Login

पावनखिंड

Self Opinion

         आजच्या धकाधकीच्या युगामध्ये आपल्याला स्वतःकडे पाहायलाच वेळ नसतो. आणि मग अगदीच कंटाळा आला की आपण मनोरंजनाची विविध साधने शोधायला सुरुवात करतो. टी.व्ही, मोबाईल, नाटक यांच्याबरोबरच अजून एक मनोरंजनाचे साधन म्हणजे चित्रपट. एखादा पिक्चर नवीन आला की सगळी चित्रपटगृहे फुल्ल होऊन जातात.आणि नवीन आलेला चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्यात जी मजा असते ती अवर्णनीय आहे.           असंच ! आत्ताच नवीन आलेला शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर आधारलेला \" पावनखिंड \" चित्रपट मैत्रिणींच्या निमित्ताने पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे चित्रीकरण उत्कृष्टरित्या केलेला आहे.  हा चित्रपट बघताना अंगावर काटा येत नाही असं झालंच नाही. प्रत्येक प्रसंग हा सुन्न  करणारा ! जीवाची पर्वा न करता आपले मावळे स्वराज्यासाठी झुंजले आणि त्यांच्या या बलिदानाचं फळ म्हणजे आपल्याला मिळालेल स्वराज्य. पुष्पा , पांडू यांसारखे चित्रपट मुलांना दाखवण्यापेक्षा इतिहास जागवणारे पिक्चर मुलांना दाखवणे आजच्या काळाची खरी गरज आहे.\" पावनखिंड \" पिक्चर  बघून खूप मोठी प्रेरणा, बळ प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली परंतु ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी शूरवीर मावळे यांसारख्या धारदार तलवारी झिजल्या.  ही वस्तुस्थिती आहे. तसेच माननीय नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताची हाक दिली तर त्यासाठी जनतेने एकत्र येऊन ती मोहीम यशस्वी करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक वेळी मोदीची स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष नाही येऊ शकत ना ? याचा विचार व्हायला हवा. म्हणजेच कोणतही काम एकत्र येऊन एकजुटीने पूर्ण केलं तर ते काम लवकरात लवकर यशस्वी होत. 

       आपण काय बघावं आणि काय  बघू नये हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. ज्याच्यातून आपल्याला सत्कर्म,  सदाचाराची शिकवण मिळते तेच आपण आत्मसात केले तर त्याच्यातून होणारी सुजाण नागरिकाची उत्पत्ती ही नक्कीच देशाच्या विकासावर भर टाकण्याचे काम करेल ! 

                          धन्यवाद ! 

  कु. स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख