Login

फिरुनी नवी जन्मेन मी ( भाग 1 )

सकाळचे आठ वाजले होते.रोज पाच वाजता उठणारी सावी आज मात्र अजूनही झोपून होती.कालपासून अंगात ताप होता आणि अंगही मोडून आलं होतं.सासूबाईंच्या आदळ आपट करण्याचा आवाज तिच्या डोक्यात जात होता.विजयच्या ओरडण्याचा आवाजाने ती दचकून जागी झाली.पण दुसऱ्याच क्षणी वास्तवाची जाणिव होऊन तिच्या ओठावर हलकसं हसू उमटलं.तितक्यात स्वरा डोकावली. साविचे उघडलेले डोळे बघून तिच्या जवळ आली.काही क्षण तिच्या कुशीत विसावली.हळूच म्हणाली,"कसं वाटतय ग आता? रेस्ट घे छान.आता फ्रेश हो.थोडं खा आणि औषध घेऊन झोपून जा मस्त.लता मावशींनी मस्त उपमा केलाय तुझ्या आवडीचा. चल बाय."तितक्यात लता मावशी आल्याच." लई गुणाची पोर आहे ही.खरंच नशीबवान आहात तुम्ही बाई.कालपासून तुमच्या काळजीनं सुकून गेलीय अगदी.आता मी मागे लागून शाळेत पाठवलं.गेली खरी पण लक्ष सगळं तुमच्याकडेच असणार बघा तिचं.आता कसं आहे तुम्हाला.उठा काय ते फ्रेस व्हा आणि गरम गरम खाऊन घ्या.आजी पण वाट बघतायत.चला उठा औषधं घ्यायची आहेत दोघींनाही.रोजचा रिपोर्ट नाही दिला तर स्वरा बाईसाहेब रागावतील." हसत हसत लतामावशी म्हणाल्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन सावी उठली.फ्रेश होऊन आईच्या खोलीत गेली.आईचा जप सुरू होता.तिला बघताच त्यांनी माळ पूर्ण केली आणि लतामावशींना आवाज दिला.तिघींनी गप्पा मारत नाष्टा केला.दोघींनी औषध घेतली. सावी आईच्या जवळ पहुडली.तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईंचा जप सुरू झाला.
©® स्मिता भोस्कर चिद्रवार .
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल

विषय : तिची फरफट

फिरुनी नवी जन्मेंन मी ( भाग 1 )

साल 1990 .
स्थळ : महाराष्ट्रातील एक छोटंसं खेडं गाव

सकाळचे आठ वाजले होते.रोज पाच वाजता उठणारी सावी आज मात्र अजूनही झोपून होती.कालपासून अंगात ताप होता आणि अंगही मोडून आलं होतं.सासूबाईंच्या आदळ आपट करण्याचा आवाज तिच्या डोक्यात जात होता.विजयच्या ओरडण्याचा आवाजाने ती दचकून जागी झाली.पण दुसऱ्याच क्षणी वास्तवाची जाणिव होऊन तिच्या ओठावर हलकसं हसू उमटलं.तितक्यात स्वरा डोकावली. साविचे उघडलेले डोळे बघून तिच्या जवळ आली.काही क्षण तिच्या कुशीत विसावली.हळूच म्हणाली,"कसं वाटतय ग आता? रेस्ट घे छान.आता फ्रेश हो.थोडं खा आणि औषध घेऊन झोपून जा मस्त.लता मावशींनी मस्त उपमा केलाय तुझ्या आवडीचा. चल बाय."
तितक्यात लता मावशी आल्याच." लई गुणाची पोर आहे ही.खरंच नशीबवान आहात तुम्ही बाई.कालपासून तुमच्या काळजीनं सुकून गेलीय अगदी.आता मी मागे लागून शाळेत पाठवलं.गेली खरी पण लक्ष सगळं तुमच्याकडेच असणार बघा तिचं.आता कसं आहे तुम्हाला.उठा काय ते फ्रेस व्हा आणि गरम गरम खाऊन घ्या.आजी पण वाट बघतायत.चला उठा औषधं घ्यायची आहेत दोघींनाही.रोजचा रिपोर्ट नाही दिला तर स्वरा बाईसाहेब रागावतील." हसत हसत लतामावशी म्हणाल्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन सावी उठली.फ्रेश होऊन आईच्या खोलीत गेली.आईचा जप सुरू होता.तिला बघताच त्यांनी माळ पूर्ण केली आणि लतामावशींना आवाज दिला.तिघींनी गप्पा मारत नाष्टा केला.दोघींनी औषध घेतली. सावी आईच्या जवळ पहुडली.तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईंचा जप सुरू झाला.
आईच्या सानिध्यात साविला खूप छान वाटत होतं.मनाला मिळालेली ही शांतता खरी आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता.गेले कित्तेक वर्ष तिच्या वाट्याला जे काही आले होते त्याचा विचार तिला मनातून पुसून टाकायचा होता.पण म्हणतात ना ' मन वढाय वढाय,उभ्या पिकातल ढोरं.किती हाकला हाकला तरी येतं पिकावर ' नको नको म्हणत असतानाही तिच्या मानाने तिला भूतकाळात नेलच.
तीन मुलींच्या पाठीवर मुलाची वाट बघत असलेल्या आईच्या पोटी जन्मलेली सावि खरंतर कोणालाच नको होती.' यावेळी नक्की मुलगाच आहे ' असं अनेकांनी तिच्या आईला सांगितलं होतं पण तरीही मुलगी झाली होती.सख्ख्या आईनेही जीला नकोशी म्हणून नाकारलं तेव्हा बाकी कोण तिच्यावर प्रेम करणार?बिचाऱ्या जिजाबाईची तरी काय चूक? खेड्यातल्या अडाणी विचारसरणीत राहणारे लोक सतत मुलगा हवा म्हणून तिला बोल लावत असत.'आता जर मुलगा झाला नाही तर तुला सोडून देईन ' अशी धमकी नवऱ्याने आणि सासूने दिलेली असल्यामुळे तिच्या मनात धास्ती निर्माण झाली होती.न शिकलेली,माहेरची गरीबी अश्या परिस्थितीत राहणारी साधी भोळी जिजाबाई मुलगा होत नाही यात आपलीच चूक आहे असे मानून देवाला बोल लावत होती.
सावीचे अण्णा म्हणजे जमदग्नीचा अवतार होते.आज्जी सुद्धा तशीच.तिची आई जिजाबाई मात्र गरीब गाय.आपल्या मुलींना अण्णांचा मार बसू नये म्हणून बिचारी नेहेमीच त्यांना पाठीशी घालायची.पैशांची चणचण त्यामुळे कोंड्याचा मांडा करत कशीबशी घर चालवायची.आपल्या पोटच्या लेकिंवर माया करायची हिंमत तिच्यात नव्हती.
मुली कश्याबश्या वाढत होत्या.जिजाबाई पुन्हा गरोदर राहिली.यावेळी डॉक्टरकडे जाऊन मुलगा असल्याची खात्री करून घेतली होती.खरंतर जिजाबाईच शरीर खंगत चाललं होतं पण तरीही मुलाच्या अट्टाहासासाठी ती अवघड असं गर्भारपण सोसत राहिली.मुली वयात आल्या होत्या.आईची काळजी घेत होत्या.आपली मायी सुखरूप राहावी यासाठी प्रार्थना करत होत्या. परिस्थीतीमुळे साहजिकच वयापेक्षा त्या सगळ्याच बहिणी समजूतदार होत्या.
जिजाबाईंची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं.आईच्या काळजीने मुलींचा जीव खालीवर होत होता तर आपला वंश सुखरूप रहावा यासाठी अण्णांचा .
नक्की काय होईल?माईना हे सगळं झेपेल का?जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all