Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 13

Katha don Preminchi


फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 13

आधीच्या भागात आपण पाहिले की,

दोघेही फिरायला गेले असता एका ठिकाणी बसून गप्पा मारायला लागले.

आनंदीला आधी अभिजीत बद्दल काय वाटत होतं ते ती अभिजीतला सांगत होती.

आता पुढे,


दोघांच्या गप्पा झाल्या आणि ते हॉटेलमध्ये गेले.


दोघांचे जेवण झाले आणि दोघेही बाल्कनीत जाऊन बसले.

"आनंदी किती लवकर हे दिवस निघून गेलेत ना? कळलं देखील नाही. असं वाटलं आपण आताच इथे आलोय आणि आताच जातोय. दिवस भुर्रकन उडून गेले."

"हो आणि आपल्याला उद्या निघावं लागणार आहे ना?"

"हो, तू सगळ आताच पॅक करून ठेव."

"हो." असं म्हणून आनंदी अभिजीतला बिलगली.

तिचे डोळे भरून आले.

अभिजीतच्या लक्षात आलं.
"काय ग काय झालं?"

"या इतक्या दिवसात तुम्ही माझ्यासाठी किती काय काय केलंत, पण मी तुमच्यासाठी हे सगळं करू शकेल का? तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात, मी खरच त्या विश्वासाला पात्र आहे का?"

"आनंदी यू आर ग्रेट. मला माहित आहे तू सगळं करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर."


दोघांच्या गप्पा झाल्या त्यांनतर आनंदीने पॅकिंग केली.
आणि ती झोपली.

सकाळी उठून दोघेही परतीला निघाले.


घरी पोहोचे पर्यँत रात्र झाली होती. तिने बॅग ठेवल्या आणि लगेच फ्रेश झाली.


बाहेर ढगांचा दाट अंधार दाटला होता. वातावरणातील गारवा, घुमणार सुगंधीत वारा, या अशा वातावरणात मन चार भिंती आड कसं राहील म्हणा.

अभिजीत फ्रेश व्ह्यायला गेला,

त्याची येण्याची चाहूल लागताच तिने चहा बनवण्याचा विचार केला पण दूध तर नव्हतंच मग छान ब्लॅक चहा बनवला. आणि गच्चीवर जाऊन बसली.

जोरदार वारा, त्याच्या येण्याचे संकेत देत होता. अगदीच अधीर झालेली ती, तो वाफाळलेला चहा घेऊन, खिन्न बसलेली होती  पण जवळ जवळ एक  तास लोटला, तो आलाच नव्हता.


बाहेर काळेभोर नभ कधीही कोसळतील अशा स्थितीत होते.
वाराही सुसाट वाहत होता. मोकळ्या केसांमुळे गालावरील लटा त्रास देत होत्या, त्या सावरून ती त्याची वाट पाहण्यात पुन्हा मग्न झाली आणि पाहता पाहता जुन्या आठवणींत हरवून गेली. बालपणीच्या पावसाळी दिवसांची गम्मत आठवताच गालावर अलगत हसू उमटले.

काही आठवणी असतातच अशा कधीही न विसरता येणाऱ्या. त्यातल्याच या पावसातील गोंडस आठवणी.

अंगणात साचलेल्या पाण्यात इवल्याश्या होड्या सोडणं, भिजता यावं म्हणून छत्री घरी मुद्दामहून विसरणं.

आजीच्या उबदार मिठीत तासनतास लोळत पडणं, तिच्या हातची गरमागरम भजी खाणे, तो वाफळलेला चहा सारंच अविस्मरणीय होतं


कॉलेज मधील आठवणी मात्र वेगळ्याच होत्या. भिजू नये म्हणून निघण्याआधी पावसाला ‘येऊ नकोस रे’ म्हणून विनवण्या करायच्या. गडबडीत निघताना रेनकोट घरी विसरायचा, आणि वाटेत पाऊस आल्यावर आडोसा मिळेल तिथे धाव घ्यायची.

नेहमी त्याच्या पासून फक्त दूर पळायचं, त्याला टाळायचं. तिच्या साठी हा पाऊस म्हणजे, खमंग खुसखुशीत कांद्याची भजी. कित्तीही आवडत असली तरीही, यथेच्छ खाता येत नव्हती. तसच, पाऊस कितीही रोमांचक असला तरीही मनसोक्त भिजता मात्र येत नव्हतं.

तिला आज त्याला काही सांगायचं होतं, परत येताना तिने सगळा विचार करून ठेवला होता. तिने तिच्या मनातलं बोलण्याच नक्की केलं होतं. आता  सगळं बोलून टाकायचं होतं. त्याच्यात सामावून जायचं होतं. केविलवाण्या नजरेने आभाळात पाहात, मनापासून त्याला हाक मारली आणि बघताक्षणी एका मोठ्या गर्जनेने सर्वत्र आनंदसरी बरसू लागल्या. थोड्याच वेळात सारा परिसर चिंब भिजून गेला.

खुर्चीवरून उठून तिने त्याला मिठीत घेण्याचा भाबडा प्रयत्न केला. स्पर्शून जाणारा प्रत्येक थेंब तिला सुखावीत होता. बराच वेळ ती तशीच त्या धारा अंगावर घेत उभी राहिली. तो क्षण जगताना, त्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद लख्ख दिसत होता. पाऊस तसाच बरसत राहिला. जणू तो ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता.

दोघेही एकमेकांमध्ये सामावून गेले.

ती रात्र तशीच सरली.

दुसऱ्या दिवशी आनंदीला उशिरा जाग आली, ती उठली बघितलं तर अभिजीत बेडवर नव्हता. तिने आजूबाजूला बघितलं तिला अभिजीत कुठे दिसला नव्हता. तिने अभिजीतला आवाज द्यायला सुरुवात केली. काही क्षणात अभिजीत तिच्या समोर आला,  त्याच्याकडे बघून तिने आश्चर्याने विचारलं.

"अहो तुम्ही रेडी झालात पण?"

"हो, ऑफिसमध्ये जायला हवं ना? मी निघतोय ऑफिसला."

"अहो थांबा ना, तुम्हाला काहीतरी बनवून देते पटकन, खाऊन घ्या आणि निघा."

"अग असू दे, काहीतरी खाईल मी कॅन्टीनमध्ये आणि तू इतक्या लवकर ऑफिसला येण्याची घाई करू नकोस. तू आराम कर जमलं तर मी दुपारच्या जेवणाला येतो, नाहीतर काहीतरी खाऊन घेईल आणि हो काही लागलं तर मला फोन कर आणि आराम कर, स्वतःची काळजी घे."

"ओके.."

अभिजीतने आनंदीच्या माथ्यावरचं चुंबन घेतलं, तिच्या गालावरून हात फिरवला आणि तो ऑफिसला जायला निघाला.
"अभिजीत.." आनंदीने त्याला आवाज दिला. तसा तो पलटला.

"आय लव य.."

"आय लव यू टु आनंदी." तो हसला आणि ऑफिसला गेला.

ऑफिसमध्ये गेल्यानंतर,

सगळ्यांनी अभिजीतला वेलकम केलं.

तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला.

हरीकाकाने त्याला जशी आवडते तशी कॉफी आणली.

"साहेब आत येऊ का?"

"हो हरीकाका  या." अभिजीत फाईल बघत होता.

"साहेब तुम्हाला आवडते तशी कॉफी आणलीय."

"थँक्यू हरी काका, मला कॉफीची खूप गरज होती. थँक्यू तुम्ही घेऊन आलात."

"साहेब खायला काही घेऊन येऊ का?"
"नाही आता नको, तुम्ही या मी सांगतो तुम्हाला नंतर."

"हो साहेब." हरी काका बाहेर गेले.

अभिजीत फाईल चेक करत बसला होता, काही वेळाने त्याने आनंदीला फोन केला.

"हॅलो.."

"हाय डियर."

"काय सुरू आहे."

"बोला ना काही काम होतं तुम्हाला?"

"अरे वा आता बायकोला कामाशिवाय फोन करता येणार नाही का आम्हाला." अभिजीत हसून बोलला.

"अहो असं काही नाही मी सहज विचारलं."

"मी काय म्हणतो आपण आज रात्री बाहेर जाऊया कॅंडल लाईट डिनरला."

"पण मी काय म्हणते मी बनवते ना तुमच्या आवडीचं काहीतरी घरी. बाहेर कशाला म्हणजे आपण इतके दिवस बाहेरच होतो ना, आज बनवते ना मी घरी."


" नाही ग, आपण फिरून आलोय ना, मला माहितीये तू  थकलीयेस. सो आज जाऊ आपण बाहेर. उद्यापासून आपल्या रुटीन सुरू होईल आणि हो उद्यापासून तुला ऑफिसला यावं लागेल, बरच काम पेंडिंग आहे."

"हो हो नक्की."

"चल मग करते मी माझं काम."

"मी ठेवतो."
"बाय."
"बाय आनंदी."

आनंदीने काम आवरले आणि त्यानंतर तिने निशाला फोन केला.

"हॅलो आई कशी आहेस?"

"मी मस्त, तू कशी आहेस?" आली का फिरून?"

"हो ग, रात्रीच आलोत. आताच काम आवरले, थोडी निवांत बसली आहे. म्हटलं तुझ्याशी बोलावं मस्त."

"आणि काय म्हणतात जावई बापू?"

"आई सगळं छान आहे, मस्त चाललंय. आज मी उशिरा उठले त्यामुळे अभिजीत तसेच ऑफिसला गेले. रात्री बाहेर जाऊया म्हणाले, बघू आता."

"काय ग सकाळी उठून चहा तरी दिलास का त्यांना?"

"नाही ग, ऑफिसला जाऊन घेतो म्हणाले."

"बाळा असं करायचं नाही."

"सॉरी आई मी नाही करत ग असं, रात्री उशीर झाला ना झोपायला त्यामुळे जाग आली नाही आणि अभिजीतने पण मला हाक मारली नाही, पण तू काळजी करू नकोस यानंतर असं काही होणार नाही. मी घेईन त्यांची काळजी."

"तुझं काय सुरू आहे?"

"मी काही नाही ग बसले होते."

"मी काय म्हणते तू आणि बाबा कुठेतरी फिरून या ना, कुठेतरी देवदर्शन करून या. तुलाही थोडं चेंज होईल."

"हे तू तुझ्या बाबाला सांग, तुझ्या बाबाला वेळ तरी मिळतो का?"

"मिळेल ग मी बोलते बाबाशी."