मैत्रीचा कधीही न संपणारा असा गोड प्रवास
तुझ्या येण्यामुळे आयुष्य माझे झाले खास
आपली मैत्री हळूहळू बहरू लागली
आपल्याला एकमेकांच्या सहवासाची सवय झाली
कधी रागावणे,कधी रुसणे,कधी नुसती धमाल
अशीच तर आहे आपल्या दोघांची कमाल
मैत्रीची कधी सवय झाली कळलेच नाही
तू माझा मी तुझी झाले उमगले नाही
हळूहळू तुझा सहवास,तुझं असणे खूप आवडू लागले
तुझ्या प्रेमात माझे हे वेड मन बावरे होऊ लागले
खरच प्रेम हे असेच असते,हवेहवेसे असे वाटते
प्रेमात सारे जगच नवे वाटते
आपल्या प्रेमाचा एक वेगळाच रंग,वेगळीच दुनिया
जसे इंद्रधनुष्य व श्रावणसरिंची किमया
तुझेच आहेत हे माझे सारे क्षण
तुझ्या प्रेमातच आहे माझें बावरे मन
©®श्रावणी देशपांडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा