्याने तिचा हात पकडला, तिच्या डोळ्यात पाहिले...आणि थोडा तो ही भावनिक झाला...परत मूड बदलत म्हणाला..."हम है ना.."

मग इकडे दोघे ही त्या ठिकाणी थांबले होते जिथे सासूबाई आणि ननंद हॉटेल मध्ये बसून होत्या..

ती तिच्या हाताला फुंकर मारत होती ,आणि तो तसाच थांबला... कधी हिच्याकडे बघत तर कधी त्यांच्या कडे बघत..

त्यानेच त्या दोघींना पाहिले होते..तिचे लक्ष ही नव्हते ती तर गाडीत बसून होती..मग त्याने ही उघडलेले दार लावून घेत गाडीत बसला.

"थांब थांब उतरू नकोस...ह्या हॉटेल मध्ये खूप खूप वेटिंग आहे पब्लिक..."तो

"काय झालं का पुन्हा येऊन बसलात.. आईस्क्रीम रद्द समजू का ?? " ती

"ए नाही हा आज आईस्क्रीम रद्द होणारच नाही ,पहिली धमकी साजरी करायची आहे मला नवरा ह्या प्रवासातली.."

"किती बोर करावं माणसाने, धमकी अजून काय हे तुम्हाला नंतर कळेल..तसं ही मला धमकी देऊन काम नाही करून घ्यायचे ,मन जिंकायचे आहे..."

त्याने तिला हसून पाहिले आणि तिचा हातात हात घेऊन म्हणाला ,"असेच मी ही जिंकणार तुला आणि तुझ्या मनाला..."

"बघू होईल का तुमच्याकडून..!"

"मी करून दाखवत असतो.."

"आई ,आई आली पहा.." ती त्या हॉटेल कडे बघून जोरात म्हणाली

तोच तो आईचे नाव घेताच डचकला आणि घाबरला..त्याने खरंच पुन्हा हॉटेल च्या दिशेने पाहिले.

त्याला खरेच वाटले...त्याला वाटले आई मला तर दिसली होतीच..हिने ही पाहिली.. म्हणजे आता घोळ नक्कीच होणार..

ती त्याचा पिवळा पडलेला चेहरा बघून हसली आणि हसतच राहिली...तीने जोरात टाळी दिली..पण त्याने हात पुढे केला नाही...तो तिच्याकडे रागात बघतच राहिला पडलेल्या चेहऱ्याने...नाक लाल झाले...


त्याचा असा राग बघून तिला काही एक फरक पडला नाही, उलट हसू येत होते ,की हा आईला इतका घाबरतो मग ह्याच्या कडून मला जिंकणे होईल...तिने ठेंगा दाखवला..

त्याने तिच्या अंगठ्याला दाबले...आणि तिच्या नाकाला टिचकी मारली..

परत तो हॉटेल कडे बघत होता ,त्याला आई आणि बहीण दिसल्या नाहीत..मग त्या इतक्यात गेल्या कुठे...हिने थोडा वेळ आधी पाहिले असते तर आत्ता हसणारी स्वतः पिवळी पडली असती..आणि मी हसलो असतो तिचा पडलेला घाबरलेला चेहरा पाहून...

पण त्याने पुन्हा तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मनात म्हणाला ,"अशीच हसत रहा, असेच माझे काळीज पाणी पाणी करत रहा...बाकी तुझ्या आनंदासाठी काही ही करेन..."


"काय हो धमकी साजरी करताय की अजून धमकी देऊ...की असा जोराचा आई नावाचा धक्का देऊ..हम्म" ती हसून म्हणाली

त्याने मोठा श्वास सोडला, "बाप रे तू फारच मोठा धक्का दिलास ..पण तुला एक धक्का द्यायचा आहे...आत्ता देऊ की घरी गेल्यावर देऊ.. " तो तिला म्हणाला



प्राची खूप साध्या घरातली संस्कारी मुलगी ,लहापनीपासून तिला काम म्हणजे फक्त घर आवरणे आणि मग थोडी मोठी होत गेली तशी चपात्या करत मग कुठे 12वीला तिला भाजी करायचे शिकवले , मग तिला घर आवरणे ,चपात्या करणे आणि एक भाजी ती ही कोरडी करणाच्या काम सोपवून दिले...

आई म्हणायची तू हेच करतेस अभ्यास सांभाळून हेच खूप आहे...पुन्हा आहेच येरे माझ्या मागल्या...तरी होता होईल तसे मोठे ही काम हाती घेता येत असेल तर घे...पण फक्त जमत नाही असे होऊ नये म्हणून ओळख करून घे...

तिला सहज वाटायचे घर आवरणे ,काही चपात्या करणे भाजी करून कॉलेजमध्ये जाणे...मग कधी ती भाजी पातळ करावी लागली तर तिच्या पद्धतीने करुन ठेवत..

आईला ही भारी बरे वाटत, हलके केले थोडे तरी ओझे म्हणून जी जशी केली असेल पातळ भाजी ती माय बाप गोड मानून घेत...

पण तरी तिचा हात आई इतका बसलाच नाही कधी... मग माघार घेतली..

"आई करेन ग सासरी, त्यांची पद्धत शिकवतील आई...."

"ओ... लगेच आई हम्मम.." आई

"नाही ग, स्वरा म्हणते तिच्या सासूला बळेच आई...म्हणून म्हंटले आपण ही आई म्हणू..."


"बघ बाई तुझे तू...पण सासू कितपत आई असते हे कळेल बरं..." आई म्हणाली


तशी आई सतत सांगत ,सासू वाईट नसते ग...कुठे तरी ह्यात दोन तारा जुळतांना वीण चुकते...मग नाव जुळत नाही...ती चुकते ही ही चुकते कोणाला कळत नाही....


"मी घेऊ शकते का ग जुळून...जमेल का हे तुझ्या लाघवी मुलीला सासुसोबत वीण जुळून घेणे...? ती खूप विचार करत म्हणाली..

बघू तो तिला खरे सांगतो का ,तिने दिला तसा धक्का देतो का पाहू