Login

कलम

Kalam
  प्रिय कलम
                    विचार विचार विचार मनात हे विचार सतत चाललेले असतात . कधी सिरीयस तर कधी मस्करी , कधी अचानक प्रेम तर कधी एकटेपणा . कधी एक नवा अर्थ तर कधी अर्थशून्य . पण हे विचार सतत चालू असतात कधीच न थांबणारे कधीच न थकणारे .... पण माय डिअर बेस्ट फ्रेंड कलम तूच आहेस जी या विचारांना एक दिशा दाखवते . त्यामुळे आज हे पत्र तुझ्यासाठी .
    
                      तुझ्या मदतीने कित्येक महान नाव होऊन गेले . राज्य केले लाखो हृदयांनवर त्यांनी फक्त तुझ्या मदतीने . विचार त्यांनी प्रखर केले तुझ्या मदतीने . अजरामर असे काव्य तू दिलेस . हे कलम तुझ्या मदतीने अनेक क्रांत्या घडल्या . तूच स्वताला तलवारी पेक्षा धारदार केले. ज्यांनी तुझ्या भाऊ बहिणी म्हणजे पुस्तकांना न्याय दिला त्यांना तू मोठे केले बाकी नापास पण ज्यांनी मान दिला ते यशस्वी झाले . त्या सोबतच तू आमच्या सारख्या लहाण्यांना सुद्धा आसरा दिला . तुला हे पत्र सुद्धा तुझ्याच मदतीने तुला लिहितोय . खरं तर टाइप करतोय पण डिजिटल युगात तुझी ओळख ही अजरामर आहे . करण माध्यम जरी बदलले तरी मूळ मात्र तूच राहणार आहेस .
एवढे महान तुझे नाव असून सुद्धा तू प्रत्येकाला समान वागणूक  देतेस  त्यामुळे तुझे मनापासून आभार मनापासून धन्यवाद .
   
                            जेव्हा कुठल्या समाजाला लिहिता येते तेव्हाच खऱ्या संस्कृती ची सुरवात होते . तुझे आधी पासून रंग रूप वेगळे होते . उतकीर्ण , किंवा भोजपत्र ताडपत्र , मातीचे टॅबलेट किंवा धातू अश्या किती तरी माध्यमांवरून तुझ्या प्रवासाची सुरवात झाली . तुझे सुद्धा विविध रूप होते . छाननी वर वार सहन करून तू उतकीर्ण तयार केले . दगड धातूंवर तू आपला परिचय दिला . प्राचीन संस्कृती मध्ये तुझे अनेक रूप होते हळू हळू विकास होत गेला तुझे विविध रूप दर्शन देत होती आणि संस्कृतींचा आशीर्वाद देत होती .
             आज बोलल्यांमुळे भाषा टिकल्या पण त्यांचे व्याकरण तू लिहिल्यामुळे त्या भाषा जगल्या . भाषेचा विकास झाला आणि तुमच्या या प्रेमामुळे संस्कृती फुलली . अनेक राजे महाराजे हे तुझे दास होते . ते तुझ्या शरण आले आणि म्हणून तू त्यांना भरभराहाट दिली . नाहीतर विना कलम कुठला वंश ताल ठोकू शकला .  तू इतिहास लिहिले . तू भूगोल काढला . तूच लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवला . तूच अर्थाचे अर्थ दिले तूच आर्थिक, सांस्कृतिक ,सामाजिक, व राजनैतिक अर्थ दिला तूच आम्हाला मानवी अर्थ दिला.
                        वाईट वाटत पण आज खूपदा तुझा गैरवापर होतो . प्रत्येक काळात तू विविध क्रांती केली पण आज सर्रास तुझा गैरवापर होतो . वाईट विचार तुझ्या मदतीने उतरत आहेत आणि वाचकांच्या मनावर अघात करत आहेत . वाचक सुद्धा त्याच वृत्तीचे आहे पण त्यांना गुलाम वाईट वृत्ती करत आहेत .
सर्रास वाईट विचार ज्यांचे शब्दसुद्धा लिहिण्यास तुला किळस येते अश्या कहाण्या बिंदास सादर होत आहेत . सभ्यपणा तू
आम्हाला शिकवला पण  त्या च सभ्यपणाला असभ्य बनवून उदो उदो होत आहेत . जिथे तू महिला विषयी सन्मान शिकवलं तिथे त्यांची इमेज खालची दाखवून विविध गोष्टी रंगविल्या जात आहे आणि सोशल मीडिया ही अश्यां साठी वर्णी आहे.
  तुझा च उपयोग करून छळ कपट सर्रास बाजारात विकल्या जातोय . तुझ्यावर भरवसा ठेऊन जे तुझ्या जवळ आलेत त्यांना तुझाच वापर करून अपमान करत आहेत . देशद्रोही समाज द्रोही विचार जेव्हा तुझ्या मदतीने फैलवले जातात नक्कीच तुला  अपमानेत जीव गेला असं वाटत असेल .
               परंतु असे सगळे असले तरी तू योग्य विचारांना अग्रणीत करणारी व वाईट विचारांवर बदल करणारी एक जादूची काळी आहे . विचारांनी तू जरी बांधलेली असली तरी तुझा जादू हा मुक्त व स्वतंत्र आहे . तुझ्याच मदतीने मला एक वेगळी ओळख भेटत आहे . खूप विचारांवर उजेळ टाकायचा होता म्हणून तुला पत्र पाठवून माझीच मदत करून घेतली करण तुझा व्याप खूप मोठा आहे . तुझ्या मदतीने मला खूप गोडमित्र मैत्रिणी मिळालेत अनेक विचारांशी मी जुडल्या जातोय तसेच विविध लोकांसोबत संपर्क होतोय व एक सतत नवीन अनुभव तुझ्यामुळे मला भेटत आहे . चांगले वाईट खरे खोटे सर्व भेट होत आहेत .
                            विचार विविध असतातच . तू बांधलेली आहे पण कागद च्या मदतीने तू मुक्त होत आहेस  हे सर्व इंटीग्रेटेड आहे आणि लाईफ सुद्धा अशीच आहे . तुझ्या साथ साठी मनापासून धन्यवाद तुझे . जेव्हा पण मन नसतं तुझ्या मदतीने मी माझ्या विचारांना उतरवतो व तूच मला एक नवी ओळख सुद्धा देतेस . काही लिहायचं विचार आला की तू अन तुझी बहीण नेहमी माझी मदत करतात त्यामुळे तुझ्या बहिणींचे सुद्धा विशेष कौतुक . या नव्या ओळखी साठी धन्यवाद आणि अशीच साथ असू दे माझ्या हातात नेहमी कलम असू दे .

                                                        तुझाच
                                                    नवा लेखक