Login

फिटे अंधाराचे जाळे : भाग १

एका स्त्रीच्या स्वाभिमानी लढ्याची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन


अंंजलीने खांद्यावर पर्स अडकवली आणि देवाचा आशीर्वाद घेऊन ती निघायला लागली तेव्हा आई तिच्यासमोर येऊन उभी राहिली.

"अंजली तू जो निर्णय घेतला आहेस त्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा असं मला वाटतयं. "

"आई माझा निर्णय मी बदलणार नाही हे तुला मी सांगितले आहे अगदी स्पष्टपणे त्यामुळे आजतरी नको त्या विषयावर वाद घालूया आपण.", अंजलीने अगदी शांत स्वरात आईला समजावले आणि ती पुन्हा बाहेरच्या दिशेने निघाली.

" बाळा एकटीने जगणं इतकंही सोप्पं नसतं गं. घटस्फोट नको घेऊ.
हा समाज पदोपदी तुम्हाला तुमच्या एकटेपणाची जाणीव करून देतो. एकटी स्त्री म्हटलं की पुरूषांच्या वासनांध नजरा त्या स्त्रीवर खीळलेल्या असतात, शेवटी स्त्रीला पुरूष नावाचा आधार गरजेचा असतो या समाजात राहण्यासाठी आणि स्वतःचे चारित्र्य वाचवण्यासाठी गळ्यात मंगळसूत्र असणे गरजेचे असते. "

" आई एक शिक्षिका असूनही तू हे सगळे बोलत आहेस याचेचं नवल वाटते गं मला. आई कुठल्याही मुलीला हौस नसते गं स्वतःचा संसार मोडायची पण हे आयुष्य एकदाचं मिळतं ना आणि आनंदाने जगायचा मलाही अधिकार आहेच एक व्यक्ती म्हणून नाही का?

मला अगदी मान्य आहे आई की या समाजात अजूनही एकट्या स्त्रीने राहणं तितकंसं सुरक्षित म्हणून मी त्या तडजोडीच्या नात्यात आयुष्यभर स्वतःला बांधून ठेवू केवळ या समाजाच्या भितीने आणि ठीक आहे आई एकवेळ तडजोड ही मान्य जर नातं महत्त्वाचं असेल तर पण स्वाभिमानाचे कायं करू आई?

लहानपणापासून तू कायम मला ताठ मानेने जगायला शिकवले आहेस. एक व्यक्ती म्हणून मी समोरच्या व्यक्तीचा आदर करायला हवा आणि हे तू वारंवार सांगितले आहेस पण आदर हा देखील बरोबर हवा ना गं आई? मी नवरा म्हणून निशांतचा आदर करतेयं पण बायको म्हणून त्याच्या डोळ्यात मी आजपर्यंत एकदाही आदर नाही पाहिला माझ्यासाठी.

मी सुद्धा चांगली शिकलेली मुलगी आहे. स्वतःच्या पायावर उभी राहून कमवते मी निशांतच्या बरोबरीने आणि माझे घर देखील उत्तम सांभाळते मी. हे सगळे करताना मी ही व्यक्ती म्हणून दमून जाते पण कधी आजपर्यंत तक्रार नाही केली. " अंजली आज कधी नव्हे ते मनांत साठलेले बोलत होती आईसमोर.

" अंजली मला सगळे मान्य आहे पण तू आणि निशांत एकदा एकमेकांशी बोलून पहा मला वाटतयं तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणे हाच काही उपाय नाही एकमेव. " आईने पुन्हा एकदा अंजलीला समजावून पाहिले.