Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 14

Katha premachi
फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 14

आधीच्या भागात आपण बघितले की,

दोघेही फिरून आले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अभिजीत ऑफिसला गेला. आनंदी घरीच होती, तिने काम आवरले आणि निशाला फोन केला. तिला सांगितलं की तुम्ही कुठेतरी बाहेर जा बाबा सोबत फिरायला, तर निशा बोलली की बाबा येणार नाही. आनंदी बोलली की मी बोलते बाबांशी.

आता पुढे,

आनंदीने बाबांशी नंतर बोलते म्हणून फोन ठेवून दिला, त्यानंतर ती थोडा वेळ निवांत बसली. थोड्यावेळाने संध्याकाळचे काम आवरले. काहीवेळाने अभिजीतचा फोन आला.

"आनंदी छान तयार होऊन रेडी रहा, मी येतो घरी."

"हो.."

असं म्हणून आनंदीने फोन ठेवला, ती तयारी करायला बेडरूम मध्ये गेली. आज तिने अभिजीतने आणलेला वन पीस लॉंग कुर्ता घातला, त्यावर लांब इयर रिंग्स, हातात कडे, मोकळे केस सोडले. आनंदी छान दिसत होती.


काही वेळाने अभिजीत घरी आला, आनंदीने दरवाजा उघडला. अभिजीत आनंदीकडे बघतच राहिला.

"अहो असं काय बघताय? अहो.."

तिच्या आवाजाने अभिजीत तंद्रीतून बाहेर आला.

"अहो असं काय बघताय?"

"काही नाही बघतोय आज माझी बायको किती सुंदर दिसत आहे. कुणाची नजर नको लागायला तुला."


"काहीतरी काय बोलताय?"


"अग खरच बोलतोय."

"पुरे झालं तुमचं, आता इथेच गप्पा मारणार आहात की आत जाऊन तयारी पण करणार आहात."

"हो हो.. बस पाच मिनिटात मी रेडी होऊन आलोच बघ."

असं म्हणत तो आत गेला. काही वेळाने अभिजीत रेडी झाला. दोघे बाहेर जेवायला गेले. आज बाहेर मंद मंद वारा सूटलेला होता. थंड वारा दोघांनाही स्पर्शून जात होता.
दोघांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले. दोघांनी जेवण केलं. त्यानंतर आनंदीला भोवळ आली, तिला थोडं गरगरायला लागलं.

"काय झालं आनंदी, तुला बरं वाटत नाही का?"
"माझं डोकं गरगरल्यासारखं वाटतंय.

"ओके ओके एक मिनिट इथे हॉटेलच्या रूम्स आहेत, आपण जाऊन तिथे थोडा आराम करू." असं म्हणून अभिजीत आनंदीला हॉटेलच्या रूमवर घेऊन गेला.

....................................

सकाळ झाली, प्रसन्न पहाटेची सूर्याची किरणे खिडकीतून आनंदीच्या चेहऱ्यावर आली. त्या सूर्याच्या किरणांनी आनंदीला जाग आली, डोळे चोळत आनंदी बेडवर उठून बसली. इकडे तिकडे मान फिरवली आणि ती दचकली.

तिने आजूबाजूला नजर भिरभिरली. त्यानंतर तिने बेडवर पाहिलं. बेडकडे बघताच ती जोरात किंचाळली.
"अअअअअअ…"

\"हे भगवान मी इथे कुठे आले? कुठे आहे मी? काय झालं होतं मला आणि हा इथे काय करतोय आणि अभिजीत कुठे आहे?"

"अभिजीत.. अभिजीत.." तिला कोणाचाच काही आवाज येत नव्हता आणि बाजूला झोपलेला तो काही उठत नव्हता.


आनंदीने मोबाईल घेतला, अभिजीतला कॉल लावला. बराच वेळ रिंग वाजूनही अभिजीत फोन उचलत नव्हता. बराच वेळानंतर त्याने फोन उचलला.


"हॅलो.. हॅलो.. अभिजीत कुठे आहात तुम्ही? अहो मी इथे कुठे आले आहे. प्लिज तुम्ही या ना." आनंदीला खूप रडायला आलं. तिने लगेच तिचे केस बांधले आणि पलंगावरून खाली उतरली आणि दरवाजा उघडला तोच अभिजीत दरवाजात उभा होता, त्याला बघताच ती त्याला जाऊन बिलगली आणि जोरात रडायला लागली.

"आनंदी शांत हो, शांत हो आनंदी."

"हे सगळं काय आहे? हा कोण आहे?"

"मी तुला सगळं सविस्तर सांगतोय पण हा उठायच्या आधी आपल्याला इथून जावे लागेल."

अभिजीतने तिला दरवाजातून बाहेर काढलं, दरवाजा लॉक केला आणि ते दोघे तिथून निघून गेले. घरी आल्यानंतरही आनंदीला शांत वाटत नव्हतं.

"अभिजीत आता तरी सांगा काय झालं होतं? माझ्यासोबत काही अघटीत घडलंय का?"

"आनंदी शांत हो, तुझ्यासोबत काही वाईट घडलेलं नाहीये आणि तुला असं का वाटलं. मी असताना तुझ्यासोबत काही वाईट घडेल का? जा तू आधी फ्रेश हो."

आनंदीची उत्सुकता वाढत होती पण अभिजीत तिला काही सांगायला तयारच नव्हता. आता आनंदीला अभिजीतचा खूप राग यायला लागला.


\"हे काहीच कसे काही सांगत नाहीत, त्यांना माझ्या मनाची घालमेल कळत नाहीये का?\" ती मनातल्या मनात बोलत फ्रेश व्हायला निघून गेली.

आनंदी फ्रेश होऊन आली त्यानंतर अभिजीतने दोघांसाठी कॉफी आणली, दोघेही कॉफी प्यायले.


"आता तरी सांगा ना काय झालं होतं."


त्यानंतर अभिजीतने आनंदीला सगळं सांगितलं.

"निनाद वारंवार फोन करून ब्लॅकमेल करत होता, जर आनंदीला एका रात्रीसाठी माझ्याजवळ पाठवलं नाहीस तर तिचा आणि त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल. असा त्याचा प्लान होता. अभिजीतने आनंदीला सगळं सांगितलं तो निनाद होता निनाद हे सगळं करत होता. निनादचा प्लॅन होता की आनंदी तिच्यासोबत एक रात्र घालवेल आणि त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि तो सगळीकडे व्हायरल करायचा. पण अभिजीतने निनादच्या ड्रिंकमध्ये बेशुद्धीची गोळी टाकली होती. त्यामुळे तो बेशुद्ध होता. रात्र कशी गेली त्याला कळलंच नाही."


हे सगळं इथून आनंदी घाबरली.

"अभिजीत पण तुम्ही मला का पाठवले तिथे?"


"यासाठी की आता आपण पुरावा तयार करतोय की त्याने तुझ्या सोबत वाईट कृत करण्याचं धाडस केलं आणि आता आपण पोलीस कंप्लेंट करून त्याला शिक्षा देऊ शकतो."


हे सगळं ऐकून आनंदी अभिजीतला बिलगली.

"थँक्यू सो मच अभिजीत."


दोघेही आवरून ऑफिसला गेले, दोघांना बघून सगळ्यांनी गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम केलं.


"तुम्ही सगळे मला मॅडम म्हणू नका मी आधी तुमच्यासाठी आनंदी होती आणि आता आनंदीच आहे." सगळ्यांना आवर्जून सांगितलं आनंदीमध्ये कुठलाच बदल झाला नाही हे बघून सगळ्यांना आनंदही झाला.


ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आली होती तिचं नाव रिया. आनंदीने तिला बघितलेलं नव्हतं.

"हॅलो मी आनंदी.., तुझं नाव?"


"हॅलो मॅम, माझ नाव रिया. ऍक्च्युली मी आता जॉईन झालेले आहे."

"ओ हाय, पण तू मला मॅडम म्हणू नकोस आनंदी म्हटलं ना तरी चालेल."

"अहो नाही मला इथे आल्यानंतर लगेच सगळं कळलं, तुमचं आणि सरांचं लग्न झालंय, सो तुम्ही आता आमच्या मॅडमचं आहात ना?"

"प्लिज डोन्ट फॉर्मलिटी फक्त आनंदी म्हटलं तर मला जास्त आवडेल." रिया आणि आणी आनंदीच छान जमलं. दोघीही छान गप्पा मारत बसल्या होत्या. तितक्यात अभिजीत बाहेर आला.

"काय चाललय तुमच्या दोघींचं?"

रिया पटकन उठून उभी झाली, तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते.

"सॉरी.. सॉरी सर."
तिने खाली मान घातली आनंदी उभी झाली तिने खाली मान घालून सॉरी म्हटलं. आणि दोघी आपापल्या कामाला लागल्या. अभिजीत तिथून गेल्यानंतर दोघीही एकमेकीकडे बघून खुदुखुदु हसायला लागल्या.

"तुझं लग्न झालंय का रिया?" हे ऐकताच रिया लाजायला लागली.

"अरे देवा तुला लाजायला काय झालं?"

"काही नाही."

"लग्न झालंय ना?"

"हो लव मॅरेज आहे."

"अच्छा लव्ह मॅरेज आहे म्हणून इतकं लाजतेस काय ग? कसं असतं लव्ह मॅरेज लाईफ?"

"छान असते, सगळीकडे तोच तोच तो दिसतो मला, स्वयंपाक करताना मला तोच दिसतो, बाकीचे काम करताना मला तोच दिसतो."

"काहीही सांगू नकोस."


"अगं खरंच काही सांगत नाहीये."

"चल काहीतरी बोलू नकोस." दोघींची मस्ती सुरू होती. थोड्यावेळाने दोघी कॉफी प्यायला गेल्या, कॉफी पिऊन आल्यानंतर अभिजीतने आनंदीला केबिनमध्ये बोलावलं.

"अभिजीत तुम्ही बोलावलं मला."

"हो बस."

"काय झालं? काही झालंय का काय तुला?"

"तुम्हाला असं का वाटतय, उलट तुम्हाला काय झाले ?"

"काही नाही."

"तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय."

"अच्छा म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुला समजतात तर."

"प्लिज सांगा ना काय झालं? रागवला का तुम्ही माझ्यावर?"

"आनंदी काय चाललंय तुझं? आपण येथे कामावर येतो ना मग काम करायचं ना तू काय बोलत बसतेस तिच्याशी."