Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 16

Katha Phulnarya Natyachi
फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 16

आधीच्या भागात आपण पाहिले की,

आनंदीचे आई बाबा आले होते, अभिजीतला बहुतेक ते आवडलं नसावं, तो बोलला नाही.
पण आनंदीने त्याला फोन केला, जेवायला घरी येणार का विचारलं तेव्हा तो बोलला मला यायला जमणार नाही. हे ऐकून ती उदास झाली.

आता पुढे,


आनंदी ने फोन ठेवला. मागे निशा उभी होती.

"काय ग काय म्हणाले अभिजीतराव? येत आहेत का जेवण करायला?"

"नाही येत आहेत ते. त्यांना जमणार नाही. चल आपण जेवून घेऊया, मग थोड्यावेळ आराम कर, त्यानंतर आपण बागेत जाऊ, इथे जवळच बाग आहे."

तिघांनी जेवणं केली आणि थोड्यावेळ आराम केला. त्यानंतर संध्याकाळी बागेत फिरायला गेले.

रात्री आनंदीने आई-बाबांना जेवणं वाढून ती बाल्कनीत जाऊन बसली होती. बराच वेळ वाट बघत बसली. वारंवार घड्याळाच्या काट्याकडे बघत होती.


\"काय झालं आज अभिजीत का आले नसतील? फोन नाही लागत नाहीये, कधीच एवढा उशीर होत नाही. आज नक्की काय झालं असेल? खरंच अभिजीतला आवडलं नाही की आई बाबाला आलेत, असं असेल तर त्यांनी माझ्याशी स्पष्ट बोलावं उगाच असं वागण्यात काय अर्थ आहे.\" ती स्वतःशीच बोलत होती.

बराच वेळ झाला ती वाट बघून थकली, बसल्या बसल्या तिचा डोळा लागला.

बऱ्याच वेळानंतर तिला आवाज आला, बघितलं तर अभिजीत आले होते. अभिजीतला अशा अवस्थेत बघून आनंदीला धक्का बसला. अभिजीत गलंडत गलंडत येत होते, पळता पळता वाचले. आनंदी त्याच्याजवळ गेली.

"अहो हे सगळं काय आहे?  तुम्ही ड्रिंक करून आलात?अहो काय झालं बोला ना?"

अभिजीत गप्पच होता, ती त्याला खोलीत घेऊन गेली.

खोलीत गेल्यानंतर तो बेडवर पडला, आनंदीने त्याच्या पायातून शूज काढले, सॉक्स काढले आणि त्याचे पाय सरळ केले. त्याच्या उशाशी जाऊन बसली त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

"अहो बोला ना ड्रिंक का केलंत तुम्ही?"
अभिजीत नशेतच होता, तो काहीच बोलला नव्हता.

\"आता यांच्याशी बोलून काही अर्थ नाही. असा विचार करून त्याच्या बाजूला जाऊन झोपली.


सकाळी अभिजीतला उशिरा जागा आली, बेडवर उठून बसला. तेव्हा त्याचा डोकं खूप दुखत होतं.

त्याने खोलीतुनच आनंदीला आवाज दिला.

"आनंदी...आनंदी...जरा ये ग इकडे."

आनंदी किचनमध्ये काम करत होती, अभिजीतचा आवाज ऐकताच ती बेडरूम मध्ये गेली.

"उठलात तुम्ही? झोप छान झाली की नाही. रात्री खूप उशिरा आलात."


"आनंदी मला एक ग्लास लिंबू पाणी आणून दे, माझं डोकं खूप दुखतंय."

"डोकं दुखतंय मग लिंबू पाणी का?"

"आनंदी तुला नाही कळणार, प्लिज लिंबू पाणी दे ना."


"ओके ओके."

आनंदीने अभिजीतसाठी लिंबू पाणी बनवलं आणि पुन्हा खोलीत आली.

अभिजीत लिंबू पाणी प्यायला, तिच्या हातात ग्लास दिला.

"अभिजीत एक विचारू का?"

"नाही नको, आनंदी तू काय विचारणार आहेस मला माहिती आहे आणि मला त्या टॉपिक वर चर्चा नको, ऑलरेडी माझं डोकं खूप दुखतंय, उगाच चर्चा करून,ती वाढवून आपण आपला वेळ वाया घालवू अजून काही नाही आणि आपल्या दोघांमध्ये मला वाद करायची नाही, त्या गोष्टीमुळे वादच होतील आणखी काही होणार नाही." अभिजीत बोलून मोकळा झाला.

आनंदीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती त्याच्या बाजूला जाऊन बसली, त्याचा हात हातात घेतला.

"निगेटिव्ह विचार का करताय? आपल्यात वादच होईल असं का वाटतं तुम्हाला? काही गोष्टी प्रेमाने बोलून सुद्धा प्रश्न सोडवता येतात. आपण हे बोलल्यानंतर वाद होईलच, तुम्ही का गृहीत धरताय? आणि मी कोणी हिटलर नाहीये तुम्हाला जाब विचारायला. फक्त कस आहे ना अभिजीत काही काही गोष्टी आपण पहिल्यांदा बघतो त्या गोष्टी आपल्याला माहित नसतात म्हणून त्या गोष्टींविषयी आपल्याला आश्चर्य वाटतं. त्या गोष्टीची जर आपल्याला पूर्वकल्पना असली तर असं आश्चर्य वाटलंच नसतं आणि ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या मी स्पष्टपणे बोलते, मलाही तुमच्या काही गोष्टी आवडल्या नाही तर त्या मला तुम्हाला बोलाव्याशा वाटल्या आणि कस आहे ना अभिजीत मी आता बोलले नाही ना तर उगाच मनातल्या मनात कुढत राहील. मनातल्या मनात तेच विचार सुरू राहतील. त्यापेक्षा बोलून मोकळे झालेलं बरं. उगाच तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज नको आणि माझ्या मनात तुमच्याविषयी गैरसमज नको." आनंदी खूप शांतपणे बोलली. तीच बोलणं ऐकून अभिजीतला थोडा आधार वाटला.

"आय एम सॉरी आनंदी, मी उगाच तुझ्यावर ओरडलो."

"सॉरी म्हणायची गरज नाहीये, पण काल तुम्ही जे वागलात ते का वागलात हे एकदा सांगा फक्त मला."

"अग पण.."

"अभिजीत संकोच करू नका, तुमच्या मनात जे काही आहे ते प्लिज बोला, उगाच तुम्ही तुमच्या मनात काही ठेवू नका. तुम्हाला त्रास होईल त्याचा. तुम्ही तुमचा त्रास वाढवू नका. आता रात्री सारख वागाल तर मला ते अजिबात आवडणार नाही."

"खरंतर काल आई बाबा आलेत ना तर मला थोडं खटकलं. आनंदी कस आहे ना आपण दोघेच राहतो ना, आपल्याला तशी सवय झाली आहे, अचानक आई बाबा आले आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला प्रायव्हसी मिळणार नाही किंवा आपल्याला एकमेकांशी बोलता येणार नाही, असे एक ना अनेक निगेटिव्ह विचार माझ्या मनात येऊन गेले आणि मग मी स्वतः कुडत राहिलो आणि मग काल रात्री ते सगळं घडलं. सॉरी आनंदी सॉरी पण माझ्या मनात आई-बाबांविषयी प्रेम आणि आदरच आहे, तू काही वाईट विचार करू नकोस, फक्त ते न सांगता आले ना म्हणून मी थोडा डिस्टर्ब झालो. बाकी काहीच नाही आणि हो प्लिज तू हे त्यांच्याजवळ बोलू नकोस. ते माझ्याबद्दल उगाच काहीतरी विचार करतील."


"अहो वेडे आहात का? असं काही होणार नाही आणि हो मी तुम्हाला एक सांगू का आई बाबा परवाच्या ट्रेनने परत जाणार आहेत, त्यांची रिटर्नची तिकिटे बुक झाली आहेत सो दोन दिवस तरी तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांना खरंच बरं वाटेल. चला आता फ्रेश व्हा. मी जाते आई बाबा बाहेर बसलेत, नाश्ता करते."

"हो ठीक आहे."

आनंदी जातच होती की अभिजीतने पुन्हा आवाज दिला.

"आनंदी.."

"हा बोला.."

"प्लिज आज पोहेच बनव." हे ऐकून आनंदी हसली आणि अभिजीतही हसला.

अभिजीत फ्रेश झाला, हॉलमध्ये सर्वांसोबत त्यांनी नाश्ता केला. त्याच्या हातात पोह्याची प्लेट बघून निशाने आनंदीला इशारा केला. आनंदीने तिला इशाऱ्याने होकार दिला.

सगळ्यांचा नाश्ता झाला,

"आनंदी ऐक ना, आज मी ऑफिसला जात नाहीये. आज आपण सगळे फिरायला जातोय बाहेर. सो तुम्ही सर्वजण रेडी व्हा आणि हो आनंदी स्वयंपाक वगैरे काही करू नकोस."

"आज अचानक बाहेरच? आज तुम्हाला ऑफिस नाही का? विक्रमने अभिजीत कडे बघून विचारलं.


"बाबा ऑफिसचं काय, ते सुरूच असतं. आता तुम्ही आलात ना तर मी ठरवलं माझा वेळ फक्त तुमच्यासाठी. ऑफिस तर काय नेहमीचच आहे."

अभिजीतचं वागणं बघून निशाला खूप आश्चर्य वाटलं.

सगळ्यांना आनंद झाला. सगळे रेडी होऊन बाहेर फिरायला गेले.


"बोल आनंदी कुठे फिरायला जायचं?"

"तुम्ही ठरवा."

"मूवीला जायचं का?"

"आई-बाबा तुम्हाला चालेल का?"

"हो चालेल जाऊया आपण मुवीला."
सगळ्यांचं मूवीला जाण्याचा ठरलं.

ते मूवी बघायला गेले, मूवी बघून बाहेर निघाले आणि सगळे रस्ता ओलांडून गाडी कडे जात होते. विक्रम, निशा समोर होते. आनंदी मागे होती. ती मागे मागे जात होती.

तितक्यात एका गाडीने आनंदीला टक्कर मारली.
आनंदी$$$..

अभिजीत ओरडला.

निशाने तोंडावर हात ठेवला...

आनंदी $$$.....विक्रम किंचाळला.