पातळ भाजी
भाग5
प्राची आणि अरविंद हॉटेलमध्ये आले होते..त्यांना दोघांना ही कळले होते की सासू आणि ननंद दोघी ही हॉटेलमध्ये बसलेल्या होत्या..
तिने ही पाहिले होते आणि त्याने ही..
तिने पाहिले आणि थोडी घाबरली पण ते चेहऱ्यावर दिसून येऊ नये म्हणून तिने जणू काही पाहिलेच नाही असे दाखवले आणि दुसरी कडे तोंड केले..
त्याने पाहिले आणि जरा उतरला नाही गाडीच्या बाहेर की त्या समोर ..मग लगेच गाडीत येऊन बसला
त्याने प्राची कडे पाहिले ,तो घाबरलेला त्याने ठरवले ही आधीच सासूच्या नावाने घाबरते ,ती आता कुठे झालेल्या वेदनेतून सावरली आहे ,त्यात अजून जरा हळूच कानात सांगितले तर हिची वेदना अजून उफाळून यायची आणि मग मला बसावे लागेल तिला हाश हुश करत..फुंकर घालत..जीव इतकासा त्याला किती तरी त्रास देऊ...परत म्हणेन आयुष्यभर नुसता सासुरवास दिला आईने तुमच्या..
"काय बघतोस माझ्या कडे हात वर करून असा..कसलं टेन्शन आलंय का ?? असं एकदम भूत दिसल्या सारखे का बघत आहेस तू..." प्राची ही टेन्शन मध्ये म्हणाली
"अग तू तू काय लावलंय तू...अहो म्हणायचं मला ,अहोsssss एकदम भारी कडक वाटतं मग..." तो गम्मत करत
"तुमची इच्छा आहो.. आहो आहो! " ती
"राहू दे ,राहू दे....आता लगेच नाही म्हणायचे रोज थोडं थोडं म्हणायचं आई समोर...बाकी बाहेर ,बाबू सोना म्हटलीस तरी चालेल..एकदम कसे मऊ मऊ वाटतं ,मोरपीस फिरवल्यासारखे.."
ती हसत होती किती तरी वेळ ,त्याला तिला हसताना बघू बर वाटत होतं
"तुला माहीत आहे रे आहो, माझी मैत्रीण होती खूप मूर्ख होती ती म्हणायची नवऱ्याला बाबा ,बाबू ,सोना ,चिऊ...काही वेडी होती ती"
"मग त्याला कसे वाटतं मग असे कुत्र्याचे नाव घेतल्यावर..." तो खिदीखिदी हसत टाळी देत
तिला आला राग ,मग तिने ही सुनावले, "आम्ही आमच्या मैत्रिणीला असे बोललेले सहन नाही करणार हा !! "
"कुत्राचे नाव आहेत हे सगळे ,चल तुला विकी च्या कुत्र्याच्या दुकानात घेऊन जातो ,मग कळेल हे कुत्र्याची नाव आहेत ते...आणि हो तुझ्या मैत्रिणीला ही सांग पत्ता .." तो
"ओके ओके ,आता नो जोक्स आहो..!! "
"हे काय आहो मानात म्हण, अरे कारे..आहोत मान दिसला पाहिजे..." तो
"मान दिसणार नाही ,आहोत मान दिसणार नाही आरे आहो, कळतंय का तुला.." ती
त्याने तोंड फुगवले
तो गप्प बसून रागात डोळे रागावून मोठे केले..
"का नाही दिसणार आहो तो मान जो कोण्या पुरुषाचा अहंकार वाढवतो तो मला दिला गेलाच पाहिजे तू ही त्या /आहो/ या शब्दात ,आता मला मान हवाय नाहीतर आईला बोलावून घेतोच...बघ म्हणतो घे हिला जरा रिंगणात...म्हणजे घे हिला सासुरवसात ,दे जरा सासुरवसाचा झटका मग बघतो कसा दिसत नाही मान..."
ती डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते , "कोणत्या शाळेत शिकलास रे आहो तू ?"
"पुन्हा आरे आहो, नुसतं आहों म्हण आधी दिसू दे ना मान देतेस मला ते..."
"नाही ,मग आता तर मुळीच नाही दिसू देणार मी मान आहों तुला..." ती
"म्हणजे काय ग ,एक भारी नवरा झाल्याचा राजेशाही फिल येतो त्यात...हे काय बालिका वधू बालिका वर एकमेकांना जसे आरे कारे करतात तसे करतेस तू मला .."
"मुख्य म्हणजे मान दिसत नसतो वेड्या...मान देतात आणि तो मी केव्हाच दिलाय...यु आर अल्वेस रेस्पेक्टड .." ती गळ्यात पडत म्हणाली
दोघांना जरा तरी निवांत वेळ मिळाला होता, तो जसा घरी आईचा पिल्लू वाटत होता तसा मुळीच नव्हता पण काही गोष्टी वेळ घेतल्यावर पूर्वपदावरून योग्य पदावर येतात...सगळ्यांच्या हिशोबाने घेत येत असतांना काही गोष्टी वेळ घेतात..
"तू तर किती कडक वागत होतास रे त्या दिवशी घरी, मला वाटलं माझे इथे कोणी नाही अगदी तू ही नाहीस रे आहों मग इथे राहून काय फायदा...पण रहावे लागेल म्हणत रडत होते.." ती
त्याने तिला कपाळावर किस करत तिला सांगितले ,"मी तुझा एकटीचा नाही ग ,आई बाबा दीदी ,रोहित असे धागे आहेत की ते प्रेम करतात मग ते तुटून जाण्या इतके सहज सोपे नाही, मी ती कल्पना ही करू शकत नाही..."
ती डोळे पुसत ,भरलेल्या मनाने म्हणाली ,"तोडायचे कुठे आहे ते आपल्याला ,ते ही हवेतच मला..पण सासरचे म्हणून नको.."
त्याला कळले तिला काय म्हणायचे आहे ते...तिला जसे माहेरची माणसे जीव लावतात ,ती त्यांना लावते तसेच हे ही आपली माणसे समजून नांदायचे आहे ,तसे स्वप्नातील तिला सासरी नाते निर्माण करायचे आहे... त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण कुठे तरी ती कमी पडल्यावर त्यांचे राग सहन नाही होत.. त्यावर काय जादू करणार...
"होईल का रे अशी जादू काही ,की मी त्यांना जिंकले आणि आपण सगळे सुखात रहात आहोत...मी सगळ्यांना सांगते एक मोठे कुटुंब खूप छान असते ,आधार देणारे असते..?"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा