Login

पातळ भाजी भाग 12

Patl
पातळ भाजी
भाग 12


मी म्हणालो ," किती हा विचार करताय ,तिला मूळ मुद्दा आपण आई वडील वाटले तर पाहिजे..तिला आपल्या सोबत रहायला आवडले तर पाहिजे...ती तिच्या घरी अशीच उभी राहून काय तुमच्या सारखा विचार करत असेल का सांगा...ती विचार करत असेल की हे किती केले तरी सासर घर आहे..हे त्याचे आई वडील आहेत...ह्या नात्याने ते सासू सासरे आहेत.. त्यांना का म्हणून इतक्या सहज आई बाबा म्हणायचे..हे आई वडील होऊ शकतात का ?? त्यांना जपून विचार करून बोलावे लागेल ,इथे आपण आई वडिलांसोबत किती सहज बोलत असतो...काही ही बोलले तरी आई वडिलांना आपल्या बोलण्याचा राग येत नसतो,पण सासरी तर हे होणार नाही..आपण माहेरी जितके सहज वागतो तितके सहज ह्यांच्या सोबत नाही जमणार वागायला..किती म्हणा आई बाबा त्यांना ते आई बाबा होऊ शकणार नाहीत..तशी मी आई बाबांची खास जागा कोणाला इतक्या सहज देऊ शकणार नाही...असे काही तरी तिच्या मनात चालले असणार..आणि हे प्रत्येक नव वधूच्या मनात चालूच असते... तिला काही वर्षे लागतात इथे हे आपले घर आहे हे मानून घ्यायला.. तू सासू आहेस आणि तुला तिने मनापासून आई म्हणायला ही खूप कालावधी जावा लागतो...तू विचार करत आहेस सून आहे लेक म्हणून वागवू म्हणणे सोपे आहे ,पण ते तिला ही अवघड आहे ,आणि तुला ही अवघड आहे.."

"मी तर घाबरले होते बरका आक्का ,ह्यांनी तिची काय बाजू असेल हे सांगितले आणि मी पुन्हा सासू ह्या ट्रॅक वर आले.." प्राचीच्या सासूबाई चहा घेऊन आल्या होत्या ,सोबत खारी ,टोस्ट..चिवडा ही ठेवला होता..

इकडे आक्का म्हणाल्या ,"खरे तर यांनी सत्य सांगितले होते ना "

प्राचीच्या सासू बाई म्हणाल्या ,"किती भीती घालवून दिली होती यांनी माझ्या मनात की क्षणात जी सासू आई म्हणून वागू आपण तिच्या सोबत ,तिला लेक समजून सांभाळून घेऊ म्हणत होते ती मी म्हणत होते,मी हा दुसऱ्या बाजूने विचारच केला नव्हता ./तिला ही काही आपल्या बद्दल वाटत असेल हे सहाजिकच आहे..ती ही हाच असाच विचार करत असावी..की आपण तिला सासू म्हणून वाटत असणार..इतर सासू लोक असतात तशी सासू ,आई आणि बाबा म्हणायला ,समजायला आणि त्यांच्या सोबत तसेच वागायला किती तरी वेळ लागणार आहे. कितीदा तर तिला तिच्या आई बाबाच तिचे आई बाबा असतात बाकी कोणालाही हा मान द्यावा वाटत नसतो..ती जर इतक्या सहज आपल्याला आई बाबा म्हणून स्वीकारणार नसेल तर आपण अति घाई करून चालणार नाही. तिच्यावर नसत्या नात्यांचे ओझे आणि अपेक्षांचे भार टाकून जमणार नाहीत..आपण ही जरा अंतर ठेवून वागले पाहिजे...नसती जवळकी तिला गोंधळून टाकू शकते../ "

इकडे बाबा म्हणाले ," अग तसे ही आपल्या लेकाने ठरवले होते ,त्याला ह्या घरात फक्त काही दिवस राहायचे आहे..मग नंतर ते त्यांचे वेगळे राहतील.."

प्राचीच्या सासू बाई लगेच "हो ते तर विसरून गेले होते पण जितक्या दिवस राहतील तितक्या दिवस ते आपले ."

बाबा लगेच पुढे गोष्ट रंगवायला उत्सुक होतेच आणि लगेच सुरू केले, "तसे नाही ग पण मन गुंतवून ठेवशील ,सून नाही लेक लेक करशील तर ती नाते तोडून सोडून गेल्यावर त्रास तुलाच होईल..कारण ती मनापासून सहज गत्या आपली भावनिक गुंतवणूक करणारी नसेल..जे असतेच कोणाचे ही.."

इकडे आक्का बाई आता जरा त्यांच्या गप्पात रमल्या होत्या ,नरमल्या होत्या ,हलक्या गप्पांच्या नादात आपण ह्यांच्या पुतनीच्या तक्रारी घेऊन आलो होतो ,त्याच त्या विसरून गेल्या होत्या..

रोहित बाहेरून आला होता ,त्याने बघितले ह्या तर ताईच्या सासूबाई रे देवा..ह्या आल्या आहेत म्हणजे काही खरे नाही..सगळी गरळ ओकणार..त्याशिवाय इथून नाही जाणार.

तो विणाला खुणावत म्हणाला ,"किती वेळ बसवणार अजून ह्यांना आपण घरी ,काढा बाहेर..! "

वीणा लगेच म्हणाली,"मला खूप आवडतात ह्या म्हणून मुद्दाम बसून घेतले मीच त्यांना. मूर्ख.."

तो तिकडून उठून हळूहळू आतल्या खोलीत जात होताच तोच आक्का म्हणाल्या, "तुला काय रे ओळख नाही वाटत माझी..? "

"नाही चांगली ओळख आहे, मी विसरू शकत नाही अशी."

"ये मग बस जरा आमच्या सोबत." आक्का

"राहुद्या चालू द्या गप्पा तुमच्या.."

"नाहीतरी तुम्हाला माणसाची कदर कुठे आजकाल च्या मुलांना..बहीण ही लाघवी नाही आणि तुम्ही तिघे ही तसेच..आता तुमच्या वहिनीची भर पडली असेल.."

आक्का खरंच नुसत्या आग पखाड करणाऱ्या..कोणाचा तरी राग संपूर्ण घरावर काढणाऱ्या सासू सारख्या..

"नाही मी खूप थकलो आहे हो आक्का आज ,पण मी येतोच थांबा..! " रोहित तोंड देखल हसून म्हणाला

आक्का वीणा कडे बघून म्हणाल्या ,"वीणा आता तुझा ही ह्यावेळी बार उडून देऊ बघ..!"

वीणा तोंड वाकडे करत ,डोळे फिरून म्हणाली ,"नाही हा माझे अजून शिक्षण बाकी आहे..मी लग्न नाही करणार आत्ताच..तसे ही आई बाबा म्हणतात तुझा पहिला पगार आमच्या घरी राहून मिळायला हवा.."

"समजतंय सगळं मला ,पण एक स्थळ आहे.."

"म्हणजे लगेच बोलणी करून जाणार का आक्काबाई तुम्ही विणाची..? " बाबा हसत विषय टाळत म्हणाले

"बाबा काय हे आता ?" वीणा

"लग्नाचा विषय आहे ,आधीच नाट नसतात लावत..!" बाबा

"मी आत्ताच नाही लग्न करणार..मी ठरवेन तेव्हा करता येईल.." वीणा

"सगळे आपल्या मनावर नसते वीणा, जर असेल त्यांच्या नजरेत चांगले स्थळ तर बघायला काय हरकत आहे.." आई

आता विणाला घरातून बाहेर काढण्याची तयारी सुरु होणार होती..फक्त निमित्त आक्का ठरणार होत्या.. वीणाच्या मनात नेमके काय चालू असेल.. ..कोणी असेल का ??