फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 10
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिजीत, आनंदी फिरायला गेलेले असताना आनंदीला तिची मैत्रीण रियाचा फोन आला, दोघींच्या गप्पा झाल्या. एकमेकींची विचारपूस झाली.
आता पुढे,
दोघींचं बोलणं झालं त्यानंतर आनंदी आणि अभिजीत पुन्हा सगळं कॉन्टिनुए केल.
दोघेही हॉटेलवर गेले, जेवण करून निवांत झोपले.
दुसऱ्या दिवशी दोघांनी रेस्ट घ्यायचं ठरवलं. आनंदी पलंगावर पाठ टेकून मोबाईल बघत बसली होती.
दुपार जरा कलंडली आणि इतक्यावेळ उन्हाने गपगार पडलेली वळचणीची पाखरे किलबिलाट करू लागली.
पलंगावर बसून भिंतीला टेकून बसल्याने पाठीला चांगलीच रग लागली होती. पाखरांच्या आवाजाने तिची तंद्री मोडली.
दोन्ही पायाला घातलेले हाताचे विळखे तिने हळुवार सोडले आणि मान भीतीला टेकवून खिडकीकडे पहिले. हळूच खिडकीच्या उंबरा ओलांडून एक धिटुकल पाखरू आत आलं.
मान वेळावून त्याने सगळीकडे पाहून घेतलं, चोचीने तिथलंच काहीतरी उचललं, थोडावेळ खिडकीच्या गजाच्या आत-बाहेर केलं, तेवढ्यात वाऱ्याने पडदा हलला.
तेवढूश्या हालचालीने पाखरू केवढ्याने दचकले आणि भुर्क्कन खिडकीबाहेर उडून गेलं. त्याची ती लगबग बघून तिला हसू आल...वाटल.. “वेडं पाखरू....” ती थबकली.
किती दिवसांनी हा शब्द आला तिच्या ओठांवर.
तिला तीच घर आठवलं आणि तिची सकाळची गडबड, बस यायची वेळ, त्यात काहीतरी सापडत नसायचं, डबा, पर्स किंवा किल्ल्या. रोज हरवायाच्या, आदल्या दिवशी तयारी करूनही असं कस होतं म्हणून चिडचिड... निशा मात्र तिच्या या धांदलीकडे फक्त बघत बसायची, ती उठून मदत करत नाही म्हणून तिची अजून चिडचिड.. कधी तिच्या या गडबडीकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करून तिला ती अक्षरशः खेचून खिडकीजवळ आणायची आणि कुशीत घेऊन गोंजारत म्हणायची..”वेडं पाखरू...”
ती पलंगावरून खाली उतरली. मगाशीचीच गार वाऱ्याची लहर पुन्हा एकदा झुळूकली. पडदे हलकेसे थरारले. बाहेरच्या उन्हाची तकतकीत नजर खिडकीजवळच्या फुलदाणीवरून हळूहळू समोरच्या भिंतीमध्ये विरून गेली.
जांभूळनिळ्या आकाशाखालचं सोनेरी पिवळ गवत.. आणि त्यावर उडणारे काळे जर्द पक्षी..
बाबाने भिंतीला सुंदर रंग मारले होते तेही स्वतःच्या हाताने. आईला ते खूप आवडायचं. बाबा तासनतास त्या भिंतीवर काढलेल्या चित्राकडे बघत असायचा. आनंदी तिच्या जुन्या गोष्टीत रमून गेली.
कित्येकवेळा संध्याकाळच्या गप्पा मारताना आई उंबऱ्याच्या पायरीवर बसून राही आणि बाबा आत खोलीत ..त्या भिंतीपाशी.
स्पंज-टेक्श्चर वापरून रंगवलेल ते चित्र मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा अगदी थक्क झाले होते. हा माझा बाबा काही चित्रकार नाही फक्त कधी काय करेल याचा नेम नाही. एकदा काहीतरी काढायचं त्याने नक्की केल होत. त्याने खूप छान चित्र काढलेलं होतं.
चित्र काढून झालं आणि बाबा माझ्या खोलीत आला,
"आनंदी उठ लवकर."
"काय झालं बाबा?"
"तुला काहीतरी दाखवायचं आहे, आधी मी तुझ्या डोळ्याला पट्टी बांधतो."
"बाबा हा काय पोरकटपणा?" असं म्हणत आनंदी हसली.
विक्रम तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन गेला.
तिच्या डोळ्यावरून पट्टी काढली.
आणि समोरच दृश्य बघून आनंदी अवाक झाली.
तिच्या डोळ्यावरून पट्टी काढली.
आणि समोरच दृश्य बघून आनंदी अवाक झाली.
विक्रमने तिचं पोट्रेट काढलं होतं. ते बघून आनंदीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
ती विक्रमला बिलगली आणि रडायला लागली.
ती विक्रमला बिलगली आणि रडायला लागली.
"आनंदी,आनंदी..काय ग कुठे हरवलीस?" अभिजीत
अभिजीतच्या आवाजाने ती तिच्या आठवणीतून बाहेर आली.
"काही म्हणालात का?" आनंदी
"कुठे हरवली होती?" अभिजीत
"नाही काही नाही."
मी माझ्या आठवणीतील तुला एक कविता सांगतो.
"तुझ्या त्या नजरेतील
नजाकतीला कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल!"
नजाकतीला कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल!"
"अरे वा,छान आहे. तुम्ही कविता लिहिता?" आनंदीने आश्चर्याने विचारलं.
"नाही ग, मी कविता वाचतो. त्यातलीच मला एक आठवली." अभिजीत हसून बोलला.
"छान होती पण कविता." आनंदी
"हो ना, माझ्याकडे कवितांची पुस्तके आहेत. आपण इथून गेल्यानंतर मी देईल तुला वाचायला." अभिजीत
"हो मला आवडेल वाचायला." आनंदी एक्सायटेड झाली.
"तयार हो आपल्याला थोडयावेळाने निघायचं आहे." अभिजीत
दोघेही तयार होऊन निघाले.
आज ते कोवलमला जाणार होते.
आज ते कोवलमला जाणार होते.
कोवलम हे केरळमधील एक आवश्यक आणि महत्वपूर्ण ठिकाण आहे, जे तुम्हाला समुद्राचे विलोभनीय दृश्य देते. खूप सुंदर दृश्य आहे.
चार वालुकामय समुद्रकिनाऱ्यांनी बनलेले शहर, कोवलम हे भारतातील सर्वोत्तम सर्फिंग ठिकाणांपैकी एक आहे.
हे केरळची राजधानी तिरुवनंतपुरमपासून सोळा किमी अंतरावर आहे. मंदिरे आणि सूर्यास्तासाठी ओळखले जाणारे, कोवलममध्ये पाहण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत, सतरा किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर पसरलेला, कोवलम बीच हवा बीच, लाइटहाउस बीच आणि समुद्र बीच या तीन उत्कृष्ट, अर्धचंद्राच्या आकाराच्या समुद्रकिनाऱ्यांनी बनलेला आहे.
हे ठिकाण योग प्रशिक्षण, स्थानिक खाद्यपदार्थ आणि फोटोग्राफीसाठी देखील ओळखले जाते.
आर्ट गॅलरी, कॅफे आणि संग्रहालये एक्सप्लोर करण्यासारखी आहेत. लाइटहाऊस बीच हे कोवलममध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे आणि सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणांपैकी एक आहे. या दीपगृहाची उंची सुमारे तीस मीटर आहे. जादूई दृश्याचा आनंद घेण्यासाठी एकशे चाळीस पायऱ्या चढून जावं लागतं.
तिरुवनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम हे केरळची राजधानी आणि राज्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे त्याच्या मोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे.
जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक मानले जाणारे प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर हे अवश्य भेट देण्याचे ठिकाण आहे.
हे मंदिर भगवान श्री पद्मनाभस्वामी यांना समर्पित आहे, जे त्रिवेंद्रम शहराचे स्वामी मानले जातात. महाराजा स्वाती बलराम वर्मा यांनी बांधलेल्या कुथिरमालिका पॅलेस म्युझियमला भेट द्या.
हे संग्रहालय राजघराण्यातील मौल्यवान संग्रह प्रदर्शित करते.
दोन शाही सिंहासने – एक बोहेमियन स्फटिकांनी बनविलेले, पाठीवर शंखाचे प्रतीक असलेले नक्षीकाम केलेले आणि दुसरे हस्तिदंती बनलेले हे संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहेत. आणखी एक आकर्षण म्हणजे नेपियर म्युझियम, ज्यात केरळच्या वेगवेगळ्या कालखंडातील अविश्वसनीय शिल्पे आणि नाणी आहेत. अठराशे ऐंशी पासून लाकडी इमारतीमध्ये हे संग्रहालय आहे. बौद्ध शिल्पे, मंदिराच्या गाड्या, हस्तिदंती कोरीवकाम आणि केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराचे लाकूड कोरलेले मॉडेल आहे.
केरळच्या विविध भागांतील आणि कालखंडातील वाद्ये ही संग्रहालयातील सर्वोत्तम भागांपैकी एक आहे. वेल्लायनी तलाव हे त्रिवेंद्रममधील सर्वात मोठे तलाव आहे आणि त्रिवेंद्रमला भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
तलावातून गाव आणि बॅकवॉटरची काही मोहक दृश्ये आहेत. एका टेकडीच्या शिखरावर बसलेला, कनकाकुन्नू पॅलेस आजूबाजूच्या बागांमधील काही सर्वात नयनरम्य लँडस्केप ऑफर करतो. या राजवाड्याला भेट नक्की द्या आणि त्रावणकोर राजघराण्याचे सोनेरी दिवस पुन्हा जिवंत करा.
गाईडचं सांगून झालं मग हे दोघे सगळं बघायला निघाले.
ते मोहक दृश्य बघून अभिजीतला कुसुमाग्रजांची एक कविता आठवली.
"पूर्ण झाले चंद्रसूर्य, पुऱ्या झाल्या तारा
पुऱ्या झाल्या नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
पुऱ्या झाल्या नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवर श्रावण,
इंद्रधनू बांधतील काय ?
यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवर श्रावण,
इंद्रधनू बांधतील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण.
प्रेम कर भिल्लासारख, बाणावरती खोचलेल
मतीवरती उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोहचलेल
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण.
प्रेम कर भिल्लासारख, बाणावरती खोचलेल
मतीवरती उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोहचलेल
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.
उधळून दे तूफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारख
बाणावरती खोचलेल.."
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारख
बाणावरती खोचलेल.."
– कुसुमाग्रज
आनंदी कविता ऐकून भारावून गेली.
क्रमशः
