Login

आला पहिला पाऊस

पाऊस

* पाऊस*

आला पहिला पाऊस
सोबतीला वीज, वारा,
चिंब भिजूनी हर्षाने
आनंदली सारी धरा.

सुखावला बळीराजा
राबू लागला रानात,
पिक सोन्यावाणी यावे
स्वप्न घेऊनी मनात.

तापलेली काळी आई
होती आतूर भेटाया,
पावसाच्या सरीसंगे
लागे हिरवळ दाटाया.

सरीवर येता सर
नदी वाहे खळखळ,
पसरला चोहीकडे
मातीचा या दरवळ.

कोकीळेची कुहूकुहू
गूंजे आवाज मधूर,
थुईथुई तालामध्ये
नाचे डौलात मयुर.
-----------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©️®️

🎭 Series Post

View all