भाग 7
पातळ भाजी
पातळ भाजी
ती आता स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू बघत होती...
त्याने ही माघार घेतली होती..
समजदारीने दोघे ही मिळते जुळते घेण्याची पहिली सुरुवात करत होते..
"मला शांत होऊ दे ,मी घेईल समजून ..तुमच्या घरात मी कसे रहायचे...कारण मला तुमच्या घरात तुमच्या नियमानुसार रहायचे आहे...दुमत नाही की मी विचारात होते ,माझे लक्ष नव्हते म्हणून ते तीळ मी जबाबदारीने भाजायला हवे होते...ते आठशे रुपयांचे तीळ मी जाळले...तुझी चूक नाही...मी ही मान्य करते...बजेट तर मला कधी माहिती नाही...आमच्या ही घरात हे तंतोतंत पैसे मोज प्रकरण नव्हते...सढळ हस्ते हवे ते मिळत...."
"मी चुकलो यार...त्यात वाद होण्याआधी सांगायचे होते की हे इथे इथे तू चुकत आहेस..शब्दात गल्लत होत आहे...इतका घोळ झालाच नसता.."
तिने ही नमते घेतले ,त्याला सांगितले, "चला आजचे दुसरे भांडण आणि पहिले patch up साजरे करू...पण पुन्हा असे वाद होणार नाही..झाले तर नक्की कुठे चुकलो हे आपण दोघांनी मिळून सॉर्ट करायचे..."
"आई कधीच मनमोकळा खर्च करत नाही..अगदी स्वतःवर ही, अग... नेहमी कमी पगारात घर चालवत होती...तीच सवय अंगिकारली आहे...मी हळूहळू बदल घडवून आणणार आहे...स्वतः मला ही नाही पटत.."
तिला तो आई कशी चुकीची नाही बरोबर आहे तिची ही खोड किती सहज लपवून घेत होता...
तिला कळले होते ,बाजू घ्यावी तर नवरोबा सारखी...मग त्यात रेटून खोटे बोलणे का असेना...आईला खोटे पडायचे नसते...हे कळले
ते आता सोबत खाली उतरतात, गाडी पार्क करण्यासाठी तो गार्डला चावी देतो..
ती तिची पर्स घेऊन येते,आणि मोकळा असलेला तोच टेबल ज्यावर सासू आणि ननंद बसल्या होत्या तिथे बसतात..
तो ही येतो, येताना ती त्याच्याकडेच बघत असते, त्याने नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट घातलेली असते, आणि लाईट ब्लू कलर चा चायना कॉलर चा शर्ट घातलेला असतो, येताना तो हाताच्या स्लीवज चे बटन काढून येत असतो...उतरत्या उन्हा तो जणू कोणी मॉडेल असल्या सारखा भासतो
ती बघत रहात ,मनात वाटते किती सुंदर दिसतो हा...मी नशीबवान आहे की नवरा माझ्या अपेक्षे पेक्षा ही लै भारी मिळाला आहे...
मग थोड्या वेळापूर्वीचा त्याचा राग आठवते आणि पुन्हा...म्हणते माझ्याच नशिबी पडला..पूर्ण आईवर गेला आहे...माझी तर जरा ही दया येत नसेल ह्याला...
ती बसलेली असते तोपर्यंत तो काउंटर कडे वळतो आणि ऑर्डर देऊन येतो..तोपर्यंत मेनू कार्ड बघत असते ,तर सासू बाई आणि ताईने केलेले बिल नजरेस पडते..
बघते तर काय दोघींचे दीड हजार बिल झालेले असते..
"तो काय बघतेस लोकांनी खाल्लेली बिलं, बॅड manners असतात ही.."
"आता नको पुन्हा, आता बळ नाही भांडायला.." ती
तो ही बघतो ,ते बिल..आई आणि ताईंचे बिल होते ते...
तो वेटरला बोलवतो..."ये किसाका बिल है ??"
"अभी अभी दोन औरते आली होती ,हे त्यांचे बिल आहे.." वेटर
तितक्यात लगेच ती ही मध्येच बोलून जाते.
"एक बुढी ,एक लडकी सी थी क्या वो..?"
"A तुला काय करायचे ,असू दे त्यांनी त्यांचे पदरचे खर्च केलेत..आपलं काय जातंय बजेट..?" तो म्हणाला
"आपलंच गेलंय बजेट !!" जोर देऊन
"म्हणजे काय म्हणायचंय तुला..?"
"हेच की आई आणि ताई इथेच बसल्या होत्या..मी पाहिले त्यांना...अर्धा पाऊण तास आपण गाडीत बसलो होतो ना ते त्याच साठी.." ती
तो जरा घाबरला ,आणि तिच्या समोर गप्प बसला...बजेट आणि भांडण हे दोन्ही समीकरण खूप जवळचे मित्र आहे...विरोधीपक्ष आणि वाद..आज तेच होणार वाटत आहे..
"तू त्यांनाच पाहिले हे कश्यावरून, हम्म.??"
"मी आता त्या दोघींना आता चांगलेच ओळखू लागले आहे..." ती हळूच म्हणाली
तो तिच्या बोलण्यावर आ करून बघत होता...तरी तो गंभीर न होता मोठ्याने हसू लागला..टाळी दिली त्याने चक्क तिला
"व्हॉट अ जोक ,काय म्हणावं सुनेला ह्या गरीब की साधी सरळ मिजाज..." तो
तिला ही कळले नाही काय ती बोलून गेली असे..की ह्याने टाळी द्यावी...आणि इतके मोठ्याने हसावे की सगळेच बघत आहेत आमच्या कडे वळून वळून..
तिने त्याला हातावर चापट मारली , "गप्प बस गप्प बस रे ..म्हणजे आह.."
तो हसत हसतच होता ,किती दिवसांनी तो इतका हसला होता..."बायको, अग बायको मी तुझी दाद देतो...किती डीप ह्यूमर करतेस...सहज अगदी..." तो तिला टाळी देतच होता , आणि ती गप्प होती...
"हसण्यासारखं काही नव्हतं यात...मला काय म्हणायचं होत तू काय समजलास..." ती गोरिमोरी होऊन म्हणाली
"सांग काय म्हणायचे होत ह्या पेक्षा अजून...हे डायरेक्ट होते...जे तुझ्या मनातून बाहेर पडले.." तो पुन्हा हसत होता
ती आता खाली बघून हसत होती ,तिचा हात त्याच्या हातात तसाच होता...तिला आत्ता कुठे जोक समजला होता..
"मी निदान चेहऱ्याने ओळखू लागले असे म्हणत होते रे...असा उगीच काही ही अर्थ काढू नकोस उगाच..." ती
तिला कळले आपला हात तसाच त्याच्या हातात होता ,त्याने ही सोडला नव्हता, तेव्हा कोणी बघत आहे हे समजल्यावर तिने हळूच हात सोडवला...आणि मोठा श्वास घेत..डोळ्यात इतके मोकळे हसल्याने आलेले पाणी पुसले..
त्याने लगेच पुन्हा तिचा हात हातात घेतला ,तसाच दाबून पक्का पकडून ठेवला...तिचा उबदार हात आणि त्याचे भाव जणू हृदयाला कनेक्ट करत होते.
तिच्या हातात त्याने हळूच काही तरी काढून ठेवले..मुठीतून मुठीत दिले होते त्याने काही तरी..
ते जरा टोचले ,तशी तिने मूठ उघडून पाहिले...एक छोटी अंगठी होती.. ती पाहून तिच्या डोळ्यात चमक दिसली...आंनदाने तिचा चेहरा खुलला...ती त्याच्या कडे भावूक होऊन बघू लागली..आणि डोळे पानवले...तो ही तिचा आंनद बघून खुश झाला होता...ती काही बोलू शकत नव्हती ..पण न बोलता खूप काही बोलत होती
काय होईल दोघांचे पुढील भागात पाहू ..
क्रमशः