पावसाचा रंग

पावसाचा रंग
" मला पावसाळा फार आवडतो."

" हो मला पण आवडतो."

" पावसाळ्यात कसं सगळं छान छान दिसत, सगळी कडे झाडं हिरवीगार दिसतात."ते दोघ बाल्कनी मध्ये उभ राहून समोर कोसळणारा पाऊस बघत होते.

" हो अगदी ताज तवान झाल्यासारखं वाटतं."

" अशा वेळीं गरम गरम भजी आणि चहा प्यायला खुप मज्जा येते ना "

" आलेच मी एक मिनिटात." ती रूम मधे जात म्हणली.

" अग, कांदा भजी बनवत असशील तर सोबत जरा बटाट्याची पण बनव. सोबतीला आलं घालून चहा पण कर." तो म्हणाला.

" पावसाळ्यात अस बाल्कनी मध्ये बसुन, समोरचा कोसळणारा पाऊस बघत हातात गरम गरम चहा आणि तिखट कुरकुरीत भजी खायला मज्जा येते." तो हुरळून जाऊन म्हणाला. त्याला वाटलं होतं ती भजी बनवायला आत गेली आहे.

बाहेर पाऊस पडत होता . तिची वाट बघत तो तिथल्या खुर्चीवर बसला.इतक्यात ती बाल्कनी मध्ये आली. हातात चौकोनी बॉक्स घेउन.

" हे काय आहे. तू भजी बनवत होतीस ना ? "

" नाही रे, मी तर पार्सल आणायला गेले होते. सध्या ना मॉन्सून सेल सूरू आहे. म्हणून मी हे सोफ्याच कव्हर, खिडकीचे पडदे, बेडशीट खरेदी केली."

" हे बघ, हा क्रोकरी सेट मला फार आवडला आहे. मी ऑनलाईन ऑर्डर करते." ती त्याला उत्साहाने मोबाईल वर तिला आवडणारी क्रोकरी दाखवत होती.

प्रत्येकाला पावसाळा आवडतो. फक्त आवडण्याची कारण वेगवेगळी असतात.

बायकोला मॉन्सून सेल असतो म्हणून आवडतो. त्याला भजी खायला मिळतात म्हणून मला पावसाळा आवडतो.

तुम्हाला पावसाळा का आवडतो ? कमेंट मध्ये सांगा.


🎭 Series Post

View all