Login

फिरुनी नवी जन्मेंन मी ( भाग 4 )

आली.घरातलं वातावरण बदलल्याचं तिला जाणवलं.पण तिने सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त ' स्वरा ' साठी जगायचं ठरवलं.विजय चार चार दिवस घरी येत नव्हता.तो कुठे आहे हे तिला चांगलंच माहिती होतं.अनेकदा जाब विचारून,रडून पडून आणि शपथा घेऊनही काहीच उपयोग नव्हता.इतके दिवस सावीची बाजू घेणारे सासू सासरे सुद्धा आता तिच्याशी नीट वागत नव्हते.घराण्याला वारस मिळावा म्हणून त्यांनी तिला पुन्हा लगेच दुसरं मूल होऊ देण्याची गळ घातली.पण विजयच्या वागण्यामुळे सावीने स्पष्ट नकार दिला.त्यांना फक्त त्यांचा वंश हवा होता म्हणून तिचं लग्न विजयशी लावून दिलं होतं.पण आता मात्र सावीला खरं काय ते कळलं होतं. विजयचे दुसऱ्या बाई बरोबर असणारे संबंध माहिती असूनही त्यांनी सावीला फसवल होतं.तिचा खूप संताप होत होता.आपला वापर केला गेला याचं दुःख खूप मोठं होतं पण ती काहीच करू शकत नव्हती.कोणाचाच आधार नव्हता.लहान बाळ घेऊन ती एकटी कशी जगू शकणार होती.पण स्वराच भविष्य तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार

फिरुनी नवी जन्मेंन मी ( भाग 4 )

सावीच्या मनात अजूनही शंका होती पण तरीही अण्णा माई साठी तिने मनाचा निर्धार केला आणि त्यांना झाला प्रकार कळू न देता सासरी गेली.ती घरी आली आणि घरात आनंदी आनंद झाला.
"हे बघा सगळ्यांनी झाला प्रकार आता इथेच विसरून जायचं आहे.सूनबाई तुझ्या माहेरच्या माणसांना हवी ती मदत केली जाईल पण इथे काय घडलंय त्याची वाच्यता कुठेही केलीस तर खबरदार.बाकी तू समजदार आहेसच.आणि समजदारीने वागलीस आणि यापुढेही वागशील अशी आशा आहे.
आणि विजय तू सुद्धा त्या बाईचं नाव या घरात निघता कामा नये. सूनबाईंची काळजी घ्या आणि घराला कलंक लागेल असे काही घडणार नाही याची खबरदारी घ्या." सुनील रावांनी सगळ्यांना कडक शब्दात सुनावलं.
सावीने सध्या फक्त आपल्या बाळाचा आणि अण्णा माईचां विचार करायचा ठरवलं.बाकी काहीच तिच्या हातात नव्हतं.विजय नीट वागत होता.आई बाबा पण नातवंड येणार म्हणून तिची बडदास्त ठेवत होते. प्रसादचा काहीच पत्ता नव्हता. सावीच्या सगळ्या बहिणी आपल्यापरीने अण्णा माईला मदत करत होत्या.
विजयचं प्रकरण अजून चालूच होतं.सावीचे दिवस भरत आले होते त्यामुळे त्याचं वागणं जास्तच स्वैर झालं होतं.
सावी झोपली आहे असं वाटून विजय प्रेमाने उमाशी बोलत होता.तिला त्याने भरपूर पैसे दिलेले होते.सावी त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याला जाब विचारला.आई बाबा त्यांच्या आवाजाने बाहेर आले.सावी खूप भांडली,रडली आणि तिला त्रास होऊ लागला.तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं.
काही तासांतच तिने एका गोंडस परीला जन्म दिला.मुलगी झाली म्हणून कोणालाही फारसा आनंद झालेला दिसला नाही. सावी मात्र खुश होती.तिच्यासाठी तिचं हक्काचं कुणीतरी आता तिच्या आयुष्यात आलं होतं.काही दिवसांनी सावी घरी आली.घरातलं वातावरण बदलल्याचं तिला जाणवलं.पण तिने सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त ' स्वरा ' साठी जगायचं ठरवलं.विजय चार चार दिवस घरी येत नव्हता.तो कुठे आहे हे तिला चांगलंच माहिती होतं.अनेकदा जाब विचारून,रडून पडून आणि शपथा घेऊनही काहीच उपयोग नव्हता.इतके दिवस सावीची बाजू घेणारे सासू सासरे सुद्धा आता तिच्याशी नीट वागत नव्हते.घराण्याला वारस मिळावा म्हणून त्यांनी तिला पुन्हा लगेच दुसरं मूल होऊ देण्याची गळ घातली.पण विजयच्या वागण्यामुळे सावीने स्पष्ट नकार दिला.त्यांना फक्त त्यांचा वंश हवा होता म्हणून तिचं लग्न विजयशी लावून दिलं होतं.पण आता मात्र सावीला खरं काय ते कळलं होतं. विजयचे दुसऱ्या बाई बरोबर असणारे संबंध माहिती असूनही त्यांनी सावीला फसवल होतं.तिचा खूप संताप होत होता.आपला वापर केला गेला याचं दुःख खूप मोठं होतं पण ती काहीच करू शकत नव्हती.कोणाचाच आधार नव्हता.लहान बाळ घेऊन ती एकटी कशी जगू शकणार होती.पण स्वराच भविष्य तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
खूप दिवस विचार करून सावीने एक निर्णय घेतला.
काय असेल सावीचा निर्णय ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा .