Login

पातळ भाजी भाग 6

Patl
पातळ भाजी

भाग 6


प्राची आणि अरविंद दोघांना आज बराच चांगला वेळ मिळाला होता..

सासरी कसे वागायचे असते तिला अजून ही कळत नव्हते..

मनमोकळे बोलावे तर कोणाशी बोलावे...नवरा ही नेमका कसल्या स्वभावाचा आहे हे थांग लागत नव्हता...तो आपली बाजू घेणारा नसतो की असतो कळत नव्हते.

प्राचीची कळी इतक्या दिवसांनी खुलली होती ,ती मनमोकळे बोलत होती...त्याला आपला हाच हक्काचा माणूस बाकी अजून ही सासरचे होते.


किती वेगवेगळ्या रिती ज्या तिला नवीन होत्या ,सासू ननंद तर जणू फक्त टपून होत्या चूक होताच बोलायला तयार..

त्यात कोणीच बाजू घेऊन बोलणे म्हणजे त्याला शिक्षा त्याला धाक...नवरा ही आईच्या धकतला आहे हे जाणवले...त्याने ही कबूल कलेच तसे..

पुढे बघू काय वाढून ठेवले आहे तिच्या नवीन संसारात..


------

"आपण का बसलो आहोत इतका वेळ ,इतक्या वेळात काही ऑर्डर केली असती.." तो

"मला भीती वाटते.." ती

"आता कसली भीती वाटते तुला..? "

"कोणी असे अचानक आले समोर ,कमरेवर हात ठेवून..आणि विचारले ,तुम्ही इथे काय करत आहात तर..." तिला खऱ्या अर्थाने भीती वाटत होती सासू आणि ननंद बाई पाहिल्या होत्या तिने म्हणून...त्याला त्यांच्या बद्दल सांगून टाकले तर हा निघू म्हणेन..

"असे आमचे शहर नाही ,कोणाची अशी दंडेल शाही नाही...मोगलाई माजली नाही इथे की कोणी येऊन गुंडा गर्दी करण्याची मिजाज दाखवेल..." तो हसत

तिला त्याचा अर्थ सांगून टाकावा वाटत होता ,दंडेल शाही ,गुंडा राज बाकी असला तरी चालेल पण सासूचा नको...त्या समोर पाहिल्या तरी तास भर मी गाडीतून उतरले नाही ,तर आल्याचं समोर तर नवरा काय करेन...


"मी काय म्हणते ,पुन्हा कधी तरी येऊ ,आता फक्त तिळाचे लाडू घेऊन या...थोडे चिप्स आणा, काही जिलेबी ,काही ढोकळा...घेऊन या म्हणजे बायकांना चहा वर नको पाठवायला..." ती छोटे तोंड करून म्हणाली


"हे आईला ठरू दे..."

"का आईला नाही आवडणार का असे..?"


"आईला नाही आवडणार हे खर्च..तिच्या हिशोबात बसत नाही...आमच्या घरातील होणाऱ्या महिनाच्या खर्चाला टाच लागते...बजेट कमी पडले तर मग ती चिडचिड करत बसते...नाहक खर्च म्हणते ह्या पाहुणचाराला..." त्याने तिला खटकणारे सत्य सांगितले...त्यांच्या घरातील नवीन नियम जो तिला अजिबात नाही पटला..

ती विचार करत होती, तो जो एक शब्द म्हणाला तो लागला तिला....अजून ही मी ह्यांच्या घरातली नाही झाले...ते सगळे म्हणजे एक ,मी म्हणजे परकी...ते घर म्हणजे त्यांचे माझे फक्त सासर..


"मी आले कश्याला तुमच्या सोबत ??" ती नाराज होऊन म्हणाली


"म्हणजे काय हे असे प्रश्न? "

"फक्त तिळाचे लाडू जर आणायचे होते तर तुम्हाला ही जमले असते आणायचे...त्यासाठी मी का आले..?" ती

तो समजू शकला नाही हिला म्हणायचे तरी काय आहे नेमके हा प्रश्न विचारून

"कसं आहे प्राची, तुला बदल म्हणून मी घेऊन नाही आलो सोबत..."


"मग का आणलं तुम्ही मला ? "

"तू जे घरी तीळ जाळले आहेस ना त्याला ही खूप खर्च लागला आहे.."


"म्हणजे ???"

"ते तीळ जवळपास आठशे रुपये खर्चून आणले होते..मी आणले होते..."


"मग काय त्यात..?" तिला टेन्शन आले लगेच, हा विचित्र का बोलत आहे असा


"काय म्हणायचे ते सांगतो ,ऐक त्याला पैसे गेले ते तू जाळून ठेवले आहेस...तर होऊदे चूक होते..पण ते लपवणे आले...त्यात आईला कळले तर काय म्हणून वाद नको...तुला टेन्शन नको...मी मग ठरवले माझी बायको आहे माझी जबाबदारी आहे...तू रुसायला नको...काही वावगे वाटायला नको...म्हणून मी हिंमत केली आणि तुला त्या वातावरणातुन बाहेर पडून मोकळा श्वास मिळावा हा हेतू...आता दुसरे म्हणजे पुन्हा पैसे लागणार ,हो की नाही...?"


"म्हणजे इथे प्रश्न पैश्यांचा होता तर....आता कळले मी जाळले तर हे मुद्दाम जाळले हे ही म्हण मग...???" ती


तिला राग आला तशी तिने तोंड फुगवले ,तिला त्याचा राग फक्त ह्यामुळे आला की त्याने ही दाखवून दिली की तो ही सासरचा भिडू आहे.. "म्हणतो काय तर तिची काळजी...त्याला तर आईचा धाक...तीळ जळाले त्याचे काय करायचे ,ते तर वाया गेले...मी जाळले ...म्हण ना मग सरळ...आल्या आल्या नुकसान केले..आता आई रागावणार.. बजेट कोलमडणार... किती मोठे नुकसान झाले..."


"हो होतीच काळजी त्यात ,तुम्हाला समजेल तर ना मॅडम प्राची..." तो


"किती पैसे लागले आठशे रुपये ना, थांब मी आप्पांना कॉल करून सांगते ,हजार रुपये पाठवून द्या...." ती रागात


त्याला आता राग येत होता ही अशी का वागते...हे वागणे डोईजड होत आहे..मला म्हणायचे काय होते आणि ही गैर अर्थ काढत आहे उगाच
"हो तर लाव फोन तुझ्या वडिलांना.. माग पैसे.."


"वाटलंच होत मला ,असाच असणार तू ही.."

"तुला असे येऊन किती दिवस झाले आहे ग.?"

"का तुला माहीत आहे ना ते.." ती


"कारण तुला अजून आठ दिवस ही झाले नाहीत जेमतेम तर तू आमचे स्वभाव ओळखून चुकलीस..?" तो रागात


"हो आजच ,हा स्वभाव सांगत आहे तू कसा आहेस ते.."


तिने इतके बोलणे नको होते...पण त्याला ही बोलायला भाग पाडणे चुकीचे होते...त्याने आता शांततेत घेतले..त्याला राग अनावर झाला नाही..पण त्याला कळले ती का चिडली...मी जळाले म्हणायला हवे होते ,ते चुकून जाळले म्हणालो...खरच खूप मोठी स्लिप ऑफ टंग झाली...

"मला कळली माझी चूक अग ,जळाले म्हणणार होतो जाळले झाले... तर मी सॉरी.."

"दुसरी एक चूक झाली आहे,पण चूक नसावी ती.." ती

"आता काय चूक..?"

"आमचे घर म्हणालास तीच चूक .."


"अरे किती चूक मोठी आहे ही तर...मी आपले म्हणायला हवे होते मान्य मान्य..."


"आता आप्पांना सांगते पैसे पाठवून द्या म्हणून.." ती

"नको त्यांना त्रास का द्यायचा, कारण चुकीची शिक्षा मला मिळायला हवी आता...त्या बदल्यात मग घेऊ तू म्हणाली ते सर्व सामान...!"


"नको तुमचे बजेट सांभाळा.." ती रागात

"त्याला कळले हे तर प्रकरण कठीण आहे..कात्रीत सुपारी फुटून तुकडे होतील पण माझी चूक फुटणार नाही...आता हे आयुष्यासाठी झाले...बजेट ,आमचे घर...आणि तीळ जाळले...आता ही मला तीळ तीळ जळणार हे नक्कीच..."