Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 11

Katha don preminchi


फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 11

आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिजीत आणि आनंदीने आज रेस्ट घेतला होता, आनंदी मोबाईल बघत बसली होती, तिने खिडकीतुन एक पक्षी बघितला आणि ती तिच्या जुन्या आठवणीत गेली. अभिजीतने दोन तीनदा आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. दोघेही फ़िरायला निघाले, अभिजीतने तिला कुसुमाग्रजांची कविता ऐकवली, कविता ऐकून आनंदी भारावली.

आता पुढे,


पुढे ते दुसऱ्या ठिकाणी फिरायला गेले, गाईडने सर्व जागी फिरवून आणलं.

"तुम्हाला या ठिकाणची माहिती देतो." अस म्हणून तो बोलायला लागला.

"कोझिकोड (कालिकत) हे पौराणिक बंदर आहे जेथे वास्को द गामाने प्रथम पाऊल ठेवले आणि शोधून काढले भारत. ऐतिहासिक आणि व्यावसायिक महत्त्वासोबतच, या प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये शांत समुद्रकिनारे, विहंगम ग्रामीण भाग, वन्यजीव अभयारण्ये, संग्रहालये, धबधबे, नद्या आणि टेकड्या आहेत. सगळं बघण्यासारखं आहे, काही राहील असेल तर नक्की बघा.


कोझिकोड शहर हे नारळ, मिरपूड, रबर, कॉफी, लेमनग्रास तेल आणि काजू यांचे केंद्र आहे. आज कोझिकोड हे केरळमधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. तुम्हाला इथुन ह्या वस्तू खरेदी करून न्यायच्या असतील तर तुम्ही आता खरेदी करून घ्या. वेळ आहे आपल्याकडे थोडा."

दोघांनी होकारार्थी मान हलवली."

गाईडने  पुन्हा बोलायला सुरुवात केली.

"कोझिकोड बीच हे आराम आणि विश्रांतीसाठी एक आदर्श स्थान आहे. लखलखीत सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. नौकाविहारासाठी योग्य ठिकाण, कालीपोयिका हे समुद्रपर्यटन, रो बोटिंग आणि पेडल बोटिंगचा आनंद घेण्यासाठी आवश्‍यक आहे.

पर्यटकांना भेट देण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे मननचिरा स्क्वेअर, ज्याचे नाव भूतपूर्व झामोरिन्स राजा मानववेदवन यांनी तयार केलेल्या स्वच्छ पाण्याच्या तलावाचे नाव आहे. या ठिकाणी मंदिरे, मशिदी आणि चर्च विखुरलेले आहेत. कडलुंडी पक्षी अभयारण्य, अरबी समुद्रातून येणार्‍या कडलुंडी नदीजवळ, असंख्य बेटे आणि टेकड्यांमध्ये वसलेले आहे आणि हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या पक्षी अभयारण्याचे सौंदर्य अप्रतिम आहे कारण येथे जवळपास शंभर स्थानिक आणि सुमारे साठ स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहेत जे नैसर्गिक सौंदर्याची मोहिनी गातात. 


नयनरम्य भूमीला भेट देणार्‍या जोडप्यांसाठी, कुटुंबांसाठी आणि मित्रांसाठी केरळमध्ये भरपूर मनोरंजक गोष्टी आहेत. साहसी खेळ किंवा उपचारांच्या मालिशपासून, केरळमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. 


केरळमध्ये हत्तीची सवारी करणे आवश्यक आहे आणि मुन्नार आणि थेक्कडीमध्ये करण्यासारख्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. हत्तीस्नान, हत्ती सफारी आणि हत्ती चारा यासारख्या रोमांचक क्रियाकलापांसाठी पर्यटक कोचीमधील कोडनाड हत्ती अभयारण्यातही भेट देऊ शकतात. 

केरळच्या बॅकवॉटरचा अनुभव घेतल्याशिवाय केरळची सहल अपूर्ण आहे. द हिरवेगार, पाम-फ्रिंग्ड लँडस्केप, वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि बॅकवॉटरच्या रेषेत असलेली गावे हाऊसबोट क्रूझला एक शांत अनुभव देतात जो अलेपेय किंवा कुमारकोम येथे संस्मरणीय रोमँटिक गेटवेचा भाग असू शकतो. केरळमधील हाउसबोट्समध्ये सुसज्ज बेडरूम, लिव्हिंग रूम आणि दृश्यांसह डेक आहेत.

केरळमधील विविध आयुर्वेद रिसॉर्ट्समुळे, हा \"देवाचा स्वतःचा देश\" जगभरातील पर्यटकांना पुनरुज्जीवनासाठी आकर्षित करतो. औषधी वनस्पती आणि वनस्पतींची उदार उपलब्धता आणि सर्वोत्कृष्ट आयुर्वेदिक रिसॉर्ट्स राज्याला सर्वांगीण आरोग्य गंतव्य बनवतात. प्रशिक्षित व्यावसायिक तुम्हाला अप्रतिम मसाजसह लाड करतात ज्यामुळे शारीरिक विश्रांती आणि मानसिक आरोग्य मिळते. आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या सहलीमध्ये एक आठवडा मुक्काम आणि डिटॉक्स कोर्स असू शकतो (पंचकर्म म्हणतात). तुम्ही त्यांच्या ऑफर केलेल्या उपचारांपैकी कोणतेही एक बुक करू शकता. 

नृत्याचा एक अनोखा प्रकार, कथकलीचा उगम केरळमध्ये झाला. या प्रदेशातील प्रचलित संस्कृतीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पर्यटकाने केरळमधील कथकली परफॉर्मन्स पाहणे आवश्यक आहे. यामध्ये रंगीबेरंगी मेक-अप, पोशाख आणि फेस मास्क यांचा समावेश आहे जो पारंपारिकपणे पुरुष अभिनेता-नर्तक वापरतात. 


चहा आणि कॉफी व्यतिरिक्त, केरळमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांची लागवड केली जाते. केरळच्या सुगंधी मसाल्यांच्या बागांना भेट द्या आणि मिरपूड, स्टार बडीशेप, लवंगा, वेलची, दालचिनी, व्हॅनिला आणि जायफळ वाढलेले पहा. मसाल्यांच्या बागांना भेट दिली जाऊ शकते. थेक्कडी, वायनाड आणि मुन्नारमध्ये. 

गाईडने संपूर्ण माहिती दिली, मग दोघे मनसोक्त फिरले.


दोघेही बाहेरूनचं जेवण करून आले.

आल्यानंतर आनंदी शांत शांत होती.

"काय ग, अशी शांत का आहेस?"

"काही नाही."

"आई बाबांची आठवण येतीय का?"

"नाही."
"मग काय झालं? आनंदी तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलली नाही तर मला कसं कळेल की तुझ्या मनात काय चाललंय?

हे बघ आनंदी, दोन व्यक्तींमध्ये सवांद खूप महत्वाचा आहे.
तुला माहीत आहे का संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे.. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं.

एकमेकांवरचा विश्वास आणि संवादावरच नात्यांची भिस्त असते. संवादा शिवाय नातं फुलतही नाही आणि बहरतही नाही. ज्याप्रमाणे फेव्हीकॉल दोन गोष्टी एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो. त्याच प्रमाणे दोन माणसे, नाती, व्यवहार जोडून ठेवण्याचे काम संवाद करतो."

आनंदी हसायला लागली,

"हसायला काय झालं? मी प्रवचन सांगतोय." अभिजीतने तिच्याकडे तिरकस नजरेने बघितलं.

"सॉरी तस नाही, ते तुम्ही फेविकॉलचं उदाहरण दिलंत ना म्हणून हसायला आलं." आनंदीने हसू आवरलं.

"हम्म मी काय बोलतोय ते नुसतं ऐकू नको तर काही मनावरही घे. हम्म तर मी काय म्हणत होतो, नात्यातील कुरबुरी बऱ्या करून नात्यांना लयबद्धता देणारं ते एक वंगण म्हणजे सवांद आहे. ते कुणीतरी म्हटलं आहे

"घडला नसता संसार,
जुळली नसती नाती
नसता जर संवाद,
तर घडल्या नसत्या भेटी.."

या कवितेत संवादाचं महत्व अगदी सुरेखपणे रेखाटण्यात आलं आहे. संवाद साधण्याची कलाच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं आणि सरस ठरविते. संवाद हाच सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे. हा आमचा-तुमचा-सर्वांचा रोजचा अनुभव आहे. पण तरीही आज नात्यातला संवाद हरवत चाललाय. तुला माहीत आहे लोक एकमेकांशी खूप बोलतात पण त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा नसतो तर कुत्रीमपणा असतो. चेहऱ्यावर दाखवतात पण भाव नसतात. सु-संवादापेक्षा वि-संवादाचे संभाषण अधिक केल्या जाते.

त्यामुळे माणसा-माणसातील नात्याचे बंध उलगडू लागले आहेत. पित्याचे आपल्या मुलाशी जमत नाही. नवरा आणि बायकोच्या नात्यात किती सुसंवाद उरलाय, याचं उत्तर कौटुंबिक न्यायालयात गेलं कि कळते. मित्र मैत्रिणी किंव्हा प्रियकर प्रेयसी यांच्या नात्यात आलेल्या दांभिकपणाबद्दल तर बोलायलाच नको. व्यावहारिक हितसंबंधांचा विचार करून कृत्रिम मैत्र्या केल्या जातात. गरज संपली किंव्हा एकदा छोटासा समज- गैरसमज झाला संवादाचे दरवाजे बंद केल्या जातात. एकमेकांशी अबोला केला जातो. बऱ्याच वेळा वाद होतो म्हणून संवाद टाळला जातो. पण, त्यामुळे तर्क कुतर्कांच्या लहरी निर्माण होऊन एकेमकांत गैरसमज निर्माण होतात आणि वाद वाढतच जातात.

सध्या गोष्टीतील विसंवाद वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला तडा देण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असो नात्याची वीण घट्ट करण्यासाठी संवादाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवायला हवे. म्हणून मी तुला सांगत होतो बोल ग बाई तुझ्या मनातलं, तर तू बोलायला तयार नव्हतीस. बघ तुझ्यासाठी मला किती बोलावं लागलं. आता तरी पटलं बोलणं किती गरजेचं आहे ते."

"हम्मम."

"नुसतं हम्म करू नका, काहीतरी अमलातं पण आणा आनंदी मॅडम."

अभिजीतच्या तोंडून आनंदी मॅडम असं ऐकून आनंदी जोरजोरात हसायला लागली.

"चला शेवटी हसलीस तर. किती छोटासा चेहरा करून बसली होतीस. तुला घरची आठवण आली असेल तर फोन करून बोलून घे."

"आता नको, खूप रात्र झाली आहे. सकाळी करते आणि बोलते निवांत." आनंदी

"आनंदी या नंतर असं नर्व्हस व्हायचं नाही. जे काही मनात असेल ना बोलत जा." अभिजीत आनंदीच्या काळजीने बोलला.

तिने पण होकारार्थी मान केली आणि त्याच्या कुशीत गेली.