©® विवेक चंद्रकांत...
पत्रिका -तीन छोटया गोष्टी
पत्रिका -तीन छोटया गोष्टी
1) "मी काय म्हणतो " त्याचा मित्र त्याला म्हणाला
"मागचे वर्ष तुला चांगले गेले नाही.धंद्यात नुकसान झाले.सख्या भावाशी वितुष्ट आले. कोर्टातही तू केस हरला. एखाद्या चांगल्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवून बघ ना."
"मागचे वर्ष तुला चांगले गेले नाही.धंद्यात नुकसान झाले.सख्या भावाशी वितुष्ट आले. कोर्टातही तू केस हरला. एखाद्या चांगल्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवून बघ ना."
"जरूर, पण त्याआधी मला माझ्याकडून काय चुका झाल्या याचाही अभ्यास करावा लागेल."
2) त्याने पत्रिका गुरुजींपुढे ठेवली.
"ह्या तीन चार वर्षात अनेक व्यवसाय करून पाहिले. पण सगळीकडे अपयश आले. काही उपाय सांगा."
"ह्या तीन चार वर्षात अनेक व्यवसाय करून पाहिले. पण सगळीकडे अपयश आले. काही उपाय सांगा."
गुरुजींनी बराचवेळ आकडेमोड केली. मग म्हणाले.
"अजून किमान दीड ते दोन वर्षे कठोर मेहनत करावी लागेल. मुख्य म्हणजे एकच व्यवसाय करावा लागेल कितीही अपयश आले तरी. नंतरच भाग्योदय होईल. तशी तयारी असेल तर जा पुढे."
"अजून किमान दीड ते दोन वर्षे कठोर मेहनत करावी लागेल. मुख्य म्हणजे एकच व्यवसाय करावा लागेल कितीही अपयश आले तरी. नंतरच भाग्योदय होईल. तशी तयारी असेल तर जा पुढे."
दोन वर्षांनी तो पेढ्यांचा बॉक्स घेऊन आला.
"गुरुजी तुम्ही सांगितलेले तंतोतंत पाळले... आता धंद्यात जम बसला."
"गुरुजी तुम्ही सांगितलेले तंतोतंत पाळले... आता धंद्यात जम बसला."
गुरुजी मनात म्हणाले "मी वेगळे काय सांगितले?. आपले वाडवडिलांपासून सगळेच सांगत आलेत की यश मिळवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. फक्त मी ती गोष्ट पत्रिकेच्या माध्यमातून सांगितली."
3) तो तिची आणि त्यांची स्वतःची पत्रिका घेऊन गुण मिलनासाठी ओळखीच्या गुरुजीकडे आला.पत्रिका गुरुजींच्या पुढ्यात ठेवत म्हणाला.
"महाराज, प्रेमाविवाह करतोय. जरा तिची आणि माझी पत्रिका जुळवून बघतात का?"
"महाराज, प्रेमाविवाह करतोय. जरा तिची आणि माझी पत्रिका जुळवून बघतात का?"
पत्रिकेला हातही न लावता गुरुजी म्हणाले
"तुला खरंच वाटते की तुझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तू तिला सुखी ठेवशील?"
"तुला खरंच वाटते की तुझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तू तिला सुखी ठेवशील?"
त्याला त्याची चूक उमजली, पत्रिका परत घेत त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा