Login

फिरुनी नवी जन्मेंन मी ( भाग 3 )

सावीलां अशी अचानक आलेली बघून माईने डोळ्यातलं पाणी पुसले.अण्णा डोक्याला हात लावून निराश बसलेले होते.काहीतरी विपरित नक्कीच घडलं होतं.ती माईच्या जवळ गेली तसा तिचा बांध फुटला."सावी,सावे गेला ग...घरातलं सगळं होतं नव्हतं ते घेऊन म्हाताऱ्या आई बापाला लाथाडून गेला ग.घ्या अजून लाड करा वंशाच्या दिव्याचे.इतके हाल झाले माझे याला जन्म देताना आणि याने हे पांग फेडले." सावीचा भाऊ प्रसाद घरातलं होतं नव्हतं ते सगळं घेऊन घरातून निघून गेला होता."नशिबाचे भोग सगळे.देवा!हेच बघायला मुलगा दिलास का रे?आता काय करायचं आम्हा म्हाताऱ्यानीं ?" बोलता बोलता अण्णा कोसळले.आणि त्याच क्षणी विजय तिथे आला.त्याने पटकन त्यांना आपल्या गाडीतून हॉस्पिटलला ऍडमिट केलं. प्रसादच्या वागण्यामुळे त्यांना धक्का बसला होता.हृदय विकाराच्या झटक्याने ते कोसळले होते.ट्रीटमेंट साठी खूप पैसे लागणार होते.काय करावं याचा विचार करत असतानाच विजयने ताबडतोब पैसे भरले.माईनी जावयापुढे हात जोडले."माई, हे काय करताय तुम्ही?अहो मला तुमचा मुलगाच समजा.माझं जे काही आहे ते सगळं सावीचं आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही दडपण घेऊ नका.अण्णांना चांगली ट्रीटमेंट मिळेल.मग कितीही पैसे लागले तरी काळजी करू नका.सावी तुम्ही दोघी घरी जा.मी थांबतो इथे.तुझी अवस्था नाजूक आहे.मी आई बाबांना कळवतो." विजयच्या बोलण्याने दोघींनाही आधार मिळाला.त्याने भरपूर पैसा खर्च केला आणि सतत त्यांच्याजवळ राहिला.अण्णा लवकरच बरे होऊन घरी आले.या सगळ्यात सावी ज्यासाठी घर सोडून आली होती ते ती माई अण्णांना सांगूच शकली नव्हती.तिला समजवायला म्हणून आलेला विजय देवासारखा धावून आला होता.या परिस्थितीत सावीने गप्प राहणेच पसंत केले.आता अण्णांना कुठलाही आघात सहन होण्यासारखा नव्हता.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

फिरुनी नवी जन्मेंन मी ( भाग 3 )

आई बाबांच्या खोलीतून मोठ्या मोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते.बाबांचा पारा चढलेला होता. सावी बाहेरच थबकली." विजय आता शेवटचं सांगतोय.बास कर तुझी ही थेरं.इतकी चांगली बायको आहे तुझी.आणि आता तर बापही होणार आहेस तू.तिचा नाद सोड.तिला घर घेऊन दिलंस,पैसा तर काय उधळत असतोस तिच्यावर अश्याने कसं चालणार?"
"बाबा,मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तिच्याशीच लग्न करायचं आहे पण ती खालच्या जातीची म्हणून तुम्ही नाही म्हणालात.मी काय करणार मग?मी तिला सोडणार नाही.तुमच्यासाठी मी लग्नाला तयार झालो पण माझी पहिली बायको उमाच आहे हे विसरू नका.ही सावी कितीही चांगली असली तरीही उमा माझं पहिलं प्रेम आहे.आणि मी काही कमी पडू देतोय का तिला ? मग झालं तर.आता विषय बंद करा." विजय रागाने धाडकन दरवाजा उघडून बाहेर आला तर थरथरत असलेली सावी त्याला दिसली.ती काही बोलायच्या आत चक्कर येऊन पडली.सगळे घाबरले.आधीच तिची अवस्था नाजूक त्यात तिने सगळं ऐकलेल असणार ह्याची खात्री सगळ्यांचं पटली.डॉक्टरांनी औषध दिलं.थोड्या वेळाने सावी शुध्दीवर आली.विजय तिथेच होता.तो काही बोलणार तितक्यात शामाबाई तिथे आल्या.
" स्वस्थ पडून राहा.तुला नसली तरी आम्हाला आमच्या होणाऱ्या नातवाची काळजी आहे.हे दूध घे आणि मग औषध घेऊन आराम कर.तुला खूप जपायला सांगितलं आहे डॉक्टरांनी."
"मी सगळं ऐकल आहे.खरं काय ते कबूल करा.आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला." सावी ओक्साबोक्सी रडू लागली.आता सगळं कबूल करण्यावाचून गत्यंतर नव्हते.
" माझं उमा नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे.पण ती खालच्या जातीची असल्यामुळे आई बाबांचा विरोध होता.आम्ही गुपचूप लग्न केलं.नंतर आई बाबांनी मला इमोशनल ब्लॅकमेल करून तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं.पण माझे अजूनही तिच्याशी संबंध आहेत आणि ते नेहेमीच राहणार.मी तुला फसवल,मला माफ कर. पण मी तुला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला काहीही कमी पडू देणार नाही पण तिलाही सोडू शकत नाही मी." विजयने सगळं कबूल केलं आणि तिथून निघून गेला.
"हे बघ सावी,झालं ते झालं.अग बाळ झालं की विसरेल बघ विजय तिला.आता सगळं विसरून जा.तो तुझ्यावर किती प्रेम करतो,सारखं काही ना काही आणतो ना तुझ्यासाठी? मग सगळं विसरून आता फक्त होणाऱ्या बाळाची काळजी घे.संसार म्हटला की थोड्या फार अडचणी येणारच.आता सगळं विसरून विजयला माफ कर.आपल्याला काही कमी नाही.बाळाच्या पायगुणाने सगळं छान होईल." शामाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होत्या. वरवर जरी ती शांत होती तरीही तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.
सावी सकाळपर्यंत कशीबशी थांबली आणि सरळ माहेरी जायला निघाली.विजयचा विरोध न जुमानता बरोबर चार कपडे घेऊन तिने आपल्या अण्णांचे घर गाठले.ते तिला नक्की आधार देतील याची तिला खात्री होती.कितीही झालं तरी ती त्यांची मुलगी होती.घरची परिस्थिती बेताची असली तरीही तिचं सगळं काही करायला तिचे अण्णा, माई समर्थ आहेत याची तिला खात्री होती.
घरात पाऊल टाकता क्षणीच घरात काहीतरी बिनासल्याची तिला खात्री पटली.ज्या विश्वासाने ती इथे आली होती त्या तिच्या अण्णा माईवर काय परिस्थिती ओढवली होती याची तिला काहीच कल्पना नव्हती.
काय वाढून ठेवलं होतं तिच्या पुढ्यात?जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.